Elec-widget

संसदेवरील हल्ल्याला 7 वर्ष पूर्ण

संसदेवरील हल्ल्याला 7 वर्ष पूर्ण

13 डिसेंबरसंसदेवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला 7 वर्ष पूर्ण झाली. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातून देश आता सावरतोय. मात्र संसदेवरच्या हल्ल्याच्या खुणा सहजासहजी पुसल्या जाऊ शकत नाहीत.2001 साली हिवाळी अधिवेशन सुरू असताना अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला होता. सुरक्षारक्षकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून हा हल्ला परतवून लावला होता. हा हल्ला म्हणजे भारतीय लोकशाहीवर मोठा आघात होता. तेव्हा भाजप सत्तेवर असल्यानं त्यांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. दोषींवर कडत कारवाई करण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं. मात्र आज 7 वर्षांनंतरही संसद हल्ल्यामधला मुख्य सुत्रधार अफजल गुरूच्या फाशीबद्दल अजूनही चालढकल सुरू आहे. कदाचित, राजकारण्यांच्या याच थंडपणामुळे आता लोकांमध्ये दहशतवादाबद्दल निर्माण झालेली चीड त्यांच्या मनात न राहता ती जागोजागी प्रकट होत आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2008 06:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...