• ..तर सरकारचा पाठिंबा काढून घेऊ-ममता बॅनर्जी

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Mar 19, 2012 05:47 PM IST | Updated On: Mar 19, 2012 05:47 PM IST

    19 मार्चसरकारमध्ये अपमानकारक वागणूक मिळाली तर सरकारचा पाठिंबा काढून घेऊ असा इशारा ममता बॅनजीर्ंनी दिला आहे. आयबीएन नेटवर्कचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत ममता बॅनजीर्ंनी इतरही अनेक विषयांवर आपली स्पष्ट मतं व्यक्त केली. राजदीप सरदेसाई - तुम्ही अजूनही यूपीए-2चा भाग आहात, तुम्हाला या सरकारला धक्का पोहोचवायचा नाहीये, तुम्ही तसं कबूलही केलंय, मग?ममता बॅनर्जी - आम्ही बांधील आहेत, कारण आम्ही निवडणुका एकत्र लढवल्या आहेत आणि मी दिलेल्या शब्दाला जागणारच आहे. अर्थात जोपर्यंत त्यांना हवं असेल आणि आम्हालाही मान मिळत असेल, तोपर्यंत आम्हीही त्यांचा आदर ठेवू. अपमान होणार असेल, तर मात्र वेगळा निर्णय घ्यावा लागेल.राजदीप सरदेसाई - सरकारची धोरणं पंतप्रधान आणि अर्थमंत्री ठरवणार की ममता बॅनर्जी?ममता बॅनर्जी - हे बघा, एखादा नेता मंत्री म्हणून सरकारमध्ये पक्षाचं प्रतिनिधित्त्व करतो, तेव्हा सरकारचे धोरणात्मक निर्णय पक्षाला कळवणं हे त्याचं कर्तव्य आहे. किमती वाढवल्या, बजेटची तरतूद हे नका सांगू, पण धोरणात्मक निर्णय तरी सांगाल की नाही ?राजदीप सरदेसाई - तुम्हाला काहीच कळवण्यात आलं नाही ?ममता बॅनर्जी - काहीच नाही...बरं ठीक आहे, नका कळवू पण गरिबांना डोळ्यासमोर ठेवून तरी काम करा !राजदीप सरदेसाई - लोक म्हणतात की रेल्व मंत्रालय जणू काही ममतांची खासगी मालमत्ता झाली. रेल्वेमंत्र्यांचं काय करायचं ते त्याच ठरवणार, कुणाला करायच हे पंतप्रधानमंत्र्यांपेक्षाही त्याच ठरवणार...ममता बॅनर्जी - बरोबरच...मग सोनियांनी का बरं ठरवलं देशाचा पंतप्रधान कोण असावा, गृहमंत्री कोण असावा , अर्थमंत्री कोण असावा ...कारण त्या पक्षाच्या नेत्या आहेत, अध्यक्ष आहेत...मग मी वेगळं काय केलं ?राजदीप सरदेसाई - पण पंतप्रधानांनीही रेल्वेमंत्री कोण असावा ते ठरवायच नाही ?ममता बॅनर्जी - नाही...अजिबात नाही..कारण हे आघाडी सरकार आहे. काँग्रेस ही काही सिंगल लार्जेस्ट पार्टी नाही. हे अनेक पक्षांचं आघाडीचं सरकार आहे. लक्षात घ्या...काँग्रेसने माझ्या व्यवहारात ढवळाढवळ करू नये, मीही करणार नाही..राजदीप सरदेसाई - मग रेल्वे मंत्रालय काय फक्त तृणमूल काँग्रेसचं आहे?ममता बॅनर्जी - नाही... हे पहा, आम्हाला फक्त एकच कॅबिनेट मंत्रीपद आहे. एवढंच एकमेव त्यांनी आम्हाला दिलंय. 10 खासदार असलेल्या पक्षाला यूपीए 2 मध्ये दोन-दोन, तीन-तीन अगदी पाच पाच मंत्रीपद आहेत. आमचे 20 खासदार आहेत, मंत्रीपद मात्र एकच ! तेव्हा रेल्वेमंत्री पद आमच्यासाठी आहे, महत्त्वाचं आहे...आम्ही इतर कुठलीही मंत्रीपद मागितलेली नाही. ती सोनिया गांधींची निवड आहे, कारण त्या काँग्रेसच्या नेत्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी