• मनसे नक्षलवादी, आझमींची आगपाखड

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Sep 1, 2012 01:15 PM IST | Updated On: Sep 1, 2012 01:15 PM IST

    01 सप्टेंबरराज ठाकरे यांच्या पक्षाला नक्षलवादी, फुटीरतावादी म्हणून घोषित करावे. राज हे नक्षलचे पुजारी आहे. जर राज यांनी परप्रांतीयांवर एवढाच आक्षेप असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊन दाखवावे अशी आगपाखड समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली. तसेच राज यांनी परप्रांतीयांना घुसखोर म्हणण्याची चूक करु नये असा सल्ला काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी दिला.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उत्तर भारतीयांमधल्या वादाला आता नव्यानं सुरुवात झाली आहे. काल शुक्रवारी राज ठाकरे यांनी सीएसटी हिंसाचार प्रकरणी बिहारमध्ये दंगेखोरांना अटक करण्यासाठी मुंबई पोलीस गेले असता. बिहारच्या मुख्यसचिवांनी त्यांना मज्जाव केला होता. तसेच कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मुंबई पोलिसांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास बिहारींना घुसखोर समजून हाकलून देऊ, असा इशारा राज यांनी दिला. राज यांच्या याविधानावर आक्षेप घेत काँग्रेसचे खासदार संजय निरुपम आणि सपाचे आमदार अबू आझमी यांनी हल्लाबोल केला. लोकांना देशात कुठेही जाण्याचा, राहण्याचा, काम करण्याचा अधिकार आहे. राज यांनी परप्रांतीयांना घुसखोर म्हणून नये. जर मुख्यसचिवांनी पत्र पाठवले असेल राज यांनी त्यात ढवळाढवळ करु नये. त्यासाठी राज्य सरकार आहे असा टोला निरुपम यांनी लगावला. तर मनसे या पक्षालाच नक्षलवादी,फुटीरतावादी म्हणून घोषित करावे, ही लोक नक्षलचे पुजारी आहे. जेव्हीही बोलतात नेहमी फुटीरतावादी बोलता. मुख्यसचिवांनी मज्जाव केला असाल तर त्यात गैर काय ? मुंबई पोलिसांना दुसर्‍या राज्यात जायचे असेल तर त्यांनी तसे तेथील सरकारला कळवावे. देश राज्यघटनेनुसार चालतो कोणाच्या गुंडागर्दीने चालत नाही. जर राज यांनी बिहार सरकार विरोधात एवढाच राग असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊन दाखवावे असं आव्हान अबू आझमी यांनी दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी