S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • गोर्‍यासाहेबांच्या देशात स्वातंत्रलढ्याचा धडा
  • गोर्‍यासाहेबांच्या देशात स्वातंत्रलढ्याचा धडा

    Published On: Aug 16, 2011 11:43 AM IST | Updated On: Aug 16, 2011 11:43 AM IST

    कन्सल्टिंग स्पोर्ट्स एडिटर सुनंदन लेले, इंग्लंड 15 ऑगस्ट इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारत देश मुक्त झाला, त्या प्रसंगाला आज 64 वर्ष पूर्ण झाली. आज एक कमाल योगायोगही जमून आला. भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौर्‍यावर असताना 15 ऑगस्टचा मंगल दिवस आला आहे. ज्या इंग्रजांनी आपल्यावर 350 वर्ष राज्य केलं त्या इंग्रजांच्या भूमीचा आणि भारतीय स्वातंत्रलढाचा गहिरा संबंध आहे. आपल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आणि क्रांतीकारकांनी त्या काळात इंग्लंडला जाऊन उच्च शिक्षण घेतले. यापैकीच एक म्हणजे विनायक दामोदर सावरकर. 1906 साली उच्च शिक्षणाकरता सावरकर इंग्लंडमध्ये आले होते. आणि या काळात त्यांचं मुख्य काम होतं इटालियन क्रांतिकारक मेझीनेचं चरित्र लिहिण्याचं. सावरकरांनी मेझीनीच्या क्रांतीकारी विचारापासून प्रेरणा घेतली.लंडनमधल्या श्यामजी कृष्णवर्मा यांनी लंडनच्या क्रोमवेल भागात बंगला विकत घेऊन तो लंडनमध्ये शिकायला येणार्‍या गरजू भारतीय तरुणांना रहायला दिला. याच घरात इंडियन होमरुलची स्थापना करण्यात आली. तेव्हापासुन हे घर इंडिया हाऊस म्हणून ओळखलं जाऊ लागले. इंग्लंडमध्ये शिकायला आलेल्या अनेक तरुण भारतीयांना स्वातंत्र्य लढा साद घालत होता. मदनलाल धिंग्राही यापैकी एक. मदनलाल धिंग्रा, सावरकर यांच्यबरोबरच लोकमान्य टिळक यांचाही विशेष उल्लेख करावाच लागेल. 1918 साली लोकमान्य टिळक लंडनला कोर्ट केस लढवण्यासाठी आले होते. 10 होलीप्लस नावाच्या घरात ते राहिले होते.देशापासुन दूर राहूनही देशप्रेमाची धगधगती आग जागृत ठेवण्याचे काम या स्वातंत्र्यसैनिकांनी केले. 17 ऑगस्ट 1909 रोजी मदनलाल धींग्रा आणि जालीयनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणार्‍या जनरल डायरला यमसदनी पाठवणार्‍या उधमसिंग यांना 31 जुलै 1940 रोजी पेटीनवील तुरुंगात फाशी देण्यात आली. हे तुरुंग लंडनमध्येच आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close