• हा कसला देशद्रोह ? - राज

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Sep 11, 2012 04:14 PM IST | Updated On: Sep 11, 2012 04:14 PM IST

    11 सप्टेंबरत्या अफजल गुरुने संसदेवर हल्ला केला. त्याबद्दल त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली पण अजूनही त्याला फासावर लटकवले नाही मग ही संसदेची थट्टा नाही का ? त्या कसाबला फासावर लटकवले नाही ही थट्टा नाही का ? सगळीकडे भ्रष्टाचार,जनतेच्या पैशाची लूट सुरु आहे. खरे देशद्रोही तर बाहेर मोकाट आहे आणि याबद्दल कोणी संताप व्यक्त केला तर त्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल केला. मुळात असीमच्या व्यंगचित्राचा उद्देश समजून न घेता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे अत्यंत चुकीचे आहे. त्याला तात्काळ गुन्हे मागे घेऊन सोडून द्यावे अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसेच आर.आर.पाटील यांना अगोदरच गृहखाते समजत नाही त्यांना व्यंगचित्र काय समजणार ? त्यांनी ती अगोदर दुसर्‍याकडून समजून घेऊन कारवाई करायला पाहिजे असा टोला राज यांनी लगावला.मी असीमचे व्यंगचित्र पाहिली ती पाहिल्यावर मला प्रश्न पडला की त्याला अटक का केली ? त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल कसा केला ? मुळात त्याच्या व्यंगचित्रात काहीही चुकीचे नाही. एक कलाकार म्हणून मला त्यात बिल्कुल चुकीचे काहीही वाटले नाही. व्यंगचित्र न समजून घेता त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जगभरातील व्यंगचित्र एकदा पाहुन घ्या त्यावरुन तुम्हाला अंदाज येईल. याही पेक्षा जास्त दूर न जाता बाळासाहेबांची व्यंगचित्र नीट पाहा. बाळासाहेबांनी त्यावेळी व्यंगचित्रातून तुफान फटकेबाजी केली होती. मुळात असीमच्या व्यंगचित्रामागचा उद्देश काय आहे हेच समजून न घेता ही कारवाई झाली आहे. कुणाला झटका आला म्हणून कारवाई करणे अत्यंत चुकीचे आहे. असीमने काढलेली अशोक स्तंभाचे चित्र, संसदेला टॉयलेट दाखवणे यात त्याचे चुकले काय ? ज्या स्तंभात सिंहाचे तीन मुख आहे आता ते कुठे आहे ? त्या जागी त्याने लांडग्याचे चित्र दाखवले आणि त्यांच्या दाताला रक्त दाखवले याचा अर्थ असा की, अनेक भ्रष्ट नेते, खासदारांनी व्यवस्थेची लचके तोडली आहे. यात का चुकले त्याचे ? ज्या संसदेत भ्रष्ट खासदार,गुन्हेगार खासदार कारभार पाहत असतील तर त्यांनी तरी संसदेचा आदर राखला आहे का ? असा संतप्त सवाल राज यांनी उपस्थित केला. तसेच जी लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाने गळा काढतात आता ती कुठे आहे ? अशा वेळी कोणी पुढे येत नाही. असीमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला मग विजय तेंडुलकर, अशा अनेक साहित्यकांवर अगोदरच गुन्हे दाखल झाली पाहिजे होती. मुळात आपल्या गृहमंत्र्यांना अगोदर खाते समजत नाही मग त्यांना व्यंगचित्र काय समजणार ? त्यांनी ती दुसर्‍या समजदार व्यक्तीकडून व्यंगचित्र समजून घ्यावे आणि मग कारवाई करावी असा खोचका टोल राज यांनी लगावला. कोर्टाने त्याचा जामीन मंजूर केला ही आनंदाची बाब आहे आता त्याच्यावरील सगळे गुन्हे मागे घेऊन त्याला तात्काळ निर्दोष सोडावे अशी मागणीही राज यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading