• यूपीए सरकार नापास !

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: May 21, 2012 04:39 PM IST | Updated On: May 21, 2012 04:39 PM IST

    21 मेएकापाठोपाठ निघालेले भव्य घोटाळे, वाढती महागाई, दरवाढ आणि अकार्यक्षम नेत्यांमुळे यूपीए सरकार टीकेची धनी बनली. यूपीए-2 सरकारला आज 3 वर्ष पूर्ण होत आहते. म्हणजेच एकूण आठ वर्ष होत आहेत. सलग दोन टर्म पूर्ण करण्याची किमया यूपीए सरकारनं या अगोदरही आणि आताही करुन दाखवली. पण चारही बाजूनं होत असलेल्या आरोपांमुळे जनतेच्या मनातून यूपीए सरकार उतरली असल्याचं आयबीएन-नेटवर्क आणि जीएफके (GFK) मोडनं केलेल्या सर्व्हेवरून स्पष्ट झालं आहे. जनतेची नाराजी ही यूपीएसाठी धोक्याची घंटा आहे. सरकारच्या या तीन वर्षाच्या कामगिरीवर 59 टक्के लोकांनी समाधानी नसल्याचं सांगितलं आहे. तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पुन्हा पंतप्रधानपदी न पाहण्याची इच्छा लोकांनी बोलून दाखवली आहे. तसेच पंतप्रधानपदी काँग्रेसमधून राहुल गांधी यांना पसंती दिली आहे पण त्यांच्या विरोधात गुजरातचेै मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याची पसंती आहे. अलीकडे होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदासाठी पुन्हा एकदा ए.पी.जे अब्दुल कलाम यांना पसंती दिली आहे. एकूणच आठ वर्षाच्या यूपीए सरकारला आता चांगलीच घरघर लागली आहे. त्यामुळे यूपीएला पुन्हा संधी मिळणार की नाही याची शक्यता अधांतरी आहे असं या सर्व्हेवरून स्पष्ट होतंय. सध्याचं यूपीए सरकार1) सध्याच्या यूपीए सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का ?हो - 38%नाही - 59% माहीत नाही - 3% 2) मनमोहन सिंग सरकार लोकांची विश्वासार्हता गमावतंय का ?हो - 66%नाही - 31% माहीत नाही - 3% 3) सरकारची विश्वासार्हता कमी होण्याची कारणंअण्णांचं आंदोलन हाताळण्यात अपयश - 21%धाडसी आर्थिक निर्णय घेण्यात अपयश - 20%भ्रष्टाचाराला आळा घालण्यात आणि घोटाळे हाताळण्यात अपयश - 17%आघाडी सरकार योग्यरीत्या चालवण्यात अपयश - 16%महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात अपयश - 11%प्रकृतीच्या कारणामुळे सोनिया गांधी मनमोहन सिंगांना सक्रिय पाठिंबा देऊ शकत नाहीत - 11%महत्त्वाच्या मुद्द्यांवर यूपीए सरकारची कामगिरी1) घोटाळे हाताळणं - सुधारणा - 13%- काहीच बदल नाही - 49%- कामगिरी घसरली - 36%- माहीत नाही - 2%2) महागाईचा सामना - सुधारणा - 8%- काहीच बदल नाही - 38%- कामगिरी घसरली - 53%- माहीत नाही - 1%3) आर्थिक विकासाचा मुद्दा- सुधारणा - 13%- काहीच बदल नाही - 40%- कामगिरी घसरली - 46%- माहीत नाही - 1%4) नक्षली हिंसाचार रोखणं - सुधारणा - 17%- काहीच बदल नाही - 44%- कामगिरी घसरली - 36%- माहीत नाही - 4%5) अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखालच्या लोकपाल आंदोलनाची हाताळणीखूपच खराब - 19%खराब - 25%साधारण - 35%चांगली - 15%उत्कृष्ट - 5%माहीत नाही - 2%6) सध्याचं यूपीए सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल?- हो - 58%- नाही - 32%- माहीत नाही - 10%7) पंतप्रधानांची कामगिरी1. स्वच्छ प्रतिमा, पण सरकार चालवण्याचं कौशल्य नाही - 29 %2. गतिहीन कारभार - 19%3. कणखर भूमिका नाही - 17%4. अस्थिर कामगिरी - 15%5. परिणामकारक, गतीमान आणि उद्देशपूर्ण - 12%6. यापैकी काहीच नाही - 6%7. माहीत नाही - 2% 9) यूपीए-2 मधली पंतप्रधानांची कामगिरी1. अत्यंत वाईट - 12%2. निराशाजनक - 27%3. सर्वसाधारण - 41%4. चांगली - 13%5. सर्वोत्तम - 2%6. माहीत नाही - 5%10) पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंगांना बदलायला हवं का ?1. होय - 55%2. नाही - 39%3. माहीत नाही - 6%11) पंतप्रधानपदासाठी यूपीएतला सर्वात योग्य उमेदवार कोण?- राहुल गांधी - 25%- मनमोहन सिंग - 20%- प्रणव मुखर्जी - 12%- पी. चिदंबरम - 6%- ममता बॅनर्जी - 4%- शरद पवार - 4%- मुलायमसिंह यादव - 3%- ए.के. अँटोनी - 3%- यापैकी कुणीच नाही - 11%- यूपीएतली एकही व्यक्ती नाही - 11%- माहीत नाही - 3%12) पुढचे पंतप्रधान बनण्यासाठी राहुल गांधींची तयारी पूर्ण आहे का? हो - 48%नाही - 43%माहीत नाही - 9%13) यूपीए सरकारला आणखी एक संधी द्यायला हवी का?हो - 38%नाही - 49%आताच सांगणं घाईचं - 9%माहीत नाही - 4%14) पंतप्रधान पदासाठी एनडीएतला सर्वात योग्य उमेदवार कोण?नरेंद्र मोदी - 39%लालकृष्ण अडवाणी - 17%सुषमा स्वराज - 10%नितीश कुमार - 5%अरुण जेटली - 5%नितीन गडकरी - 2%यापैकी कुणीच नाही - 11%एनडीएतील कुणीच नाही - 7%माहीत नाही - 4%4) राष्ट्रपती पदासाठी कोणत्या प्रकारची व्यक्ती योग्य असेल?राजकीय पार्श्वभूमीची व्यक्ती - 38%राजकीय पार्श्वभूमी नसलेली व्यक्ती - 31पार्श्वभूमी महत्त्वाची नाही - 26माहीत नाही - 5%5) पुढील राष्ट्रपती म्हणून तुम्ही कुणाला पसंती द्याल?एपीजे अब्दुल कलाम - 51%प्रणव मुखर्जी - 16%नारायण मूर्ती - 7%अमर्त्य सेन - 5%हमीद अन्सारी - 4%मीरा कुमार - 2%यापैकी कुणीच नाही - 13%माहीत नाही - 3%

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी