• शिवसेनेचं पत्र हास्यास्पद - राज

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Dec 7, 2011 04:56 PM IST | Updated On: Dec 7, 2011 04:56 PM IST

    07 नोव्हेंबरमहाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणणारे खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला त्यांच्या घराचा एफएसआय येण्याअगोदरच घरात प्रवेश केला म्हणूनत्याला 5 लाखांचा दंड ठोठावला याला काय म्हणायचं ? खुद्द हास्यास्पद पत्रक काढून आपलंच हसू करुन घेत आहे. यांना जर कायद्याचे ज्ञान नसेल तर यांना ही परीक्षेला बसवलं असतं तर बरं झालं असतं कमीत कमी त्यांना पालिका, राज्यसभा, कायदे यांचे ज्ञान तरी आले असते पण आता त्यांचा वेळ गेला आहे. नापास विद्यार्थ्यांबद्दल काय बोलायचं असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला. पेडर रोड उड्डाणपूलवरुन राज ठाकरेंनी काल उड्डाणपूल झालाच पाहिजे अशी भूमिका जाहीर करताना मुठभर उच्चभ्रूंसाठी सरकारला निर्णय बदलता येणार नाही, असा इशारा राज यांनी दिला. राज यांच्या इशार्‍याचा समाचार घेत उध्दव ठाकरे यांनी पत्रक काढून टीका केली. लता मंगेशकर, आशा भोसले, सचिन तेंडुलकर ही महाराष्ट्राची मानचिन्हं आहेत. त्यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे. या मानचिन्हांमुळेच देशात आणि जगातही महाराष्ट्राची ओळख वाढली आहे. त्यांच्या प्रतिमेस तडे जातील असे निदान महाराष्ट्रातील राजकारण्यांनी तरी वागू नये. लोकांची गरज आणि मागणी असेल तर पेडर रोडच काय, मुंबईत कुठेही उड्डाणपूल करण्याचा अधिकार सरकारला आहे. कायद्यापुढे सर्वच नागरिक समान आहेत, पण सरकारी नियमात बसत नसतानाही सचिन तेंडुलकरच्या बंगल्यासाठी वाढीव FSI देण्याची मागणी ज्यांनी केली, तेच लोक पेडर रोड पुलाच्या निमित्ताने लता मंगेशकर, आशा भोसले यांना टीकेचं लक्ष्य करतात याचे आश्चर्य वाटते असे पत्रक उध्दव ठाकरे यांनी काढले होते. उध्दव ठाकरे यांच्या पत्राचा राज यांनी आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतला. राज ठाकरे म्हणतात, पेडर रोड फ्लाय ओव्हर प्रकरणी लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांना लक्ष करण्याचा आपला हेतू नाही. लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांना समोरकरुन पेडर रोड परिसरातील लोक त्याला विरोध करत आहेत. पण आपला त्यांच्यावर कोणतीच टीका करण्याचा हेतू नव्हता पण रोज त्या ठिकाणाहून 10 लाख लोक जात असतील तर उड्डाणपूल का होऊ नये जर लोकांच्या विकासासाठी होणारी गोष्ट असेल तर त्याला विरोध का असावा. आणि या प्रकरणात सचिन तेंडुलकरचा काय संबंध ? सचिन त्याच्या घरासाठी एफएसआय मिळावा अशी विनंतीपर पत्र पत्र लिहिले होते. यात काय अनधिकृत आहे. आणि शिवसेनेच्या हाती महापालिका आहे तर सचिनला त्याच्या नवीन घरासाठी एफएसआय मिळण्या अगोदर घरात प्रवेश केला म्हणून त्यांला 5 लाखांचा दंड ठोठावला . मग याला मानचिन्हांचा आदर म्हणायचा का ? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. तसेच जर पूल तयार करण्याचे काम सरकारचे आहे असं म्हणणार्‍यांनी जैतापूरला का विरोध करत आहे ते पण सरकारचे काम आहे ना ? कापूस प्रश्नी का दिंडी काढता कापसाचा निर्णय घेण्याचा काम सरकारचा आहे मग यांनी का त्याला विरोध करायचा असा खणखणीत टोला राज यांनी लगावला. त्याचबरोबर राज्यात ज्या ज्या ठिकाणी उड्डाणपूल तयार होणार असतील तर तेथिल स्थानिकांचे विचार लक्षात घेतलेच पाहिजे असं परखड मतही राज यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी