• उध्दव ठाकरे यांची मुलाखत

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Feb 15, 2012 07:08 PM IST | Updated On: Feb 15, 2012 07:08 PM IST

    15 फेब्रुवारीपोलिसांवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दबाव आहे. मुख्यमंत्री हा एका पक्षाच्या प्रचारासाठी उतरत आहे हाच मोठा भ्रष्टाचार आहे असा आरोप उध्दव यांनी केला. तसेच राज बाळासाहेबांना भेटायला येणे याला आपला आक्षेप नाही. बाळासाहेबांना सगळ्याच पक्षाचे नेते भेटायला येतात. म्हणे शंभर पावलं पुढे येईन पण असा व्यायाम तर सगळेच जण करत असतात असा टोलाही राज यांना लगावला. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आयबीएन लोकमतला खास मुलाखत दिली. निवडणुकांच्या प्रचार तोफा थंडावल्या आहे. पण या प्रचार ठसा उमटला तो ठाकरे विरुध्द ठाकरे सामान्याचा. आज शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांची आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी विशेष मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करायचे, कोणत्याही विषयाला हात घालायचा. निवडणुकीचा काळा आहे तर निवडणुकीवर बोलावे. मी वचननामा सादर केला. त्यांचा कुठे आहे ? उगाच वाटेल ते आरोप करत बसायचे याला काही अर्थ नाही. आम्ही जर पैसे घेऊन काम करत होतो तर राज सेनेच्या बाहेर का गेला. हे सांगत उध्दव यांनी एका वृत्तपत्रात मनसेविरोधात आलेल्या बातमीचा पुरावाच दाखवला. त्यांच्या पक्षात 'खळ्ळ फट्याक' भाषा वापरली जाते. पण असे आरोप शिवसेनेवर कधी झाले नाही असा टोलाही उध्दव यांनी लगावला. मी राजला कधीच माफ करणार नाही. ते शंभर पावलं पुढे चालतात असा एक व्यायाम सगळेच करतात. बाळासाहेबांना शरद पवार, विलासराव देशमुख, छगन भुदबळ यासारखे नेते भेटायला येतात. पण ते विरोधातच असतात. त्यात राज आला तरी मला काही वाटण्यापेक्षा बाळासाहेबांना काय वाटते हे महत्वाचे आहे असं स्पष्ट मत उध्दव यांनी मांडलं. त्याच बरोबर निवडणुकांच्या काळात बोगस नोटा वापरतात आम्ही याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेचे एक उमेदवार राहुल शेवाळे यांना रात्रभर डांबून ठेवलं, शिवसेनेच्या वरळी ऑफिसचं कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं तिकडे काय दहशतवादी लपले होते का ? यांना काँग्रेसचे उमदेवार सापडत नाही का ? तिकडे अमरावतीत कँाग्रेसचे 1 कोटीचं गभाड सापडलं. त्याचं काय ? निवडणुकीमध्ये मत विकत घेण्यासाठी पैशांचा वापर होतोय, हे फार भयानक आहे आणि त्याचा जाब विचारायला गेलो तर आमच्यावरच गुन्हे दाखल होतात, ही कुठली लोकशाही आहे असा संतप्त सवाल उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांचे धाबे दणाणले आहे ते म्हणतात, पोलीस दबावाखाली काम करत आहे. पण कोणाच्या दबावा खाली काम करत आहे. गृहखातं यांच्याकडेच आहे. यांची पोलिसांवर पकड राहिली नाही, यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे असा आरोपही उध्दव यांनी केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इतक्या खालच्या पातळीवर येऊन राजकारण करण्याची काय गरज पडली आहे. इतके दिवस काय झोपले होते का ? तिकडे विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत होत्या त्यावेळेस हे भर सभेत झोपा काढत होते आणि हे जगाने पाहिले. आज संपूर्ण मंत्रालय मोकळे झाले आहे. सगळे मंत्री पालिका, जि.प.च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. म्हणजे राज्यात काय सगळ्या समस्या,प्रश्न संपले आहे का ? जनतेची काम कोण करणार जर हे मंत्रालय सोडून फिरत असतील. मुळात मुख्यमंत्री हा एका पक्षाच्या प्रचारासाठी उतरत आहे हाच मोठा भ्रष्टाचार आहे असा आरोप उध्दव यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी