• होम
  • व्हिडिओ
  • मुंबई दंगलीला 20 वर्ष पूर्ण, न्यायासाठी लढा सुरूच
  • मुंबई दंगलीला 20 वर्ष पूर्ण, न्यायासाठी लढा सुरूच

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Jan 8, 2013 04:53 PM IST | Updated On: Jan 8, 2013 04:53 PM IST

    सुधाकर काश्यप, मुंबई08 जानेवारीमुंबईत 1992-93 सालात दंगल झाली होती. या दंगलीला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत. हजारोजणांनी याची झळ सहन करावी लागली होती. या दंगलीच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला होता. या आयोगानं अनेक सूचना केल्या होत्या. ज्यांना दंगलीची झळ पोहचलीय, ते आजही न्यायासाठी धडपड करताहेत. खरंच 20 वर्षांनंतर पीडितांना न्याय मिळाला का? 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभरात दंगली उसळल्या. या दंगली दोन आठवडे चालल्या. 8 जानेवारी 1993 साली दंगल पुन्हा भडकली. त्यावेळी दहा ते बारा दिवस मुंबई होरपळत होती. या दंगलीत शेकडो लोकं ठार झालीत. तर हजारो लोक बेघर झालीत. दंगलीत पीडितांपैकी एक फारुख मापकर...मापकर हे शिवडीच्या हरी मस्जिद येथे राहतात. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गोळी लागलीय. त्यानंतर काय घडलं हे धक्कादायक होतं. दंगलीच्या चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोगाची नेमणूक केली होती. त्याचं काम पाच वर्ष चाललं. आयोगानं केलेल्या शिफारशी धक्कादायक होत्या.श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशी- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कारवाई करावी- पोलीस सहआयुक्त रामदेव त्यागी, निखिल कापसे, राम देसाई यांच्यासह 31 पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी- पीडितांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी- पोलिसांनी 1370 समरी केल्या होत्या. त्या केसेसचा पुन्हा तपास करावापोलिसांनी श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशींवर योग्य ती कारवाई केली नाही. पोलिसांनी 1370 पैकी 112 केसेस निवडल्या. त्यातूनही 8 प्रकरणाचा तपास केला.पोलिसांची कारवाई- रामदेव त्यागी तसंच काही दंगलखोरांवर खटले चालवले- हे खटले योग्यप्रकारे चालवले नाहीत- रामदेव त्यागी यांची खटल्यातून सुटका झालीउलटपक्षी पोलिसांनी पीडितांच्या विरोधात कारवाई करण्याचीच आघाडी उघडली होती. या दंगलीतील पीडित दोन पातळ्यांवर लढत होते. एक त्यांच्यावर टाकण्यात आलेल्या खटल्यांच्या तारखांना हजेरी लावण्यात, तर दुसरीकडे न्याय मिळवण्यासाठी...गेली 20 वर्ष हा संघर्ष सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी