• अखिलेश यादव यांची चोख कामगिरी

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Mar 6, 2012 04:29 PM IST | Updated On: Mar 6, 2012 04:29 PM IST

    06 मार्चउत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या यशाचे शिल्पकार ठरले ते त्यांच्या पक्षाचे तरुण नेते अखिलेश यादव...समाजवादी पक्षाचा तरुण चेहरा...मिळालेल्या यशाचा चेहर्‍यावर दिसणारा आनंद...पण त्यातही भविष्यातल्या जबाबदारीचं असलेलं भान..उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाची एकहाती धुरा सांभाळली ती अखिलेश यादव यांनी.अमरसिंह जसे पक्षातून बाहेर पडले, त्यानंतर अखिलेशनं पक्षाची कमान सांभाळली आणि संघटनात्मक ढाचाच बदलून टाकला. एवढंच नाही, तर पक्षातल्या नेत्यांवर जबाबदारीनं विश्वासही टाकला. त्याचंच हे यश...समाजवादी पक्षाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी आहे, त्यातच त्यांना यावेळी स्पष्ट बहुमत मिळालंय. त्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होताहेत. त्यावर या तरुण नेत्यानं दिलेलं उत्तर..अखिलेश यादव म्हणतात, हम भरोसा दिलाते है की कोई भी व्यक्ती. उत्तरप्रदेशच्या संपूर्ण निवडणुकीत मुलायम सिंह यांनी निवडणुकीची धुरा अखिलेशवर सोपवली होती. पण मुलायम सिंह पडद्यामागून या सगळ्यावर लक्ष ठेवून होते. त्यांनी या सगळ्याचं यशाचं श्रेय अखिलेशला दिलंय.अखिलेशचा उत्तरप्रदेशातला झंझावात पाहून काँग्रेसनं त्यांच्या युवराजांना मैदानात उतरवलं. पण फायदा काहीच झाला नाही, उलट युवराजांवर अपयशाचं खापर कसं फोडायचं म्हणून नेतेच जबाबदारी स्वीकारताना दिसत होते. काँग्रेस राहुल गांधींना जरुर उत्तरप्रदेशचा चेहरा म्हणून उतरवत असलं, तरी आजच्या निकालावरुन भविष्यात अखिलेश हाच उत्तरप्रदेशचा नेता असेल हे स्पष्ट दिसतंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी