S M L
  • कॅन्सरवर मात करुन युवी परतला

    Published On: Apr 9, 2012 11:28 AM IST | Updated On: Apr 9, 2012 11:28 AM IST

    09 एप्रिललढवय्या युवराज सिंगचं अखेर भारतात आगमन झालं आणि त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तीन महिन्यापूर्वी अमेरिकेला कॅन्सरवरील उपचारासाठी गेलेला भारतीय क्रिकेटचा धडाकेबाज बॅट्समन पुन्हा मायदेशी परतला होता. तब्येत थोडी उतरली होती पण चेहर्‍यावरचा उत्साह कमी झाला नव्हता. काहीही झालं तरी झोकात आपण पुनरागमन करु हेच आज युवी सांगत होता. विमानतळावरुन युवी थेट त्याच्या घरी गेला. पण तिथंही आधीपासून तयार असलेल्या मीडिया आणि त्याच्या फॅन्सनं त्याला गराडा घातला. आणि त्यानं फॅन्सना निराशही केलं नाही. घराच्या गच्चीवरुन त्यानं सर्वांना अभिवादन केलं. गेले काही महिने या चॅम्पियनसाठी खूप कठीण होते. केमोथेरपीचा त्याच्यावर झालेला आता परिणाम स्पष्टपणे दिसत होता.पण युवीनं या सगळ्यावर मात केली. आणि या कठीण काळातही त्याचे सर्व मित्र त्याच्या पाठिशी तितकेच खंबीरपणे उभे राहीले. त्याचा माजी कॅप्टन अनिल कुंबळेनं अमेरिकेत जाऊन भेट घेतली. तर लंडनमध्ये युवराज त्याचा आदर्श सचिन तेंडुलकरला भेटला.आणि यातूनचं युवीनं प्रेरणा घेतली.आता मायदेशी परतल्यावर युवराजला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला गेला. बुधवारी युवराज मीडियाशी संवादही साधणार आहे. युवराजच्या आयुष्याची दुसरी इनिंग आता खर्‍या अर्थानं सुरुवात झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close