• शाहरुखची प्रतिक्रिया

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Apr 13, 2012 05:33 PM IST | Updated On: Apr 13, 2012 05:33 PM IST

    12 एप्रिलबॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची न्युयॉर्क विमानतळावर दोन तास चौकशी करण्यात आली. झालेल्या प्रकाराबद्दल अमेरिकेने दिलगिरी व्यक्त केली आहे.अमेरिकेच्या सिमा शुल्क आणि सुरक्षा विभागाने दिलगिरी व्यक्त केली. आज सकाळी किंग खान शाहरुखला विमानतळावर पुन्हा एकदा चौकशीला पुढ जाव लागल्यामुळे जगभरासह देशातील चाहत्यांनी एकच नाराजी व्यक्त केली.2009 साली अमेरिकेत विमानतळावर शाहरुख खानची दोन तास कसून चौकशी करण्यात आली होती. आज दोन वर्षानंतर पुन्हा एकदा हाच अनुभव शाहरुखला अनुभवावा लागला. येल विद्यापीठात व्याख्यानासाठी शाहरुख सकाळी निता अंबानी यांच्यासोबत पोहचला. निता अंबानी यांची कन्या येन विद्यापीठात शिक्षण घेत आहे. व्हाईट प्लेन विमानतळावर दाखल झाल्यानंतर शाहरुख खानला थांबवून ठेवण्यात आलं तर इतर प्रवाशांना सोडून देण्यात आले. तब्बल दोन तास शाहरुखची चौकशी करण्यात आली. याप्रकाराबाबत येन विद्यापीठाच्या अधिकार्‍यांना माहिती होताच त्यांनी विमानतळाच्या अधिकार्‍यांशी ताबडतोब संपर्क साधला. यानंतर शाहरुखला सोडून देण्यात आलं. पण झालेल्या प्रकारमुळे मनस्ताप झाल्याचं शाहरुखने सांगितलं. या प्रकारानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस एम कृष्णा यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.तसेच अमेरिकेत वारंवार अश्या पध्दतीने भारतीयांना चौकशीसाठी थांबवण्यात येतं, आणि नंतर माफी मागण्यात येते या संदर्भातसुद्दा पाठपुरावा करणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी