• 'यूपीए'सरकारची वाट बिकट ?

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Oct 2, 2012 02:38 PM IST | Updated On: Oct 2, 2012 02:38 PM IST

    02 ऑक्टोबरइंधन दरवाढ, एलपीजीवर मर्यादा आणि एफडीआयचा घेतलेल्या निर्णयावरुन घटक पक्षांसह विरोधकांनी एकच हल्लाबोल केला. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा काढून घेत सरकारला धक्का दिला. तर काही जणांनी मध्यावर्ती निवडणुकांची शक्यताही व्यक्त केली. अशातच यूपीए सरकार आता पाचव्या वर्षाकडे वाटचाल करत आहे. यावरच आयबीएन नेटवर्क आणि जीएफके मोड यांचा संयुक्त विद्यमानाने दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, लखनौ आणि अहमदाबाद या शहरांमध्ये सर्व्हे केला. या सर्व्हेसाठी 18 वर्षांवरील 1236 व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्यात. या सर्व्हेत लोकांनी यूपीएची वाट बिकट असल्याचं स्पष्ट वर्तवलं आहे. तसेच पंतप्रधान मनमोहन सिंग देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकणार नाही असं 67 टक्के लोक म्हणत आहे. त्याचबरोबर कोळसा घोटाळ्याप्रकरणी 66 टक्के लोकांनी पंतप्रधानांना दोषी ठरवलं आहे. सरकारने घेतलेला एफडीआयच्या निर्णायाला 76 टक्के लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 1- सध्या कोणती समस्या तुम्हाला सर्वात जास्त भेडसावतेय? 1. वाढती महागाई - 57 %2. भ्रष्टाचार - 32 %3. असुरक्षितता - 5 %4. पायाभूत सुविधांचा अभाव - 4 % 5. आरोग्य-शिक्षण सुविधांचा निकृष्ट दर्जा - 2 %2. तुमच्या मते, UPA सरकारच्या विरोधात जाणारा मुद्दा कोणता?- महागाई : 50 %- भ्रष्टाचार : 34 %- निष्प्रभ प्रशासन : 12 %- घटकपक्षांकडून अडवणूक : 4 %3. तुमच्या मते वाढत्या महागाईची कारणं काय ?a. डिझेलचे वाढलेले दर - 59 %b. घाऊक व्यापार्‍यांची साठेबाजी - 20 %c. किरकोळ व्यापार्‍यांची मनमानी दरवाढ - 30 %d. वितरण व्यवस्थेतील त्रुटी - 46 %4. डिझेलची दरवाढ योग्य आहे, असं तुम्हाला वाटतं का ?होय - 12 %नाही - 87 %माहीत नाही - 1%5. एका वर्षात केवळ 6 एलपीजी सिलेंडरच्या सबसिडीची मर्यादा योग्य आहे, असं तुम्हाला वाटतं का?हो - 7 % नाही - 93 %6. एका वर्षात अनुदानित किंमतीचे किती LPG सिलेंडर मिळावेत, असं तुम्हाला वाटतं? a. एका वर्षात 6 अनुदानित सिलेंडर - 3 %b. एका वर्षात 8 अनुदानित सिलेंडर - 11 %c. एका वर्षात 12 अनुदानित सिलेंडर - 73%d. एका वर्षात 15 अनुदानित सिलेंडर - 8 %e. एका वर्षात 24 अनुदानित सिलेंडर - 2 %7. कोळसा खाण वाटप व्यवहारामध्ये कोणाला सर्वाधिक फायदा झाला, असं तुम्हाला वाटतं ?: काँग्रेस - 49 % : भाजप - 14 %: दोन्ही पक्ष - 24 %: माहीत नाही - 13 %8. कोळसा खाण वाटप प्रकरणात पंतप्रधानांना दोषी धरणं योग्य आहे का ?* हो - 66 %* नाही - 34 % 9. रिटेलमध्ये परकीय गुंतवणुकीचा सरकारचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का ?* हो - 20 % * नाही - 76 %* माहीत नाही - 4 %10. रिटेलमधील परकीय गुंतवणुकीचे काय परिणाम होतील, असं तुम्हाला वाटतं ?* किराणा दुकानांचं नुकसान - 53 %* ग्राहकाचा फायदा - 32 %* शेतकर्‍यांचा फायदा - 26 %* बेरोजगारी वाढेल - 50 % * रोजगाराच्या संधी वाढतील - 16 %11. आर्थिक सुधारणांचे निर्णय राबवण्यासाठी UPA सरकारने हीच वेळ निवडण्याचं प्रमुख कारण कोणतं, असं तुम्हाला वाटतं ?1. नाजूक आर्थिक स्थितीमुळे नव्हता पर्याय - 54 %2. देशाची घसरत असलेली आर्थिक पत - 29 %3. अर्थमंत्री चिदंबरम - 26 %4. गुंतवणुकदारांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी - 27 %5. सोनिया गांधींचा भक्कम पाठिंबा - 16 %6. राष्ट्रपती निवडणुकीची होती प्रतीक्षा - 27 %7. जगभरातील मीडियाने पंतप्रधानांवर केलेली टीका - 23 %12. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यशस्वी ठरतील, असं तुम्हाला वाटतं का ?* हो - 28 %* नाही - 67 %* माहित नाही - 5 %13. यूपीए सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं तुम्हाला वाटतं का ?1. हो, अगदी सहज - 18 %2. हो, पण संघर्ष आणि तडजोड अटळ - 38 %3. नाही, 2013 मध्ये होणार निवडणुका - 27 %4. चालू वर्षातच कोसळेल सरकार - 14 %14. सरकारमधून तृणमूल काँग्रेस बाहेर पडल्यानं UPA सरकारला फायदा होईल का?हो - 61%नाही - 31%माहित नाही - 8%15. राजकीय पक्ष न काढण्याचा अण्णांचा निर्णय योग्य आहे, असं तुम्हाला वाटतं का?होय - 52%नाही - 42%माहीत नाही - 6%16. राजकीय पक्ष काढण्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या निर्णयाशी तुम्ही सहमत आहात का ?होय - 40%नाही - 52%माहित नाही- 8% 17. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यशस्वी ठरतील, असं तुम्हाला वाटतं का ?* हो - 28 %* नाही - 67 %* माहित नाही - 5 %18. UPA सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं तुम्हाला वाटतं का ?1. हो, अगदी सहज - 18 %2. हो, पण संघर्ष आणि तडजोड अटळ - 38 %3. नाही, 2013 मध्ये होणार निवडणुका - 27 %4. चालू वर्षातच कोसळेल सरकार - 14 %

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading