S M L
  • मुक्ता सन्मान सोहळा

    Published On: Mar 9, 2013 03:15 PM IST | Updated On: Mar 9, 2013 03:15 PM IST

    महिला दिनानिमित्त आयबीएन-लोकमतने महिलांच्या कर्तृत्वाला आणि योगदानाला सलाम करण्यासाठी 5 व्यक्तिमत्वांचा गौरव'मुक्ता सन्मान' पुरस्कार देऊन केला. मुक्ता सन्मान 2013 चा शानदार सोहळा मुंबईत प्रभादेवीच्या रचना संसद इन्स्टिट्युटच्या ऑडिटोरिअममध्ये पार पडला. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना मुक्ता सन्मान देण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका विद्या बाळ यांना 'मुक्ता जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर इंग्लिश-विंग्लिशच्या दिग्दर्शिका गौरी शिंदे, उद्योजिका रंजना देशपांडे, तायक्वाँडो कोच भास्कर करकेरा, तहसिलदार शिल्पा ठोकडे आणि बालविवाह थांबवणार्‍या दीपशिखा उपक्रमातील मुलींचा 'मुक्ता सन्मान' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मानवी हक्क अभियानचे एकनाथ आव्हाड आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे या 'मुक्ता सन्मान 2013' सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. महाराष्ट्र रत्नांचा गौरवशिल्पा ठोकडे - सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना लेडी दबंग म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात धुमाकूळ घालणार्‍या वाऴू माफियांना लगाम घालण्याचं काम त्यांनी केलं. भास्कर करकेरा - मुलींना स्वसंरक्षणार्थ आत्मविश्वासाने उभं करण्याचं खास प्रशिक्षण देणारी संंस्था भास्कर करकेरा यांनी सुरु केली. गावागावातून तायक्वांडोचं प्रशिक्षण देणारे स्वयंसिद्धाचे वर्ग ते चालवतातगौरी शिंदे - दिग्दर्शक गौरी शिंदेच्या इंग्लिश विंग्लिश सिनेमाने कित्येक गृहिणींना आत्मविश्वास दिला. गृहीणीच्या कामाचं मोल ओळखायला कित्येकांना भाग पाडलं. स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपारिक दृष्टीकोनालाच गौरीने या कमर्शिअल सिनेमातून छेद दिला.रंजना देशपांडे - नाशिकच्या उद्योजक असलेल्या रंजना देशपांडे यांनी 'उद्योगस्वामिनी' ही महाराष्ट्रातली पहिली महिला सहकारी उद्योजक वसाहत सुरु केली यातून अनेक महिला उद्योजकांना संधी मिळाली आहे.दीपशिखा उपक्रम- दीपशिखा उपक्रमातल्या मुलींना आपले बालविवाह थांबवले आणि गावात इतर मुलींचे बालविवाह थांबवण्यासाठी पुढाकार घेतला. जालना जिल्ह्यात दिपशिखा वर्गांशी 6000मुली जोडल्या गेल्या आहेत. या मुलींचं प्रतिनिधित्व करणार्‍या वर्षा खरात आणि प्रतिभा चंदनसे या दोघींचा सत्कार.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close