• अजित पवारांचे गोएंकांशी व्यावसायिक संबंध !

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Apr 19, 2011 03:36 PM IST | Updated On: Apr 19, 2011 03:36 PM IST

    चंद्रकांत पाटील, कर्जत19 एप्रिलजलसंपदा खात्याचा हा घोटाळा एवढ्यावरच थांबत नाही. यात टू जी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यातला आरोपी विनोद गोएंका याचाही समावेश आहे. विनोद गोएंका हे एजी मर्कंटाईल या कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे अजित पवार आणि विनोद गोएंका यांचे व्यावसायिक संबंध आहेत हेही उघड होतं.ए.जी.मर्कंटाईल म्हणजे जलसंपदा खात्याच्या सर्वात आवडत्या कंपनीचे ऑफिस हे दादरमध्ये आहे. 29 जून 1995 रोजी या कंपनीचे रजिस्ट्रेशन झालं. या कंपनीचे एकूण शेअर कॅपिटल आहे 40 लाख रुपये. आम्ही मग कंपनी अफेअर्स खात्याकडून या ए.जी.मर्कंटाईल कंपनीशी संबंधित कागदपत्र मिळवली आणि एकापाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर यायला लागली. या कंपनीचे संचालक आहेत गिरीश आमोणकर आणि अतुल खानोलकर. (यातले गिरीश आमेणकर म्हणजे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे ऑडिटर्स...) हा सगळा योग कसा जुळून आला आणि तो कुणी जुळवून आणला इथेच आहे या कॉर्पोरेट अफेअरचा केंद्रबिंदू. संचालक म्हणून आणखी एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे अख्ख्या देशाला हादरवून सोडणार्‍या टू जी महाघोटाळ्यातला एक संशयित विनोद गोयंका. पवार कुटुंबीयांचे गोयंकाबरोबर कसे व्यावसायिक संबंध आहेत याचा हा धडधडीत पुरावाच. अजित पवार यांची गुंतवणूक, विनोद गोयंका त्या कंपनीचे संचालक आणि अशा कंपनीला अजित पवार मंत्री असलेल्या जलसंपदा खात्याची जमिन मिळणे हा काही योगायोग तर नक्कीच असू शकत नाही. योगायोग नाही तर मग नेमक काय आहे याचा खुलासा राज्याचे दादा उपमुख्यमंत्री करणार का ? भिलवले धरण परिसरातल्या व्यवहारांमागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत आणि कोण आहेत त्याचे लाभार्थी याचीही उत्तरं जनतेला मिळणार आहेत का ? जलसंपदा मंत्री असताना आपल्याच कंपन्यांची धनसंपदा कशी वाढवत नेली. मे. ए. जी. मर्कंटाईल प्रा. लि. मुंबईच्या दादर भागातीलं या कंपनीचं ऑफिस अवघ्या 25 लाख रुपयाच्या शेअर भांडवलावर ही कंपनी उभारली आहे. या कंपनीत जलसंपदा मंत्री अजित पवार आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पतप्रतिनिधी यांची गुंतवणूक आहे. अशा कंपनीला जलसंपदा विभागाने पर्यटन विकासाचा ठेका दिला. त्याबाबतची कागदपत्रे आयबीएन-लोकमतला मिळाली आहेत. जलसंपदा मंत्री अजित पवार यांचे 8 हजार 800 तर सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचे 7 हजार 200 शेअर्स मर्कंटाईल कंपनीत आहेत. त्यासाठी गायत्रीदेवी यांचा मु. पो. काटेवाडी ता. बारामतीचा पत्ता ही बाब राजकीय क्षेत्राला हादरा देणारी आहे. भिलवले तलावाच्या काठावरची पाटबंधारे विभागाची 17 एकर जमीन बिओटी तत्वावर ए. जी. मर्कंटाईल या खासगी कंपनीला दिली. या जमिनीवर पर्यटन केंद्र उभारण्याला सरकारनं मान्यता दिली. या ठिकाणी नौका विहारालासुद्धा परवानगी दिली. त्यानंतर या कंपनीमध्ये खुद्द अजित पवार यांचे 8800 शेअर्स आहेत आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींचे 7200 शेअर्स आहेत. म्हणजे स्वत:ची गुंतवणूक ज्या