• होम
  • व्हिडिओ
  • मराठवाड्यात दहशतवाद्यांचं नवं मॉड्युल उजेडात
  • मराठवाड्यात दहशतवाद्यांचं नवं मॉड्युल उजेडात

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Mar 27, 2012 03:33 PM IST | Updated On: Mar 27, 2012 03:33 PM IST

    27 मार्चसोमवारी मोहम्मद अब्रार या अतिरेक्याला औरंगाबाद एटीएसने अटक केल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये असलेले त्यांचे नेटवर्क समोर येतंय. मोहम्मद अब्रार हा 2008 मध्ये झालेल्या अहमदाबाद बाँम्बस्फोटानंतर तो मोस्ट वाँटेड होता. मात्र त्यानं महाराष्ट्राचा आश्रय घेतल्यानं आतापर्यंत तो पोलिसांच्या हाती लागला नाही अशी कबुली खुद्द अब्रार यांनीच औरंगाबाद पोलिसांनी दिली. अकोला एटीएसने आज दोन संशयित अतिरेक्यांना अटक केली.औरंगाबादपाठोपाठ अकोला एटीएसनं संशयित अतिरेक्यांना केलेल्या अटकेमुळे मराठवाड्यात अतिरेक्यांचं नवं मॉड्युल कार्यरत असल्याचं उजेडात आलंय. औरंगाबाद एटीएसनं अटक केलेला मोहम्मद अब्रार हा अतिरेकी बॉम्बस्फोट घडवण्याबरोबरच 20 गुन्ह्यांत मोस्ट वॉन्टेड आहे. अब्रार हा नागपूर, चिखली औरंगाबादसह महाराष्ट्रातल्या वेगवेगळया शहरात मुक्कामाला होता. गेल्या वर्षभरापासून अब्रारनं पैसे मिळवणे आणि संघटन वाढवणे भर दिला. त्यासाठीच औरंगाबादमध्ये सोमवारी त्याची आर.बी (RB) म्हणजेच गुप्त मिटिंग त्यानं ठेवली होती. अब्रार हा मोबाईल वापरणे टाळायचा, शिवाय तो रेल्वेनं प्रवास करायचा. त्यामुळे पोलिसांच्या हातावर तो आतापर्यंत तुरी देत आला. औरंगाबाद हे अतिरेक्यांसाठी स्लिपर सेल मानले जाते, त्याचठिकाणी या सगळया गोष्टी करणं त्याला सोपं होतं. त्यासाठीच त्यानं औरंगाबाद सेंटर करण्याचा प्रयत्न सुरु केला होता.सोमवारच्या एन्काउंटरनंतर एटीएसने शहरातील वेगवेगळया भागामध्ये तपासणीला सुरुवात केली. यात आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलंय. मध्य प्रदेश पोलिसांची टीमही औरंगाबादमध्ये दाखल झाली आहे. या टीमकडून ठार झालेला संशयित खलिल कुरेशी, मोहमद शाकेर आणि मोहमद अब्रार यांच्याबाबत अधिक तपासणी सुरू आहे.दुसरीकडे अकोला एटीएसनं बुलडाणा जिल्ह्यातल्या सैलानी यात्रेत फिरत असलेल्या दोन संशयितांना अटक केली. अकिल मोहम्मद खल्जी आणि मोहम्मद जफर हुसेन अशी त्यांची नावं आहेत. त्यांना चौकशीसाठी अकोल्यात आणण्यात आलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी