नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

10 नोव्हेंबरअखेर मुख्यमंत्रीपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. प्रणव मुखर्जी यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथवर ही घोषणा केली. त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जवळचे नेते अशी दिल्लीतल्या राजकारणात त्यांची ओळख आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरातला. त्यांचे शिक्षणही दिल्लीत झाले पण कराड हे त्यांचे गाव. पृथ्वीराज चव्हाण यांचं घराणं काँग्रेसचं आहे. त्यांच्या आई प्रेमलाताई चव्हाण काँग्रेसच्या खासदार होत्या आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. इंदिरा गांधींच्या त्या अतिशय जवळच्या होत्या. वडील आनंदराव चव्हाण कृषी राज्यमंत्री होते. सध्या पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान कार्यालय, विज्ञान तंत्रज्ञान याबरोबरच आणखीही दोन महत्त्वाची खाती सांभाळतात. पंतप्रधान कार्यालय आणि सोनिया गांधी यांच्यातला ते महत्त्वाचा दुवा आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या विश्वासातले जे कमी नेते आहेत त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेतले जाते. पृथ्वीराज चव्हाण यांनी राजस्थानमधल्या BITS पिलानी इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतले आणि त्यानंतर अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापिठात ते उच्चशिक्षणासाठी गेले. एअरक्राफ्ट बांधणी तसेच पाणबुडी संहारक यंत्रणा उभारणीच्या क्षेत्रात त्यांनी काही काळ कामही केले. पण त्यानंतर ते भारतात परतले. 1973पासून ते काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात केलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचा हळुहळू पक्षाच्या कार्यकारिणीत प्रवेश झाला. 1991 साली पहिल्यांदा ते कराड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. खासदारकीच्या पहिल्या पाच वर्षात त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कामकाजात रस घेतला. अणुऊर्जा प्रकल्पातही जातीने लक्ष घातले. त्याशिवाय शहरी आणि ग्रामीण विकास, अर्थ आणि नियोजन या विषयातही काम केले. 2000 मध्ये पक्षाने प्रवक्ता म्हणून त्यांच्यावर विश्वास दाखवला. पुढच्याच वर्षी 2002मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. 2004 पासून ते पंतप्रधान कार्यालाचे राज्यमंत्री आहेत. 2009मध्ये संसदीय कामकाज, विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्यांचा कारभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला. काँग्रेसच्या काश्मीर आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते प्रभारी आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव फक्त काँग्रेसमध्येच नव्हे तर राजकीय वर्तुळाबाहेरही आदरानं घेतले जाते. यशस्वी वाटचालBITS पिलानी (राजस्थान) इथून इंजिनिअरिंगची पदवीअमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून उच्चशिक्षण1973 - काँग्रेस पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वपक्षाच्या कार्यकारिणीत प्रवेश 1991 - कराड मतदारसंघातून खासदार विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्यअणुऊर्जा प्रकल्पात सक्रीयशहरी आणि ग्रामीण विकास अर्थ आणि नियोजनातही काम 2000 - काँग्रेस प्रवक्ते म्हणून निवड2002 - राज्यसभेवर निवड2004 पासून पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री2009 - संसदीय कामकाजविज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2010 08:22 AM IST

नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

10 नोव्हेंबर

अखेर मुख्यमंत्रीपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. प्रणव मुखर्जी यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथवर ही घोषणा केली.

त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जवळचे नेते अशी दिल्लीतल्या राजकारणात त्यांची ओळख आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरातला. त्यांचे शिक्षणही दिल्लीत झाले पण कराड हे त्यांचे गाव. पृथ्वीराज चव्हाण यांचं घराणं काँग्रेसचं आहे.

त्यांच्या आई प्रेमलाताई चव्हाण काँग्रेसच्या खासदार होत्या आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. इंदिरा गांधींच्या त्या अतिशय जवळच्या होत्या. वडील आनंदराव चव्हाण कृषी राज्यमंत्री होते.

सध्या पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान कार्यालय, विज्ञान तंत्रज्ञान याबरोबरच आणखीही दोन महत्त्वाची खाती सांभाळतात. पंतप्रधान कार्यालय आणि सोनिया गांधी यांच्यातला ते महत्त्वाचा दुवा आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या विश्वासातले जे कमी नेते आहेत त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेतले जाते.

पृथ्वीराज चव्हाण यांनी राजस्थानमधल्या BITS पिलानी इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतले आणि त्यानंतर अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापिठात ते उच्चशिक्षणासाठी गेले.

एअरक्राफ्ट बांधणी तसेच पाणबुडी संहारक यंत्रणा उभारणीच्या क्षेत्रात त्यांनी काही काळ कामही केले. पण त्यानंतर ते भारतात परतले.

1973पासून ते काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात केलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचा हळुहळू पक्षाच्या कार्यकारिणीत प्रवेश झाला. 1991 साली पहिल्यांदा ते कराड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.

खासदारकीच्या पहिल्या पाच वर्षात त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कामकाजात रस घेतला. अणुऊर्जा प्रकल्पातही जातीने लक्ष घातले. त्याशिवाय शहरी आणि ग्रामीण विकास, अर्थ आणि नियोजन या विषयातही काम केले.

2000 मध्ये पक्षाने प्रवक्ता म्हणून त्यांच्यावर विश्वास दाखवला. पुढच्याच वर्षी 2002मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. 2004 पासून ते पंतप्रधान कार्यालाचे राज्यमंत्री आहेत. 2009मध्ये संसदीय कामकाज, विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्यांचा कारभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला.

काँग्रेसच्या काश्मीर आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते प्रभारी आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव फक्त काँग्रेसमध्येच नव्हे तर राजकीय वर्तुळाबाहेरही आदरानं घेतले जाते.

यशस्वी वाटचाल

BITS पिलानी (राजस्थान) इथून इंजिनिअरिंगची पदवीअमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून उच्चशिक्षण

1973 - काँग्रेस पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वपक्षाच्या कार्यकारिणीत प्रवेश

1991 - कराड मतदारसंघातून खासदार

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्यअणुऊर्जा प्रकल्पात सक्रीय

शहरी आणि ग्रामीण विकास अर्थ आणि नियोजनातही काम

2000 - काँग्रेस प्रवक्ते म्हणून निवड

2002 - राज्यसभेवर निवड

2004 पासून पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री

2009 - संसदीय कामकाज

विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2010 08:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...