• राज यांच्याविरोधात बिहारमध्ये तक्रार दाखल

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Sep 3, 2012 05:34 PM IST | Updated On: Sep 3, 2012 05:34 PM IST

    03 सप्टेंबरमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिहारींविरुद्ध केलेल्या भाषणावरून वादळ निर्माण झालंय. राज यांच्याविरोधात बिहारमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या वादात आज आरपीआयनेही मनसेच्या विरोधात उडी घेतली. केंद्र सरकारनेही राज ठाकरेंवर टीका केल्याने आता हा विषय राष्ट्रीय पातळीवर पोचला आहे. पण तरीही राज यांच्यावर कारवाई करायला मात्र राज्य सरकार कचरतंय. राज यांच्या भाषणामुळे त्यांच्याविरोधात बिहारच्या नालंदामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन समाजात द्वेष पसरवण्याची तक्रार राज यांच्याविरोधात बिमलेश कुमार पांडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे. याची सुनावणी या महिन्याच्या 18 तारखेला होणार आहे. पण इथे राज्य सरकार मात्र राजविरोधात कोणतीही कारवाई करायला कचरतंय. राज ठाकरेंच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सध्यातरी मौन बाळगलंय.या वादाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. कोणत्याही नागरीकाला देशात कुठेही जाण्याचा अधिकार आहे, कोणी कोणालाही रोखू शकत नाही या शब्दात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. राज ठाकरेंनी हिंदी चॅनल्सना धमकी दिली होती. त्याविरोधात आता मनसेने मैदानात उतरली आहे. इंदू मिलच्या मुद्द्यावरून राजविरोधात निदर्शनं करणार्‍या आठवलेंनी आता हिंदी चॅनल्सना संरक्षण देऊ केलंय. पाटण्यापासून दिल्लीपर्यंत सर्वांनी राज ठाकरेंवर टीका केली असली. तरी सोमवारी त्याला राज ठाकरेंनी उत्तर दिलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी