• होम
  • व्हिडिओ
  • तरूणींच्या तोकड्या कपड्यांवर बंदी घालावी -अबु आझमी
  • तरूणींच्या तोकड्या कपड्यांवर बंदी घालावी -अबु आझमी

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Jan 8, 2013 02:27 PM IST | Updated On: Jan 8, 2013 02:27 PM IST

    08 जानेवारीदिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मात्र दुसरीकडे वादग्रस्त विधानं करण्याचा जणू स्पर्धाच लागलीय. राष्ट्रीय स्वयसंघाचे संरसंघचालक मोहन भागवत, आसाराम बापू यांच्या पाठोपाठ आता समाजावादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलंय. कायदा असा कडक करण्यात यावा ज्यामुळे महिला फक्त आपल्या पतीसोबतच राहतील तसंच देशातील 'नग्नापण' संपला पाहिजे यासाठी तोकड्या कपड्यांवर बंदी घालवी अशी गरळ अबु आझमींनी ओकलीय. ते एवढ्यावरच थांबले नाही सेन्सार बोर्डावर शर्मिला टागोर, शबाना आझमी यांच्या महिला आहे त्याठिकाणी गावातल्या शिकलेल्या महिलीही गेल्या पाहिजे अशी भंयकर मागणीही केलीय.मात्र अबु आझमी यांच्या वक्तव्यावर टीका होण्याअगोदरच त्यांना घरचा अहेर मिळाला आहे. अबु आझमींची सून आणि अभिनेत्री आयेशा टाकिया-आझमीनं मात्र अबु आझमींच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही, असं ट्विटरवरून म्हटलंय. जे कुणी मागासलेले विचार व्यक्त करतील ते माझ्या जवळचे जरी असले तरी ते माझे विचार नाहीत. मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे आहे आणि मला स्वत:ची ओळख आहे. त्यामुळे मी अशा मागासलेल्या विचारांशी सहमत नाही, असं स्पष्टपणे आयशाने सांगून टाकलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी