• ...तर राज्यात दंगली भडकतील - राज ठाकरे

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Nov 3, 2011 03:10 PM IST | Updated On: Nov 3, 2011 03:10 PM IST

    03 नोव्हेंबरदोन हजार किलोमिटरवरून मुंबईत येऊन मराठी माणसाला दम भरायचा छट पुजेच्या नावाखाली आपली ताकद दाखवायची हे मुळीच खपवून घेणार नाही कृपाशंकर सिंग, संजय निरुपम यांना वेळीच आवरा नाही तर मराठी माणूस पेटला तर अख्या महाराष्ट्रात दंगली घडतील असा खणखणीत इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. त्याच बरोबर कृपाशंकर सिंग हे उध्दव ठाकरेंच्या गळ्यातले ताईत आहे, छटपुजेवरूनही नौटक सुरू आहे याला खतं पाणी घालू नये हे सर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यमंत्र्यांनी हे वेळीच थांबवावे अन्यथा याचा उद्रेक झाला तर आम्हाला जबाबदार धरू नये असा इशाराही राज यांनी दिला. नागपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यामेळाव्यात खासदार संजय निरूपम यांनी उत्तरभारतीयांनी मनात आणलं तर मुंबई बंद पाडू शकतो असं विधान करून सुरू केलेल्या शाब्दिक युध्दाने आता वेगळ वळणं घेतलं आहे. छटपुजेनिम्मित संजय निरूपम आणि कृपाशंकर सिंग यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. यावेळी राज यांनी दिवाळीनंतर फटाके वाजतील थोडी वाट बघा अशी प्रतिक्रिया दिली होती. आज राज यांनी आपल्या निवासस्थानी कृष्षकुंजवर पत्रकार परिषद घेत काँग्रेससह शिवसेनेवर तोफ डागली. मुंबईत दररोज 48 रेल्वे उत्तरप्रदेशवरून येतात याची कोण दखल घेतं आणि इथं येऊन मराठी माणसांना दम भरायचा हे करायची यांची हिंमत कशी होते. ज्या मराठी माणसाने यांना राहण्यास जागा दिली त्यांच्या हक्कावर ही लोक उठली आहे. ज्या मराठी माणसांचे नाव घेऊन बोलणार उध्दव ठाकरे यांच्या गळ्यातला कृपाशंकर सिंग हे ताईत होते. काल ठाण्यात छटपुजेनिमित्त हेच शिवसैनिक 'उत्तर भारतीयों के सन्मान में शिवसेना मैदान में' अशी होर्डिंग लावतात याचं काय करावं. जर मराठी माणूस पेटला तर अख्या महाराष्ट्रात दंगली घडतील याची दखल राज्य सरकारने घ्यावी. उद्या जर या लोकांना मारहाण झाली तर माझ्याकडे बोट दाखवू नये असा इशारा राज यांनी दिला. तसेच राज यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. दिल्लीतील हिंदी टीव्ही चॅनलेने जर माझ्या बोलण्याचा गैर अर्थ काढून दाखवला तर महाराष्ट्रात हिंदी चॅनलवाल्यांचा एक हि कॅमेरा दिसू देणार नाही अशा इशाराही राज यांनी दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी