• राज ठाकरे यांचं संपुर्ण भाषण

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Aug 21, 2012 02:33 PM IST | Updated On: Aug 21, 2012 02:33 PM IST

    21 ऑगस्टमाझा मोर्चा हा कोणत्या हिदुत्वाचा विषयासाठी नाही, 11 ऑगस्टच्या हिंसाचारात माझ्या मराठी बांधवांना मारहाण झाली, मराठी भगिनी होत्या त्यासाठी आज मी रस्त्यावर उतरलो. त्यांनी हिंसाचारासाठी मोर्चा काढला. मी त्यांचा निषेध करण्यासाठी काढला यात कुठला हिंदुत्वाचा मुद्दा ? राज ठाकरेला एकच धर्म आहे तो फक्त महाराष्ट्र धर्म. याच्या आड कोणी येऊ नका,याच्या वाट्याला जाऊ नका. हा मोर्चा पोलिसांच्या मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि प्रसारमाध्यमांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे असं ठणकावून सांगत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली. एवढं सगळं होऊन सुध्दा आर.आर.पाटील आणि अरुप पटनायक यांनी थोडीशी तरी लाज उरली असेल तर स्वत:हून राजीनामा द्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. 'परवानगी दिली नाही तरी मोर्चा काढणारच' असं आव्हान देऊन राज यांनी आपला शब्द पाळत आज अभुतपुर्व असा विराट मोर्चा काढून दाखवला.70 हजार कार्यकर्त्यांसोबत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा विराट मोर्चा निघाला. हातात मनसेचे झेंडे, 'राज ठाकरे आगे बढो..हम तुम्हारे साथ है'च्या घोषणा देत मनसेचा मोर्चा निघाला आणि आझाद मैदानावर धडकला. राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली ती कार्यकर्त्यांची पाठ थोपाटूनच...ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात अशा घटना घडतील तेव्हा तेव्हा अशीच ताकद दाखवा. 11 ऑगस्टला शनिवारी याच मैदानावर रझा अकादमीच्या लोकांनी हिंसाचार केला. याच मैदानात बांग्लादेशचा पासपोर्ट सापडला. हा धुडगूस घालण्यासाठी महाराष्ट्रातला मुस्लिम बांधव असं करु शकत नाही. यासाठी उत्तरप्रदेश,बांग्लादेश येथून हिंसक जमाव आला होता. (याचा पुरावा म्हणून राज यांनी बांग्लादेशचा पासपोर्ट भर सभेत दाखवला.) बरं...हा मोर्चा निघणार, हिंसाचार करणार याची पुर्ण जाणीव पोलिसांना होती. तरी सुध्दा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. महिला पोलिसांवर हात उचलला गेला. आणि मी शांततेनं मोर्चा काढला तर कारवाई करण्याची धमकी देता. मग काय तेव्हा आर.आर.पाटलांनी शेपुट घातले होते का ? याच मैदानावर त्या दिवशी अबू आझमी भडकावू भाषण केलं. हिंसक जमावाने पोलिसांना दगडाने ठेचून मारलं. या हिंसाचारात दोन जणांचा बळी गेल्या त्यांना या अबूने दीड लाखांची मदत केली पण आमच्या पोलिसांना काय दिलं ? राज्य सरकारने कोणतीही मदत जाहीर न करता याला एवढा पुळका कसा आला. हा अबू दोन दोन मतदारसंघातून निवडून येतो कोणाच्या जीवावर ? कोणाचे कुणाकडे लक्षच नाही. मायावती,आठवले, प्रकाश आंबेडकर चुपचाप का ?तिकडे उत्तरप्रदेशमध्ये असाच मोर्चा निघाला. त्याही जमावाने भगवान गौतम बुध्दांच्या मुर्तीची तोडफोड केली. आता कुठे गेल्या मायावती, कुठे गेले रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर कुठे गेले ? सगळे चिडीचुप...का त्या इंदू मिलमध्ये जाऊन दळत होते का ? असा टोलाही राज यांनी लगावला.ढोबळेंचा समाचार ते पोलीस आयुक्त पटनायकांचे लाडके वसंत ढोबळे हॉकी स्टीक घेऊन जातात. आणि जाता कुठे अमर ज्युस सेंटरमध्ये तिथे निष्पाप लोकांना बदडून काढायचे आणि वरतून सांगायचं ड्रग्सविरोधात मोहिम होती. मग बंद का नाही केलं सेंटर ? त्यावर पटनायक म्हणतात ढोबळे हॉकी खेळायला गेले होते म्हणून हॉकी सोबत घेऊन गेले. बरं मग उद्या हे हनीमून जातील मग काय सोबत कोणाला घेऊन जाणार ? असा टोलाही राज यांनी लगावला. पोलिसांवर हात उचलायचा नाही !महाराष्ट्रात यापुढे कोणताही असा प्रकार घडला तर पोलिसांवर हात उचलता कामा नये. पोलिसांवर हात टाकणार्‍या कुठल्याही धर्माचा असेल त्याला फोडून काढायला हवा. माझा मोर्चा निघाला तेव्हा मी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मोर्चा काढला असा आरोप केला जात होता पण माझा आणि माझ्या पक्षाचा एकच धर्म आहे तो फक्त महाराष्ट्रधर्म..या महाराष्ट्रासाठी वाटेल ते करु पण अत्याचार सहन केला जाणार नाही. सीसएसटी हिंसाचार झाल्यानंतर आज आठवडा उलटला गृहमंत्री आर.आर.पाटील आणि पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांना थोडी तरी लाज उरली असेल त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा अशी मागणीही राज यांनी केली. या भाषणानंतर विशेष बाब म्हणजे एका पोलीस हवालदाराने राज यांना स्टेजवर जाऊन फुल दिलं. आमच्यासाठी कोणीतरी बोलणार आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading