• रितेश-जेनेलियाचं शुभमंगल

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Feb 3, 2012 11:32 AM IST | Updated On: Feb 3, 2012 11:32 AM IST

    03 जानेवारीदिमाखदार सोहळ्यात रितेश आणि जेनेलियाचं शुभमंगल पार पडलं. आज मराठमोळ्या पद्धतीनुसार मुंबईतल्या ग्रॅन्ड हयात या हॉटेलमध्ये रितेश आणि जेनेलियाचा लग्न सोहळा झाला. या लग्नसोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रेटीसह राजकीय नेत्यांनीही आवर्जून हजेरी लावली.त्यापूर्वी सकाळी रितेशची अगदी वाजतगाजत घोड्यावरून वरात निघाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रफुल्ल पटेल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेते या लग्नाला उपस्थित आहेत. तर रितेशचा खास मित्र अभिषेक बच्चन,जया बच्चन, सुनील शेट्टी, शाहीद कपूर,काजोल, अजय देवगण, करण जोहर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज या लग्नासाठी आलेल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी