UPAच्या 'सर्जिकल स्ट्राईक'वर नरेंद्र मोदींची ही आहे पहिली प्रतिक्रिया

UPAच्या 'सर्जिकल स्ट्राईक'वर नरेंद्र मोदींची ही आहे पहिली प्रतिक्रिया

'सर्जिकल स्ट्राईकसारखे निर्णय घ्यायला मनगटात ताकद लागते, ती धमक काँग्रेसमध्ये नाही.'

  • Share this:

सीकर (राजस्थान) 03 मे : लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित करत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने काल पत्रकार परिषद घेऊन यादीच जाहीर केली. एवढच नाही तर ज्या दिवशी सर्जिकल स्ट्रईक झालेत त्याच्या तारखाही जाहीर केल्यात. त्यावर मोदींनी काँग्रेसवर आज पलटवार केलाय. काँग्रेसचे सर्जिकल स्ट्राईक हे फक्त कागदावरच होते. ते कुणालाच माहित नाही अशी टीका त्यांनी केली.

राजस्थानमधल्या सीकर इथं प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, काँग्रसने काल युपीच्या काळात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकची यादी जाहीर केली. नेमके किती हल्ले केलेत हेच त्यांना माहित नाही. तीन हल्ले की सहा यातच त्यांच्यात मतभेद आहेत. हे हल्ले केव्हा झाले ते लष्कर, पकिस्तान, दहशतवादी आणि सरकार असं कुणालाच माहित नाही.

काँग्रसची कारवाई ही कागदावरच होती. व्हीडीओ गेम खेळण्यातलं युद्ध आणि प्रत्यक्ष केली जाणारी कारवाई यातला फरकच काँग्रेसला माहित नाही. कचखाऊ धोरण असणारी काँग्रेस काय धाडस दाखविणार असा सवालही त्यांनी केला.

माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शन ही योजना द्यायला काँग्रेसने 40 वर्ष लावली. सैन्याच्या शौर्याचं युद्ध तयार व्हायला 70 वर्ष लावली.

काँग्रेसच्या एका नेत्याने सैन्याच्या प्रमुखाला गल्लीतला गुंड म्हटलं. वायुसेनेला खोटारडे म्हटले त्यांना लष्कराबद्दल प्रेम नाही असा आरोपही त्यांनी केला. देशाचे धाडसी सैनिक जेव्हा दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारतात तेव्हा काँग्रेस त्यांना विचारतो की किती दहशतवादी मेले याचा पुरावा द्या हे विचारताना काँग्रेसला लाज कशी वाटत नाही अशी टीकाही त्यांनी केली.

First published: May 3, 2019, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading