S M L
  • फ्रायडे रिलीजचा 'मॅटर'

    Published On: Mar 1, 2012 05:36 PM IST | Updated On: Mar 1, 2012 05:36 PM IST

    01 मार्चपुन्हा एकदा वीकेण्ड जवळ आला आहे. आणि यावेळी सिनेमांचे बरेच ऑप्शन्स आहेत. मराठी सिनेमा रिलीज होतोय मॅटर.. परिस्थितीमुळे गुन्हेगारीकडे वळलेल्या तरुणांची ही कथा.. जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर, राजेश श्रृंगारपुरे, सुशांत शेलार, समीर धर्माधिकारी अशी बरीच मोठी स्टारकास्ट सिनेमात आहे. सिनेमात मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत जितेंद्र आव्हाड आहेत. सिनेमात एकूण 11 गाणी आहेत. मॅटर प्रेक्षकांना किती मॅटर करतोय, ते पाहायचं.गुन्हेगारी जगाचं आणखी एक बाजू दाखवणारा बॉलिवूडचा 'पान सिंग तोमार' हा सत्यकथेवरचा सिनेमा.. मध्य प्रदेशातला राष्ट्रीय विजेता धावपटू डाकू कसा बनला यावर हा सिनेमा आहे. इरफान खाननं मुख्य भूमिकेतला चढउतार दाखवला आहे. त्याच्यासोबत आहे माही गिल. तिगमांशू धुलियाचं दिग्दर्शन आहे. तर याआठवड्यात तुम्हाला लंडन पॅरिस न्यूयॉर्क अशी सफर करता येईल. पाकिस्तानी अभिनेता अली जाफर आणि आदिती राव हैदरी यांच्या भूमिका असलेला रोमँटिक सिनेमा. हिरो- हिरॉइन्सचा रोमान्स पाहत तीन शहरांचा प्रवासही करता येईल. तर दुसरीकडे हॉलिवूडचा 'द आयर्न लेडी' या सिनेमाचा यावेळी मोठा ऑप्शन आहे. मेरी स्ट्रीप या अभिनेत्रीला या सिनेमासाठी ऑस्कर ऍवॉर्ड मिळालंय. माजी ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचरची तिनं भूमिका साकारली आहे. या वीकेण्डला मराठी, हिंदी, इंग्लिश असे सिनेमे रिलीज होतायत. त्यामुळे चांगले ऑप्शन्स आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close