कंपनीत आहे त्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी अजित पवार यांनी नियम कायद्यांचा कसा सोयीस्करपणे वापर केला हे आता स्पष्ट झालंय. आयबीएन लोकमतकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये या कंपनीत 39 गुंतवणूकदारांची यादीही आहे. या 39 जणांपैकी केवळ पाच नावांपुढे पत्त्यांची नोंद आहे पण या पत्त्यांवर कोणी वेगळीच माणसं राहत असल्याचं आम्ही शोधून काढलंय. उर्वरित गुंतवणूकदारांच्या नावापुढे केवळ मुंबई असाच उल्लेख आहे. याचा अर्थ हे गुंतवणूकदार बोगस आहेत का असा प्रश्न साहजिकच निर्माण झाला आहे. हे झालं गुंतवणूकदारांचं पण भिलवले धरण प्रकरणात एक मोठा मासाही आहे. असा लागला छडा2009 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी अजितदादा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या मालमत्तेबद्दल जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात त्यांनी या ए.जी.मर्कंटाईल कंपनीतल्या गुंतवणुकीचा उल्लेखच केला नाही. हा तर निवडणूक कायद्याचा सरळसरळ भंगच आहे. पण दादांच्या या घोटाळ्याची गोष्ट इथेच संपत नाही. अजित पवारांचे 8800 इक्विटी शेअर्स या कंपनीत आहेत. याबरोबरच 39 गुंतवणुकदारही आहेत. पण या गुंतवणूकदारांच्या लिस्टमध्येसुध्दा गडबड-घोटाळा आहे. ए.जी.मर्कंटाईल कंपनी... भिलवले धरणाच्या आसपासची जमीन घशात घालणारी ही कंपनी. आता थेट अजित पवारांचाच आशीर्वाद असल्यावर डर कशाला ? या कंपनीची कागदपत्रं तपासत असताना अजित पवार यांच्याकडे 8800 शेअर्स आहेत हे तर लक्षात आलंच पण बाकी गुंतवणूकदार कोण आहेत याचाही तपास करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आमच्याकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये एकूण 39 गुंतवणूकदारांची नावं आहे. आता गंमत म्हणजे पहिल्या पाच नावांच्या पुढे पत्ते लिहीलेले आहेत. आणि त्यानंतर जी नावं आहेत त्यांच्यापुढे आहे फक्त मुंबई असा उल्लेख. खरं तर गुंतवणूकदारांच्या पूर्ण आणि खर्‍या पत्त्यांचा उल्लेख कंपनीच्या कागदपत्रावर असणं गरजेचं असतं. ज्या नावापुढे पत्ते आहेत त्यातही घोटाळ्याचा संशय आहे. पाचही नावापुढे एकच पत्ता दिलेला आहे. नाव वेगवेगळी पण पत्ता एकच आता हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत का ?यातील सगळे गुंतवणूकदार खरेच आहे का हे तिथे राहतात का याची पडताळणी करण्यासाठी आम्ही पोहचलो बोरिवलीला. बोरिवलीतल्या योगी नगरमधील ही योगी प्रभात बिल्डिंगमधील 404 नंबरच्या फ्लॅटमध्ये.चंद्रकांत - कोई शाह रहते हैं इधर ?राठी - शाह ?चंद्रकांत - धनलक्ष्मी एंटरप्राईझेस, योगी नगर, यही पत्ता है ना?राठी - पत्ता तो यही है..चंद्रकांत - यहाँ कोई रहता नही इस नाम का ?राठी - नहीं...चंद्रकांत - और ये प्रकाशचंद जैन? जे.बी.शाह ?राठी - नहीं...चंद्रकांत - कोई नहीं ?राठी - नहीं...चंद्रकांत - ये पत्ता कैसे दिया फिर इन्होने ? ये हजारीमल आपकी कंपनी नही है ना ? राठी - नहीं नहीं...चंद्रकांत - ओके...थँक्यू आता एकूण 39 गुंतवणूकदार आहेत. त्यांनी दिलेल्या पत्त्यांवर ते राहत नाहीत. म्हणजेच हे गुंतवणूकदार बोगस आहेत का? आणि जर हे 39 जण बोगस असतील तर मग खरे गुंतवणूकदार कोण आहेत ? या प्रश्नांचं कंपनी अफेअर्स मंत्रालय किंवा सेबी तरी देऊ शकेल का ?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading