• 'गडकरींना दिलेल्या जमिनीत गैरव्यवहार नाही'

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Oct 18, 2012 05:48 PM IST | Updated On: Oct 18, 2012 05:48 PM IST

    18 ऑक्टोबरराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींची पाठराखण केली आहे. विदर्भात गडकरींना दिलेल्या जमिनीत कोणताच गैरव्यवहार झालेला नाही उलट त्यांच्या कारखान्यामुळे शेतकर्‍यांचा फायदाच झाला आहे असा युक्तीवाद शरद पवारांनी केला. तसेच गडकरी यांच्यावर झालेले आरोप हे अज्ञानामुळे झाले आहे असा टोला केजरीवालांना लगावला. शरद पवारांनी आयबीएन लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली यावेळी ते बोलत होतेय.शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचे आरोप खोडून काढत नितीन गडकरींची पाठराखण तर केलीच आणि आपल्या पुतण्याला 'सेफ' करण्याचा प्रयत्न पवारांनी केला. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्या प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली. विदर्भात जी 100 एकरची जमीन नितीन गडकरी यांना देण्यात आली आहे ती त्यांच्या एका संस्थेला देण्यात आली आहे. ही जमीन पाटबंधारे खात्याची होती पण जमीन कायदेशीर पद्धतीने देता येते आणि तीकधीच कायम स्वरुपात देता नाही. एका ठराविक काळासाठी आणि लोकहितासाठी दिली जाते. आणि गडकरी यांनी ती जमीन चार दिवसात देण्यात आली नाही त्यांच्यावर झालेला आरोप चुकीचा आहे. मुळात लोकांची धारणाही प्रशासनाबद्दल गैरसमजुतीची आहे. मी जेव्हा दिल्लीत असतो तेव्हा माझ्याकडे आलेली काम 80 टक्के पूर्ण झालेली असतात. आम्ही कधीच फायली थांबवून ठेवत नसतो असं स्पष्टीकरण शरद पवारांनी केलं. सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची प्रकरण आणि गडकरी-अजितदादांचं साटंलोटं यावर प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, महाराष्ट्रात एकाच क्षेत्रात हजारो लोक काम करतात असं नाही. त्यामुळे उद्योजकांना प्राधान्य दिलं जातं त्यामुळे याला साटंलोटं म्हणणं चुकीचं आहे. उद्योजक म्हणजे कोण ? रतन टाटा, किर्लोस्कर यांचं काही योगदान आहे की नाही ? अशा उद्योजकांना सरकारनं प्राधान्य दिलं तर त्यात काहीही चुकीचं नाही असं स्पष्टीकरण देत पवारांनी तटकरे,भुजबळ प्रकरण मला माहित नसल्याचं सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी