• सचिनची 'फटकेबाजी'

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Mar 25, 2012 04:42 PM IST | Updated On: Mar 25, 2012 04:42 PM IST

    25 मार्चक्रिकेटमध्ये मला निवृत्ती कधी घ्यायची आहे ते मी ठरवणार, मी क्रिकेटला सुरुवात केली तेंव्हा काही टीकाकारांना विचारून केली नाही. माझे गुरू आणि माझ्या मेहनतीच्या बळावर मी इथं पर्यंत पोहचू शकलो आहे त्यामुळे इतरांनी सल्ला देऊ नये असा खणखणीत टोला सचिन तेंडुलकरने टीकाकारांना लगावला. रेकॉर्ड हे नेहमी तोडण्यासाठी असतात माझ्या महाशतकाचा रेकॉर्ड जर कोणी तोडणारा असेल तर तो भारतीय असावा असंही सचिन म्हणाला.आशिया कप क्रिकेट स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं महाशतकाला गवसणी घातली आणि देशभर एकच जल्लोष साजरा झाला. महाशतकाला एक आठवडा उलटून गेलाय, पण अजूनही महाशतकाचा हा जल्लोष ओसरलेला नाही. याचनिमित्तानं आज मुंबईत सचिनच्या महाशतकाचं सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलं होतं. महाशतकानंतर सचिनची पहिल्यांदाच पत्रकार परिषद झाली. आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना सचिनने दिलखुलास उत्तरंही दिली. यावेळी सचिन म्हणतो, माझं क्रिकेटवर नितांत प्रेम आहे त्यामुळे मी सदैव खेळत राहणार पण लोकं मला नेहमी निवृत्तीचा सल्ला देतात पण त्यांचे मत हे मत असते ते नेहमी खरे असेल असं नाही त्यामुळे मी खेळत राहतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे निवृत्ती कधी घ्याची आहे हे मीच ठरवेन मी काही टीकाकारांना विचारून मैदानात उतरलो नाही त्यांनी उगाच सल्ला देऊ नये असा खणखणीत टोला सचिनने टीकाकारांना लगावला. तसेच ज्या दिवशी महाशतक झाले तेंव्हा टीममध्ये कोणताच जल्लोष झाला नाही. आम्ही सर्वजण मॅच कशी जिंकायची याला पहिले प्राधान्य देतो. टीम मिटिंग होते तेंव्हा याचा विचार नेहमी केला जातो त्यामुळे मला माझ्या रेकॉर्डपेक्षा टीम जिंकणे महत्वाचे आहे. यावेळी आयबीएन लोकमतचे स्पोर्टस एडिटर संदीप चव्हाण यांनी यापुढे क्रिकेट करिअरमध्ये तुला वनडे किंवा टेस्ट असा पर्याय असणार आहे का ? असा सवाल विचारला असता सचिन म्हणाला की, टेस्ट क्रिकेट खूप चॅलेंजिंग आहे. वनडेमध्ये फिजिकल चॅलेंज असतं तर टेस्टमध्ये मेंटली परफेक्ट राहावं लागतं त्यामुळे माझी पसंती ही टेस्टला असेल. जगातल्या कोणत्याही खेळाडूला तुम्ही विचारले तर तो टेस्ट क्रिकेटलाच प्राधान्य देईल त्यामुळे मीही काही याबद्दल वेगळं सांगू शकणार नाही असंही सचिनने स्पष्ट केलंय. रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच असतात त्यामुळे महाशतकाचा रेकॉर्ड जर कोणी तोडणार असेल तर तो भारतीयच असावा असंही सचिन म्हणाला. तसेच माझे क्रिकेटवर खूप प्रेम आहे मी त्यासाठी सदैव खेळत राहील पण मैदानावर,टीममध्ये माझ्या खेळाची पॅशन कमी वाटेल, तेंव्हा मी निवृत्तीचा विचार नक्की करेन आणि जेंव्हा तुम्ही यशाच्या उंच शिखरावर असतात तेंव्हा तुम्ही निवृत्ती घेणे म्हणजे स्वार्थीपणा ठरेल अशा वेळी टीमसाठी, देशासाठी खेळणे महत्त्वाचे आहे असंही सचिन म्हणाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close