• गोदामांअभावी हजारो मेट्रीक टन धान्य सडले !

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: May 10, 2012 05:18 PM IST | Updated On: May 10, 2012 05:18 PM IST

    रुपश्री नंदा, हरियाणा10 मेदेशात सलग तिसर्‍या वर्षी धान्याचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. पण हे धान्य साठवायचं कुठे हा खरा प्रश्न आहे. कारण धान्य साठवण्यासाठी देशात पुरेशी गोदामच नाही. गोदामांअभावी एकट्या हरियाणामध्ये तब्बल साडे तीन हजार मेट्रीक टन धान्य सडतंय.जून 2011 आणि मे 2012 या दोन्ही वर्षी हजारो मेट्रीक टन धान्य वाया गेलंय. 120 कोटी जनतेसाठी पिकवलेलं धान्य किडे-मुंग्या फस्त करतायत. पोत्यातल्या धान्याचीही पार नासाडी झाली आहे. पोतीही कुरतडल्याने धान्य उघड्यावर सांडतंय. पोत्यातून धान्य वाया जाऊ नये म्हणून त्यावर पॉलिथीन टाकणं आवश्यक असतं पण त्याचाही पत्ता नाही. सडून काळा झालेला हा गहू आता ओळखताही येत नाही. हरियाणाच्या अन्न आणि पुरवठा विभागाने खरेदी केलेला साडे तीन हजार मेट्रीक टन गहू पूर्णपणे सडलाय. त्यामुळे चार अधिकार्‍यांना निलंबितही करण्यात आलंय. पण नासाडी थांबलेली नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हाच सडलेला गहू गरिबांना रेशनवर दिला जातो. धान्याची नासाडी होतेय.. आणि सडकं धान्य गरिबांना वाटलं जातंय.. ही बाब अधिकारीही मान्य करत आहे. जिल्हा पुरवठा नियंत्रक दिवान चंद शर्मा म्हणतात, रेशनिंगचं परमिट पूर्वी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडे होता. पण आता ते फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे आहे. भागोल्याध्ये 6 लाख पोत्यात गहू भरून ठेवलाय. प्रत्येक पोत्यात 50 किलो गहू आहे. यापैकी 8 हजार पोती पूर्णपणे सडलीयत आणि वेळीच खबरदारी घेतली नाही तर उरलेल्या हजारो पोत्यातला गहूही सडेल. चौकीदार रघुवीर म्हणतो, अनेक अधिकारी आले आणि गेले पण काही उपयोग झाला नाही. पावसाळ्यात अवस्था फार वाईट असते. हरियाणात 95 हजार मेट्रीक टन धान्य हे तीन वर्ष जुनं आहे. नव्या धान्यासाठी इथे गोदामच उरलेली नाहीत. त्यामुळे काही धान्य मथुरा-आग्रा हायवेवर उघड्यावर ठेवण्यात आलंय. पाऊस पडला तर हे धान्यही वाया जाईल. याची काळजी मात्र कुणालचा असल्याचं दिसत नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading