S M L
  • युपी भ्रष्टाचाराचे राज्य - राहुल गांधी

    आईबीएन लोकमत | Published On: Nov 14, 2011 03:29 PM IST | Updated On: Nov 14, 2011 03:29 PM IST

    14 नोव्हेंबरराहुल गांधींेनी आज उत्तर प्रदेश निवडणुकांच बिंगुल फुकंत प्रचाराला सुरुवात केली. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मतदार संघात आज राहुल गांधींची प्रचार सभा झाली. यावेळी राहुल गांधींनी थेट मायावती सरकारवर हल्ला चढवला. उत्तरप्रदेशमधे सगळीकडे भ्रष्टाचाराचे राज्य असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. पोटभरण्यासाठी किती दिवस तुम्ही महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीख मागणार आहात असा सवालही त्यांनी उत्तर प्रदेशच्या मतदारांना केला. दरम्यान,सभेच्या ठिकाणी पोहचले असता फुलपूरमध्ये राहुल गांधींना समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा रीटा बहुगुणा आणि केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद हेही राहुल गांधींसोबत होते. फूलपूरमध्ये राहुल गांधींचं हेलिकॉप्टर उतरताच त्यांचा निषेध करण्यासाठी हे काळे झेंडे दाखवले गेले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close