S M L
  • दुष्काळग्रस्त भागात पाणीपुरवठा करा - राज

    Published On: May 2, 2012 04:03 PM IST | Updated On: May 2, 2012 04:03 PM IST

    02 मेमहाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसांना,जनावरांना पाण्यापासून वंचित राहवं लागतं आहे ही अत्यंत दुर्देवाची बाब आहे. मात्र आपले आमदार परदेश दौर्‍यावर निघाले आहे असल्या आमदारांवर जिल्हाबंदी घातली पाहिजे अशी टीका राज ठाकरे यांनी केली. तसेच उद्यापासून मनसेच्या सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी ज्या ज्या भागात दुष्काळ पडला आहे तिथे पाण्याचे टँकर पोहचवा, पाण्यांच्या छावण्या उभारा तुम्हाला काय लागत असेल ते आजपासून मुंबईतून पाठवण्यात येईल पण दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा झालाच पाहिजे असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. महाराष्ट्रात आज दुष्काळ परिस्थिती दिवसेंदिवसे आणखी बिकट होत चाललेली आहे. सरकारपातळीवरून मात्र अजून सुध्दा कोणतीही उपाययोजना राबवण्यात आलेली नाही. याच धर्तीवर काँग्रेसचे युवराज राहुल गांधी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून दिल्लीली परतले. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत झालेल्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात दुष्काळ, अभ्यास दौरे याचा खरपूस समाचार घेत सत्ताधारी, विरोधकांवर कडाडून बरसले. रोज दुष्काळाच्या बातम्या वाचून भीती वाटायला लागली आहे. इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाली तरी सरकारला आणि विरोधकांना याचे काहीही घेणे देणे नाही. तिकडे ते राहुल गांधी दौरा करुन गेले. पण, काय केले त्यांनी नुसता हात फिरवत दिल्लीला परतले. जर काही करायचे नसेल तर येताच कशाला असा संतप्त सवाल राज यांनी विचारला. या सत्ताधार्‍यांना दुष्काळाचे काही घेणे देणे नाही यांना बाजूला करा महाराष्ट्रातील सर्व मनसेचे सर्व आमदार,जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते यांनी ज्या ज्या भागात दुष्काळ पडला आहे तिथे पाण्याचे टँकर पाठवा,पाण्यांच्या, चार्‍यांच्या छावण्या उभारा तुम्हाला कोणतीही मदत लागली ती मुंबईतून आजपासून पाठवण्यात येईल पण काम चोखपणे पार पाडा असा आदेश राज यांनी दिला. तसेच तिथे जाऊन झेंडे मिरवू नका, भाषण तर करुच नका, आपण काही प्रचार वगैरे करत नाही आहोत दुष्काळाची परिस्थिती समजून घ्या त्याप्रमाणे कृती करा आणि कामाला लागा मी सहा-सात दिवसांनी ज्या भागात आपण काम केले आहे त्या गावांचा दौरा करणार आहे असं राज यांनी सांगितले. कसले अभ्यास दौरे करतात ?- राजनेमका मे महिना सुरु झाला की, एक एक आमदार अभ्यास दौर्‍यासाठी परदेश वारीवर निघतात, पण हे आमदार नेमक काय अभ्यास करतात ? इकडे दुष्काळ पडलाय आणि यांना काय परदेश दौर्‍याचे पडले आहे. बर हे दौरा करुन येतात तर यांना सरकारने कधी विचारले का ? काय शिकून आलात सगळा ढोंगीपणा चालला आहे. यामुळे असल्या अभ्यास दौर्‍याला मनसेच एकही आमदार जाणार नाही असं राज यांनी स्पष्ट केलं. असे दौरे करणार्‍या आमदारांना जिल्हाबंदी केली पाहिजे असंही राज म्हणाले.शिकार्‍यांना रस्त्यावर फोडून काढा - राजमागिल आठवड्यात ताडोबा वाघ्र प्रकल्पात दोन पट्टेदार वाघांची शिकार्‍यांच्या जाळ्यात अडकल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला. राज ठाकरे यांनी असल्या शिकार्‍यांचा थेट धमकी दिली. पाणी पिण्यासाठी येणार्‍या या मुक्या प्राण्याला फास टाकून ठार केले जाते. इतका सुंदर प्राणी ज्याची संख्या आता कमी राहिली आहे अशा प्राण्यांना ठार मारले जाते ते पण त्याच्या कातडीच्या तस्करीसाठी हे अत्यंत निदंनिय आहे अशा शिकार्‍यांना पकडून भर रस्त्यावर फोडून काढा असा माझा आदेश आहे असं राज यांनी ठणकावून सांगितले. वनप्रेमी,प्राणी संघटनांच्या भेटी घ्या त्यासाठी उपाययोजना करा असंही राज यांनी कार्यकर्त्यांना सुचना केली. तसेच मागे ताडोबामध्ये सहा हजार हेक्टर एवढं जंगल जाळून टाकण्यात आलं. जंगल जाळून या लोकांना त्याखालील खाणी खोदून काढायच्या यासाठी हा सगळा खटाटोप चालला आहे असा आरोप राज यांनी केला.मनसेत फेरबदल मनसेत काही बदल करण्यात आले आहे. विभागिय संपर्क नेतपद रद्द करण्यात आले आहे. यापुढे मुंबई,पुणे, ठाणे आणि नाशिक इथले सगळे नगरसेवक लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख म्हणून काम पाहणार असतील असं राज यांनी जाहीर केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close