S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ज्येष्ठ संगीत संयोजक अनिल मोहिले यांचा प्रवास
  • ज्येष्ठ संगीत संयोजक अनिल मोहिले यांचा प्रवास

    Published On: Feb 1, 2012 01:02 PM IST | Updated On: Feb 1, 2012 01:02 PM IST

    01 फेब्रुवारीअनिल मोहिले....संगीत संयोजनताले अनभिषिक्त सम्राट....संगीत संयोजनातीलं चालतं बोलतं विद्यापीठ....देशातल्या अनेक ख्यातनाम संगीतकारांकडे काम करणारा एकमेव संगीत संयोजक....जवळपास 70 हून अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केलं. संगीत संयोजक म्हणून त्यांनी केलेलं पहिलं गाणं म्हणजे परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का..लहानपणी अनिल मोहिले तरंग वाद्य वाजवायचे...त्यानंतर त्यांना व्हायोलिन निवडलं. तेव्हा या क्षेत्रात येण्याकरता वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी मिळाली. तर 18 व्या वर्षी ऑल इंडिया रेडिओवर आयोजित स्पर्धेत त्यांना पहिलं पारितोषिक मिळालं होतं, तेही देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याहस्ते.. संगीत क्षेत्रात एवढा प्रवास केल्यानंतरही त्यांनी नव्या पिढीला कधीच दोष दिला नाही.मराठी चित्रपटसृष्टीत संगीत संयोजनाचे काम करत त्यांनी केलेली अनेक गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. तीन पिढ्यांच्या संगीतकारांना जोडणारा एक सजीव दुवा म्हणून आत्तापर्यंत अनिल मोहिलेंकडं पाहिलं गेलं. मुंबई विद्यापीठात संगीत संयोजनाचा अभ्यासक्रमही त्यांनी सुरु केला होता. त्यातून अनेक विद्यार्थी अनिल मोहिलेंनी घडवले. अनिल मोहिले जरी आपल्यात नसले तरी, त्यांची गाणी मात्र कायम आपल्या ओठांवर असतील..आयबीएन लोकमतची अनिल मोहिलेंना श्रद्धांजली....

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close