• कोण होता शालिवाहन ?

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Mar 23, 2012 05:03 PM IST | Updated On: Mar 23, 2012 05:03 PM IST

    माधव सावरगावे, औरंगाबाद23 मार्चआजचा गुढीपाडवा... हा शालिवाहन शक 1934 चा वर्षांरभ..पण हा शालिवाहन कोण होता ? आपण मराठी माणसं त्याच्या नावाने कालगणना का करतो ? 2000 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात असं काय झालं, ज्यामुळे मराठी वर्षाला सुरुवात झाली? असे अनेक प्रश्न आपल्याला कदाचित पडलेही नसतील. आणि याचीच खंत इतिहासकार व्यक्त करत आहे. कारण महाराष्ट्राच्या या सुवर्णयुगाबद्दल आजही अनेकांना माहिती नाही.ठिकाण नाशिक..वर्ष इसवी सन 78..मध्य आशियातल्या शकांनी हल्ला चढवला होता. आणि त्यांना परतवून लावण्याचं आव्हान होतं पैठणच्या गौतमीपुत्रासमोर.. आणि त्यानं ते मोठं आव्हान लीलया पेललं..तेव्हापासूनच.. महाराष्ट्रात.. गौतमीपुत्राच्या शालिवाहन या कुळाच्या नावाने कालगणना सुरू झाली.शालिवाहन कुळातला गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वांत पराक्रमी राजा...प्रतिष्ठान.. म्हणजेच आताचं औरंगाबाद जिल्ह्यातलं पैठण ही त्याची राजधानी. आताचा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश एवढं त्याचं विस्तीर्ण साम्राज्य होतं. राजकीय स्थैर्यामुळे व्यापार थेट युरोपापर्यंत पोचला होता. महाराष्ट्रातल्या कापडांना आणि वस्तूंना अगदी रोममध्ये मागणी होती. सुमारे 450 लेण्यांची निर्मिती सुरू होती. पैठणमध्ये सापडलेल्या या नाण्यांवरूनच.. त्यावेळच्या सुबत्तेची कल्पना येते.इतिहासकार रा श्री मोरवंचीकर यांनी गौतमीपुत्र आणि संपुर्ण शालिवाहन कुळाचा अभ्यास केला. ते सांगतात की, शालिवाहन हे महाराष्ट्राच्या सलग इतिहासातलं पहिलं पराक्रमी घराणं. तसंच गौतमीपुत्र या शालिवाहन राजानं संस्कृतपेक्षा प्राकृत. म्हणजेच तेव्हाच्या मराठीच्या रूपाला पहिल्यांदाच चालना आणि राजाश्रयही दिला.पैठणच्या आणि औरंगाबादच्या संग्रहालयात गौतमीपुत्र आणि इतर शालिवाहन राजांच्या काळातल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. किमान गुढीपाडव्याच्या दिवशी तरी आपण या आद्य मराठी शुरांचं स्मरण नक्कीच करायला हवं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading