• राज यांचे नितीश कुमारांना थेट आव्हान

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Apr 12, 2012 05:43 PM IST | Updated On: Apr 12, 2012 05:43 PM IST

    12 एप्रिल22 मार्चला बिहार दिन झाला तो 15 एप्रिलला मुंबईत साजरा करायची काय गरज आहे. मुंबईही काय धर्मशाळा आहे का ? कोणीही यावे आणि कोणताही दिन साजरा करावा अशीच जर नितीश कुमार यांना नाटकं करायची असेल तर मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवावाच असं जाहीर आव्हान राज ठाकरे यांनी दिले. तुम्हाला वाटत असले मी काय करणार तर ते 15 तारखेला पाहाच काय होते ते असा खणखणीत इशाराही राज यांनी दिला. तसेच गृहमंत्री आर.आर.पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीश कुमार यांना फोन करुन बिहार दिन तिकडेच साजरा करा असं सांगावे असं आवाहनही राज यांनी केलं. मालेगावमध्ये झालेल्या निवडणूक प्रचार सभेत राज ठाकरे बोलत होते. मला मुंबईत येण्यापासून कोणी रोखू शकत नाही. यासाठी मला व्हिसा लागणार नाही असं सांगत बिहार दिन मुंबईत साजरा करणार असल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मनसेला जाहीर आव्हान दिलं. नितीश कुमार यांच्या आव्हानाचा समाचार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या शैलीत तोफ डागली. बिहार दिनाबद्दल मी काही बोललो नव्हतो. यांना कोणी बोललं नाही. पण आता सांगतो, नितीश कुमार यांनी अशी नाटकं करायचे असेल तर मुंबईत बिहार दिन साजरा करूनच दाखवावाच असा इशारा राज यांनी दिला. बिहार दिनाला 100 वर्ष 22 मार्चला पूर्ण झाली याचा आम्हालाही आनंद आहे. पण तो 15 एप्रिलला काय म्हणून साजरा करायचा ? मुंबईत जर कोणता दिवस साजरा करायचा असेल तर त्यासाठी पहिला मराठी माणसाचा व्हिसा लागेल. कोणीही येणार आणि राजकारण करणार हे मुळीच खपवून घेतले जाणार नाही. आमच्याही महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण झाली. मग आम्ही बिहारमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करा असे म्हटलं नाही. आज बिहारचे लोकं आली. उद्या युपीवाले येतील ही काय धर्मशाळा आहे का ? असा खणखणीत सवाल राज यांनी उपस्थित केला. तसेच या राजकारण्यांचा डोळा य्परप्रांतीयांच्या मतांवर आहे. विधानसभेच्या निवडणुकीत अबू आझमी नावाचा 'सागर गोटा' एकाच वेळी दोन वेगवेगळ्या मतदार संघातून निवडून येतो हे कोणाच्या बळावर निवडून येतात. आमचे मराठी राजकीय पक्षही त्यांचा मेजोरिटी जास्त आहे. म्हणून त्यांना तिकीट देतात असं तकलादू उत्तर देतात. तिथे मराठी माणसाला का तिकीट दिले जात नाही. जर मराठी माणसाला ही लोक मतं देत नसेल तर यांच्या मनात काय आहे यावरुन स्पष्ट होते. मला कोणतेही राज्य तोडायचे नाही. या देशाचा अखंडपणाला काही ठेच पोहचवायची नाही. पण परप्रांतीयाच्या मतासाठी राजकारण खेळणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी मी हे सगळे करतो आणि करत राहणार असंही राज यांनी स्पष्ट केलं. तसेच येत्या 15 एप्रिलला बिहार दिन साजरा करून दाखवावाच मग बघा काय करुन दाखवतो. मला अटक होण्याची भीती नाही या अगोदरही मला अटक झाली आणि त्यानंतर काय घडले हे अख्या देशाने पाहिले होते. आताही मी आपल्या राजकारण्यांना आणि गृहमंत्री आर.आर.पाटील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, नितीश कुमार यांना फोन करुन सांगावे की बिहार दिन तिकडेच साजरा करा असं आवाहनही राज यांनी केलं. परप्रांतीयांमुळे मालेगाव अतिरेक्यांचा अड्डा बनला - राजपाकिस्तान, बांगलादेश येथून लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रसह देशभरात पसरली आहे. कोठेही बॉम्बस्फोट झाला तर त्याचा शोध घेण्यासाठी मालेगावकडे पाहिले जाते. त्यामुळे मालेगाव हा अतिरेक्यांचा अड्डा बनला आहे. याचा कोणाच थांगपत्ता नाही. पण ही सगळी अवस्था राजकारण्यामुळे झाली आहे. मालेगावाच्या या अवस्थेला राजकारणी जबाबदार आहे असा गंभीर आरोप राज यांनी केला. राजकारणी प्रॉपर्टी जमा करण्यात व्यस्त - राज राज्यात आज पाण्याची गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पण याला परप्रांतीयच जबाबदार आहे. याबद्दल राजकारण्यांना काहीच घेणं देणं नाही. हे राजकारणी आज प्रॉपर्टी गोळा करण्यात व्यस्त झाली आहे. एक-एका मंत्र्यांकडे 5-5 हजार एकर जमिनी जमा केल्या आहे. डोंगरची डोंगर आपल्या आणि आपल्या नातेवाईकांच्या नावे करण्यात व्यस्त झाली आहे. आज परप्रांतीयांना मोफत घरं मिळत आहे पण पोलिसांना घर मिळत नाही असा आरोपही राज यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी