14 वर्षाच्या मुलीनं 52 वर्षाच्या वकिलाशी केलेलं लग्न कोर्टात ठरलं वैध

14 वर्षाच्या मुलीनं 52 वर्षाच्या वकिलाशी केलेलं लग्न कोर्टात ठरलं वैध

वयाच्या चौदाव्या वर्षी त्या मुलीनं लग्न केलं, तेही एका 52 वर्षाच्या इसमाशी. आजी-आजोबांनी बळजबरीने करून दिलेल्या या लग्नाबद्दल तक्रार नोंदवल्यानंतर त्या 52 वर्षीय वकील पतीला ताब्यातही घेण्यात आलं. पण आता कोर्टाने हा निर्णय कसा दिला....

  • Share this:

मुंबई, 6 मे : वयाच्या चौदाव्या वर्षी  त्या मुलीनं लग्न केलं, तेही एका 52 वर्षाच्या इसमाशी. आजी-आजोबांनी बळजबरीने करून दिलेल्या या लग्नाबद्दल तक्रार नोंदवल्यानंतर त्या 52 वर्षीय वकील पतीला ताब्यातही घेण्यात आलं. पण ही अल्पवयीन मुलगी आता सज्ञान झाली असून 18 वर्षांची झाल्यानंतर तिनेच कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून आपण आपल्या पतीबरोबर राहू इच्छितो असं सांगितलं. बालविवाह कायद्याच्या विरोधात असूनही कोर्टाने तिचा बालविवाह आता मान्य केला आहे.

या मुलीशी भविष्यात कोणी लग्न करणार नाही, समाज तिला बायको म्हणून स्वीकारणार नाही, म्हणून हा निर्णय देत असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने हे लग्न वैध ठरवताना सांगितलं.

14 वर्षांच्या मुलीशी लग्न करणाऱ्या त्या वकिलावर त्या वेळी बलात्काराचा कलमही लावण्यात आला होता. पण आता 18 वर्षांची झालेल्या या मुलीने आता त्याच पतीबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली. आमच्यातले मतभेद आम्ही मिटवले आहेत आणि आता माझी त्याच्याविरोधात तक्रार नाही, असं प्रतिज्ञापत्र सादर करत तिने त्याच्याबरोबर राहायला परवानगी द्यायची आणि लग्न वैध ठरवण्याची विनंती कोर्टाला केली.

दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्काराच्या घटनेने पुणे हादरले, भावाने केला...

...म्हणून प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न मोडलं

तिची विनंती मान्य करताना उच्च न्यायालयाने ही केस वेगळी असल्याचं नमूद करत, हे लग्न अवैध ठरवलं तर या मुलीशी यापुढे लग्न करायला कुणी तयार होणार नाही, असं सांगत या लग्नाला कायदेशीर मान्यता दिली. अतिरीक्त सरकारी वकील अरुणा कामत पै यांनी या मुलीच्या याचिकेला विरोध करत या निर्णयामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल आणि अवैध लग्नांचा मार्ग खुला होईल, असा आक्षेप घेतला. पण त्या स्त्रीच्या कल्याणाचा विचार करता आणि तिची इच्छा लक्षात घेत आपण हे लग्न वैध ठरवत असल्याचं न्या. रणजित मोरे आणि भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने सांगितलं.

14 वर्षांच्या त्या मुलीशी 2014  मध्ये लग्न केल्यानंतर तिच्या 52 वर्षांच्या कथित पतीला 2017 मध्ये अटक करण्यात आली.  10 महिने तो न्यायालयीन कोठडीत होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. आता त्यांचं लग्न कायद्यानं वैध ठरल्यानंतर पत्नीच्या नावाने 10 एकर जमीन करावी. शिवाय 7 लाख रुपयांचं फिक्स डिपॉझिट तिच्या नावे करावं आणि तिचं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यावी, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. पोलिसांनी आता या केससंदर्भातला तपास थांबवावा, असंही खंडपीठाने सांगितलं.

First published: May 6, 2019, 5:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading