S M L
  • 'फुलराणी' सायनाची गगन भरारी

    Published On: Sep 28, 2012 03:26 PM IST | Updated On: Sep 28, 2012 03:26 PM IST

    28 सप्टेंबरबॅडमिंटन कारकिर्दीत लहान वयात मोठी झेप घेणार्‍या सायना नेहवालनं आज आकाशात भरारी घेत इतिहास रचला आहे. सायना नेहवालनं आज 'किरण MK2' या जेट प्रशिक्षण विमानानं उड्डाण केलं. आंध्र प्रदेशमधल्या दुंडीगल इथल्या प्रशिक्षण केंद्रावर सायनानं जेट चालवण्याचा अनुभव घेतला. एअर फोर्स अकादमीत सुरु असलेल्या इंटर स्कॉड्रोन स्पोर्ट्स स्पर्धेसाठी सायनाला खास निमंत्रण देण्यात आलं होतं. यावेळी सायनानं हवाई दलातील कॅडेट्सशी संवादही साधला. भारतीय हवाई दलानं दिग्गज क्रीडापटूंना मानद पदं दिली आहेत. गेल्यावर्षी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मानद ग्रुप कॅप्टनपद बहाल करण्यात आलं होतं. तर भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोणीला लढावू विमान चालवण्याची संधी देण्यात आली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close