अमरनाथ यात्रेकरूंचे जीव वाचवणाऱ्या सलीम शेखला केंद्राकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

अमरनाथ यात्रेकरूंचे जीव वाचवणाऱ्या सलीम शेखला केंद्राकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

अतिरेकी गोळ्या झाडत असतानाही बस न थांबवता चालूच ठेवणाऱ्या ड्रायव्हर सलीम शेखला केंद्र सरकारने 5 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय.

  • Share this:

11 जुलै : अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. अतिरेकी गोळ्या झाडत असतानाही बस न थांबवता चालूच ठेवणाऱ्या ड्रायव्हर सलीम शेखला केंद्र सरकारने 5 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. तर याआधीही जम्मू-काश्मीर सरकारने 3 लाखांचे बक्षीस जाहीर केलंय.

हे दोन चेहरे दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. एक चेहरा आहे सलीम शेखचा तर दुसरा आहे अबू इस्माईलचा. सलीम शेखचा चेहरा आहे देवदुताचा तर अबू इस्माईलचा चेहरा आहे यमदूताचा. कारण अबू इस्माईल आणि त्याचे साथीदार अंधाधूंद गोळीबार करत होते त्यावेळेस बस ड्रायव्हर असलेल्या सलीम शेखनं गाडी न थांबवता तशीच चालू ठेवली आणि गाडीची चाळण होत असताना तो घाबरला नाही. प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी प्रसंगी त्यानं स्वत:चा जीवही धोक्यात घातला.

सलीम शेख वलसाडचे आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते अमरनाथच्या यात्रेकरूंना घेऊन काश्मीरला जातात. पण यावेळेस मात्र त्यांच्या बसवर अतिरेक्यांनी हल्ला केलाय. सलीम शेख यांनी जी प्रसंगावधान दाखवलं त्याचा घरच्यांनाही अभिमान आहे.

गुजरातमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. हल्ल्यात  ज्या पाच जणांना जीव गमवावा लागलाय तेही गुजराती. काही जणांनी राजकीय फायदा घेण्यासाठी आतापासूनच ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. काही गुजराती मुस्लिम संघटनांनी ह्या हल्ल्याचा निषेध केलाय. काही जण अजून राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत असताना सलीम शेखच्या स्टोरींमुळे अशांचा मनसुभे उद्धवस्त झालेत.

First published: July 11, 2017, 7:27 PM IST

ताज्या बातम्या