• विलासरावांचा राजकीय प्रवास

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Aug 14, 2012 05:08 PM IST | Updated On: Aug 14, 2012 05:08 PM IST

    14 ऑगस्ट बाभुळगावसारख्या लहान खेड्याचा सरपंच ते केंद्रीय मंत्री व्हाया राज्याचा आठ वर्ष मुख्यमंत्री, अशी दिमाखदार राजकीय कारकिर्द घडवणारे नेते म्हणून विलासराव देशमुख परिचित आहेत. वसंतराव नाईक यांच्यानंतर राज्याचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेला हरहुन्नरी चेहरा म्हणजे विलासराव देशमुख. आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाच्या बळावर विलासराव 1999 मध्ये सर्वसंमतीने काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2009 च्या निवडणुकांमध्ये पुन्हा आघाडीची सत्ता आल्यावर दुसर्‍यांदा विलासराव देशमुखांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतरची 'हॉटेल ताज' वारी त्यांना भोवली. त्यात त्यांना आपलं मुख्यमंत्री सोडावं लागलं. पण आधी राज्यसभेवर आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात विलासरावांनी वर्णी लावून घेत दमदार कमबॅक केलं. विलासराव दगडोजीराव देशमुख यांची कारकिर्दजन्म- 26 मे 1945ठिकाण- बाभुळगाव (लातूर)शिक्षण- बी. एस्सी., बी. ए. एलएलबी(गरवारे महाविद्यालय आणि आयएलएस विधी महाविद्यालयात शिक्षण)राजकीय कारकिर्द- बाभुळगावचा सरपंच ते केंद्रीय मंत्री व्हाया मुख्यमंत्री1972 - काँग्रेस कार्यकर्ता म्हणून कारकिर्दीला सुरुवात1974 ते 1976 - बाभुळगावचे सरपंच1975 ते 1978 - उस्मानबाद जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष1976 - लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक1976 ते 1979 - लातूर पंचायत समितीचे सदस्य1979 - उस्मानाबाद जिल्हा बँक आणि राज्य सहकारी बँकेवर संचालक1980 - लातूरचे आमदार म्हणून निवड1982 ते 1985 - ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून निवड , त्यानंतर त्यांनी गृह, सामान्य प्रशासन, कृषी, परिवहन, शिक्षण, तंत्र-शिक्षण, क्रिडा आणि युवक कल्याण या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम.1986 ते 1995 - कॅबिनेट मंत्री म्हणून ग्रामविकास, कृषी, सहकार, दुग्ध-विकास आणि पशसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शिक्षण, तंत्र व उच्च शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण, परिवहन, संसदीय कामकाज, सांस्कृतिक कार्य आदी खाती सांभाळली.1995- विधानसभा निवडणुकीत पराभूत.(35 हजार मतांच्या फरकानं पराभूत)1995-1999 - राजकीय विजनवासात.1999- पुन्हा विधानसभेवर निवड.(91 हजार मतांच्या फरकानं दणदणीत विजय)18 ऑक्टोबर 1999- मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदा वर्णी.18 जानेवारी 2003- मुख्यमंत्री पदावरून पायउतार.11 नोव्हेंबर 2004- दुसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान.7 डिसेंबर 2008- मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पद सोडावे लागले)ऑगस्ट 2009- राज्यसभेवर निवड.मे 2009 ते जानेवारी 2011- केंद्रीय अवजड उद्योगमंत्री.जानेवारी 2011 ते जुलै 2011- केंद्रीय ग्रामविकासमंत्री.जुलै 2011 पासून - केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री.राजकारणाबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये विलासरावांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांनी व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आणि क्रिकेटची आवड जपली. विशेष म्हणजे आपलं राजकीय कौशल्य वापरत त्यांनी मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. समाजकारणातही विलासरावांनी भरीव योगदान केले. मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या अनेक संस्थांची उभारणी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी