IAS अधिकारी बनण्यासाठी द्याव्या लागतात 'या' परीक्षा

IAS अधिकारी बनण्यासाठी द्याव्या लागतात 'या' परीक्षा

सरकारी अधिकारी बनण्याची इच्छा असणाऱ्यांना IAS अधिकारी बनायचं स्वप्न असतं. जाणून घेऊ कशी असते परीक्षेची पद्धत?

  • Share this:

मुंबई, 02 मे : सरकारी अधिकारी बनण्याची इच्छा असणाऱ्यांना IAS अधिकारी बनायचं स्वप्न असतं. IAS अधिकाऱ्यांसाठीची परीक्षा संघ लोकसेवा आयोग घेतं. जाणून घेऊ कशी असते परीक्षेची पद्धत?

अगोदर होते प्राथमिक परीक्षा

इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस म्हणजेच IAS अधिकारी बनण्यासाठी UPSC (संघ लोकसेवा आयोग )ची परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा Preliminary परीक्षा. या परीक्षेची घोषणा फेब्रुवारी-मार्चमध्ये होते. पेपर जून-जुलैमध्ये असतो. या परीक्षेचा निकाल आॅगस्टच्या मध्याला लागतो.

परीक्षेच्या तीन टप्प्यांतल्या प्रश्नपत्रिकांत चालू घडामोडींबद्दल विचारलं जातं. 2019मध्ये युपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेला आता थोडेच दिवस राहिलेत. पेपर 2 जूनला आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी चालू घडामोडींकडे लक्ष ठेवावं.

रोज 30 रुपयांची करा बचत आणि 'असे' व्हा कोट्यधीश

परीक्षेचा दुसरा टप्पा - ही मुख्य परीक्षा आहे. हा पेपर आॅक्टोबरमध्ये होतो. निकाल मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात घोषित होतात.

त्यानंतर Personality Test - हा परीक्षेचा तिसरा टप्पा. ही परीक्षा दर वर्षी डिसेंबरमध्ये होते. अंतिम निकाल शक्यतो मेमध्ये घोषित होतो.

Education Loan पूर्ण करेल तुमची स्वप्न, त्यासाठी 'या' गोष्टी आहेत महत्त्वाच्या

मुख्य परीक्षेत यांना मिळते संधी

Preliminary परीक्षेच्या निकालाप्रमाणे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवलं जातं. मुख्य परीक्षा आणि PT टेस्टच्या आधारे रँक तयार केली जाते.

Preliminary परीक्षेची पद्धत 2018पर्यंत कोठारी आयोगाच्या शिफारसींवर आधारित होती. यात दोन परीक्षांचा समावेश होता. त्यात 150 मार्कांच्या पेपरमध्ये जनरल स्टीज आणि 23 पर्यायी विषयांपैकी एक 300 मार्कांचा पेपर असायचा. नंतर त्यात बदल केले गेले. आता त्याला सिव्हिल सर्विस अॅप्टिट्युड टेस्ट (CSAT ) म्हटलं जातं. नव्या पद्धतीत दोन तासांचा पेपर असतो. प्रत्येक पेपर 200 गुणांचा असतो.

रमजान काळात पहाटे 5 वाजता मतदान सुरू करणं शक्य? सर्वोच्च न्यायालयाची ECला विचारणा

मुख्य परीक्षेत नऊ पेपर्स असतात. त्यात दोन क्वालिफाय करावे लागतात आणि सात रँकिंगचे असतात. या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न 1 ते 60 नंबर्सपर्यंत असतात. त्याची उत्तरं 20 शब्दांपासून 600 शब्दांपर्यंत द्यायची असतात. क्वालिफाईंग पेपर्स उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना मार्कांमुसार रँक दिली जाते. निवडलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवलं जातं. तिथे त्यांचं व्यक्तिमत्त्व परीक्षण होतं.

हे आहेत 9 पेपर्स

Paper A - 300 मार्कांचा पेपर असतो. हा पेपर उमेदवारानं निवडलेल्या भारतीय भाषेत किंवा इंग्लिशमध्ये असतो.

Paper B - हा पेपर 300 मार्कांचा असतो. क्वालिफाइड परीक्षा असते.

Paper I - हा 250 मार्कांचा असतो. त्यात निबंध लिहावा लागतो.

Paper II- हा 250 मार्कांचा पेपर असतो. यात सामान्य अध्ययन I ( भारतीय संस्कृती, इतिहास आणि जगाचा भूगाल )

Paper III- सामान्य अध्ययन II ( सरकार, घटना, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध ), हा 250 मार्कांचा पेपर असतो.

Paper IV- सामान्य अध्ययन III ( आर्थिक विकास, पर्यावरण, सुरक्षा, जैव वेविध्य ) , हाही 250 गुणांचा असतो.

Paper V- सामान्य अध्ययन IV  ( नैतिकता, अखंडता आणि योग्यता )

Papers VI, VII- 500 मार्कांचा पेपर. उमेदवारांनी निवडलेल्या विषयांवरचे दोन पेपर्स ( प्रत्येक पेपर 250 मार्कांचे )

लिखित पेपर्सचे एकूण मार्क 1750. Personality Test  ( मुलाखत ) 275 मार्क. एकूण मार्क - 2025.

VIDEO : स्फोट घडवण्याआधी माओवाद्यांनी असा रचला होता सापळा, थेट घटनास्थळावरून आढावा

First published: May 2, 2019, 3:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading