Elec-widget

करिअर पर्यावरणातलं... (भाग : 1)

करिअर पर्यावरणातलं... (भाग : 1)

नवीन वर्षातल्या पहिल्या टेक ऑफ ' मध्ये ' पर्यावरणातलं करिअर ' या विषयावर चर्चा करण्यात आली. पर्यावरण हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सध्या ज्या पद्धतीनं पर्यावरणाचा नाश होताना आपण आजुबाजुला बघतो, त्यामुळे अनेकांना विशेषत: विद्यार्थ्यांना या क्षेत्राविषयी उत्सुकता असते. अनेक प्रकारच्या क्षेत्रातून पर्यावरण तज्ज्ञ बनता येतं. त्याला तशी मागणी आहे. पर्यावरण या विषयातल्या करिअरवर ठाण्याच्या बांदोडकर कॉलेजचे प्राध्यापक आणि ' एन्रोव्हिजिल ' या संस्थेचं काम करणारे प्रा. संजय जोशी, ' पलाश ' या संस्थेचे संचालक आणि पर्यारवरणवादी पार्थ बापट यांनी ' टेक ऑफ ' मध्ये मार्गदर्शन केलं. ' मला पर्यावरणात करिअर करायचंय.... किंवा मला पर्यावरणासाठी काहीतरी करायचंय 'अशी अनेक शाळेतल्या मुलांची इच्छा असते. पर्यावरणात करिअर करू इच्छिणा-या मुलांनी शालेय जीवनापासून पर्यावरणाच्या दृष्टीनं त्यांच्या जणीवा वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे ? सर तुमच्याकडे पर्यावरणाच्या इच्छेनं काम करायला मुलं येतात. ती मुलं कोणत्या बॅराऊण्ड मधून येतात ?प्रा. संजय जोशी : अलीकडच्या काळात पर्यावरणविषयक जागृती फार मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. विशेषत: शाळेतल्या मुलांमध्ये हे पर्यावरणाचं प्रेम , उत्सुकता भयंकर वाढली आहे. याला कारण म्हणजे मीडिया, इंटरनेट. एकूणच पर्यावरणाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या या दोन्ही माध्यमांतून मुलांसमोर येत आहेत. त्यामुळे मुलांना, आजच्या या नव्या पिढीला पर्यावरण आणि पर्यावरणाच्या समस्या यांचं भ-यापैकी भान यायला लागलं आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. होमी भाभा, बालवैज्ञानिक सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या वैज्ञानिक परीक्षांसाठी मुलांना निरनिराळ्या प्रकारचे प्रोजेक्ट असतात. बहुतेक मुलं पर्यावरणाच्या संदर्भातले प्रकल्प करतात. मुलांना हे प्रकल्प करण्यासाठी आमची ' एन्रोव्हिजिन ' संस्था मदत करते. आमच्या मुलांना आम्ही निरनिराळ्या प्रकारे मार्गदर्शन करते. पर्यावरणाविषयी आस असणारी ही मुलं उत्सुकतेपोटी पर्यावरणाच अभ्यास करत आज यशस्वीपणं पर्यावरण क्षेत्रात यशस्वीपणं काम करत आहेत. तर असं पेरलेलं बीज जेव्हा घवघवून पुढं येतं तेव्हा पाहताना किती बरं वाटतं. तुम्ही पर्यावरणाच्या क्षेत्रात अनेक वर्षं काम करत आहा. पण तुम्ही काही लाईफ सायन्सेस किंवा ' बी ' ग्रुपमधले नाहीत. तर तुम्ही कसे या क्षेत्राकडे वळलात ? आमच्या वाचकांना तुमचा या क्षेत्रातला प्रवास जाणून घ्यायला आवडेल... पार्थ बापट : माझी जडणघडण कोल्हापूर जवळच्या छोट्याशा गावात झालेली आहे. कदाचित त्यामुळेच मला निसर्गाची गोडी लागली असावी. मी फिजिक्समधून (भौतिकशास्त्र) बी.एस्. सी. केलेलं आहे. त्यामुळे माझा पर्यावरणाशी काही अर्थाअर्थी संबंध नसावा. कॉलेजमध्ये नेचर क्लब चालवणं, बॅचमेट, तसंच क्लास मेटस्‌ना भटकायला घेऊन जाणं अशी गोष्टी मी कॉलेजमध्ये असताना केलेल्या आहेत. पर्यावरण या विषयाची मला आवड आहे हे माझ्या लक्षात येत होतं. पण निश्चित काय करायचं याची नस काही सापडत नव्हती. मला जे आवडतं तेच मी करणार हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे पैसे मिळतील का, नोकरी मिळेल का, माझ्याशी कोणी लग्न करेल का या ' क 'च्या प्रश्नांचा मी कधीच विचार केला नाही. त्यामुळेच मला जे काही करायचंय ते याच विषयात करायचंय हे इच्छेनंच मी या क्षेत्रात उतरलो होतो. मला पर्यावरणीय शिक्षण घेण्यात तसंच शिक्षण घेण्यातही भरपूर रस होता. माझ्या या दोन्ही आवडींचा विचार करता मी ' पलाश ' ही संस्था स्थापन केली. आपल्याला मोठं होऊन काय करिअर करायचं ते ठरवण्यासाठी कोणती दृष्टी असावी लागते ?पार्थ बापट : थोडा अवघड प्रश्न आहे. बरचदा करिअर हे पैशाची निगडीत अशा क्षेत्रातच केलं जातं. आपण करत असलेलो करिअर हे आपल्या व्यक्तिमत्त्वाशी जुळलं पाहिजे, असं ब-याच जणांना वाटतही नाही. मला असं वाटतंय की स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हिंग खूप महत्त्वाचं समजलं जातं. पण माझ्या दृष्टीनं म्हणाल तर क्चालिटी ऑफ लाइफ हे मी महत्त्वाचं समजतो. म्हणजे जगताना नुसता पैसा नाही तर त्यातून मिळणा-या मूल्यांना मी महत्त्वाचं समजतो. त्यातून पुढे जाऊन मी असं म्हणेन की करिअर करताना मला काय करायचं आहे, याचा विचार करूनच करिअर करायचं. म्हणजे मला लोकांशी मैत्री करायला आवडेल का, मला आयुष्यामध्ये भटकायला आवडेल का, याचा विचार पर्यावरणातलं करिअर करताना करायाला पाहिजे. म्हणजे मी साठीपर्यंत काय करेन याहीपेक्षा समग्र आयुष्याचा विचार करायचा. पर्यावरणाचं प्रेम समग्र आयुष्याचा विचार करायला लावतंच लावतं.एखाद्या इंजिनिअर झालेल्या व्यक्तीला पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करायचं असेल तर काही ऑप्शन्स आहेत का ?प्रा. संजय जोशी : हो निश्चितच. भरपूर ऑप्शन्स आहेत. हल्लीच्या काळात पर्यावरण हा विषय सगळीकडे सर्वमान्य झालेला आहे. या विषयाला एक प्रकारची राजमान्यता प्राप्त झाली आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. जी आधी नव्हती. पदवीधर किंवा ग्रॅज्युएट झालेली व्यक्ती कशीही पर्यावरणाशी जोडली जाऊ शकते. पण जर इंजिनिअरिंगच्या बाबतीत म्हणायचं झालं तर इंजिनिअरिंग मधल्या कोणत्याही ब्रॅन्चेसचा कुठेना कुठे संबंध पर्यावरणाशी येतोच येतो. काही मिड करिअर प्रोफशनलीस्टसाठीही तुमचा एक कोर्स आहे. त्या कोर्सविषयी तुम्ही काही सांगाल का ?पार्थ बापट : आम्ही ' पलाश ' तर्फे प्रोफशनलीस्टसाठी जो कोर्स चालवतो तो मुंबई आणि पुणे अशा दोन्ही घेतो. आम्ही सस्टेनेबल नॅचरल रिसोर्स मॅनेजमेन्ट हा वर्षभराचा पोस्ट ग्रॅज्यएट डिप्लोमा घेतो. हा कोर्स मुख्यत: एन्व्हारन्मेंटल इकॉनॉमीवर आधारित आहे. आमच्याकडे येणा-या व्यक्ती हा वेगवेगळ्या फिल्डमधून आलेल्या असतात. पण त्या पर्यावरण या विषयात बराच रस असतो. आणि कुठेतरी हे लोक आधीपासूनच वेगळे असतात. म्हणजे आपण इंजिनिअर आहोत म्हणून आपण पर्यावरणाकडे वळायचं नाही... अशी झापडं त्यांनी अजिबात लावलेली नसतात. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर काम करताना भरपूर मजा येते आणि त्यांना आमच्याकडून खूप काही शिकता येतं. या कोर्ससाठी आमच्याकडे फक्त विद्यार्थीच नाही तर काही वर्षं इंडस्ट्रिमध्ये काम केलेले व्यावसायिकही येतात. 19 ते 65 या वयोगटातले हे विद्यार्थी असतात. आमच्याकडे डॉक्टर, इंजिनिअर्स, सीए, लॉयर्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली ही माणसं असतात. आमच्याकडचे लॉयर्स आता एन्व्हायन्मेंटल लॉही करायला लागले आहेत. म्हणजे लॉमध्येसुद्धा एन्व्हारन्मेन्टचं करिअर आहे, हे या वकिलांच्या लक्षात यायला लागलं आहे. यंदाच्या अमेरिकन निवडणुकांतही पर्यावरण जागृतीचा मूलमंत्र देण्यात आला होता. जेव्हा अशा प्रभावातून मुलं बी - ग्रुप किंवा लाईफ सायन्सेसकडे वळतात. अशा मुलं खरोखरच पर्यावरणातल्या करिअरकडे वळतात का ? ज्या मुलांनी बी.एस्.सी बॉटनी, झुओलॉजी केलं असेल त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल ? प्रा. संजय जोशी : बारावीनंतर ब-याच जणांना प्रोफेशन कोर्सेस करण्याची इच्छा असते. पण कमी मार्कस् किंवा अन्य काही कारणांमुळे तसं होत नाही. मग ते बी.एस्.सीकडे वळतात. या मुलांना सुरुवातीला थोडीशी झुओलॉजी आणि बॉटनी या विषयाची नावड असते. पण बॉटनी , झुओलॉजी किंवा लाईफ सायन्सेसचा मन लावून अभ्यास केला तर सगळं काही अगदी सहज साध्य होतं. पुढे विद्यार्थ्यांना प्रचंड ऑप्शन्स मिळतील. अभ्यास आणि करिअरच्या बाबतीत आपल्याला कोणत्याही प्रकारचे शॉर्टकट नाहीयेत. तुम्ही कोणताही विषय घ्या. त्या विषयात टॉपला असणं महत्त्वाचं आहे. लोकांमध्ये कच-याचं व्यवस्थापन करण्याबद्दल म्हणावी तेवढी जागृती दिसत नाहीये. त्याबद्दल काय सांगाल ?प्रा. संजय जोशी : कच-याच्या व्यवस्थापनाची समस्या ही फक्त काही एका ठराविक भागापुरती मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ती जाणवते. कारण लोकांमध्ये तेवढी जागृतीच नाहीये. ठाण्यामध्ये 10 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही पर्यावरण दक्षता मंचाची स्थापना केली तेव्हा सुरुवातीला आम्ही घन कचरा व्यवस्थापन हाच प्रकल्प हाती घेतला होता. कारण कच-यामुळे होणा-या प्रदुषणाची व्याप्ती मोठी आहे, हे आमच्या तेव्हाच लक्षात आलं होतं. आणि अजूनही सर्वसामान्य लोकांना त्या समस्येचं त्या प्रमाणात भान आलेलं नाहीये. पार्थ तुम्ही सॉलिड वेस्ट मॅनेजमेन्टचं काम मल्टीनॅशनल कंपनी आणि महानगरपालिकेबरोबरही केलेलं आहे. तुम्हाला या कामचा चांगला अनुभव आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेन्टची कामं कशा प्रकारची असतात ? आमच्या विद्यार्थ्यांना त्या आणि तुमच्या संस्थेच्या कामाविषयी काही सांगाल का ?पार्थ बापट : आमची संस्था पर्यावरण जागृतीचं काम शाळा, कॉलेज, कंपन्या अशा निरनिराळ्या ठिकाणी करते. काही मल्टी नॅशनल कंपन्यांना त्यांच्या प्रोसेसिंगमुळे पर्यावरणाची जी काही हानी होतेय याची कल्पना असते. पण याची कुठेतरी त्यांना नीट जाणीव करून देणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्याकरता तशाप्रकारचे प्रशिक्षण वर्ग आखतो. त्या व्यतिरिक्त आम्ही छोटी रिसर्च विंगही चालवतो. काही कंपन्यांना ठराविक ठिकाणी काही महत्त्वाचे प्रोजेक्ट सुरू करायचे असतात. अशावेळी त्यांना पर्यावरणाचं मार्गदर्शन आवश्यक असतं. तर आम्ही तेही काम थोड्याप्रमाणावर करतो. काही प्रमाणात आम्ही इको टुरिझमही करतो.सर काही लोकांना गिफ्ट आर्टिकल बनवण्याची आवड असते. तर त्यांना अशा पर्यावरणीय अभ्यासक्रमांचा उपयोग होईल का?प्रा. संजय जोशी : अशा लोकांनी टाकवूपासून टिकावू गोष्टींची निर्मिती करावी. रद्दीच्या पेपरांपासूनही उत्तमोत्तम गोष्टींची निर्मिती करता येईल. म्हणजे त्यांना बिझनेस म्हणूनही अशा गोष्टींचा उपयोग होईल. शिवाय पर्यावरणाविषयीची जागृतीही निर्माण होईल ती गोष्ट वेगळी.बाम्बू बेस इंडस्ट्री ही पर्यावरणीय उद्योगाच्या आंतर्गत येते का ? त्या संदर्भातली माहिती कुठे मिळेल ?प्रा. संजय जोशी : बाम्बूवर निरनिराळ्या प्रकारचं संशोधन चालू आहे. कारण बाम्बूबेस्ड इंडस्ट्री ही आपल्याकडे नव्यानं विकसित होत आहे. बाम्बूचे निरनिराळ्या प्रकारचे उपयोग आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीनं बाम्बू अतिशय चांगला आहे. बाम्बूपासून चांगल्या पद्धतीची गिफ्ट आर्टीकल बनवली जातात. या बाम्बूचा उपयोग घरबांधणीसाठी विशेषत: नॉर्थ - इस्ट भागात अरुणाचल प्रदेशसारख्या भागात जास्त होतो. भारतामध्ये 3 संस्थांमधून बाम्बू उत्पादनावचं प्रशिक्षण दिलं जातं.पार्थ तुम्ही पर्यावरण शास्त्रामधल्या फॉर्मल ट्रेनिंगबद्दल तुम्ही काय सांगाल ?पार्थ बापट : आपली जी शिक्षणपद्धती आहे ती बरीचशी जॉब ओरियेण्टेड अशीच आहे. म्हणजेच जॉबस्‌ना सुटेबल अशा शिक्षण पद्धतींचा ट्रेंड वाढत आहे. पर्यावरण शास्त्रामधल्या जी एम्.एस्.सीचा अभ्यासक्रम हा पोल्युशन कंट्रोलकडे झुकणारा आहे. म्हणजे प्रदूषणाल अध्यारुत धरून या कोर्सची आखणी करण्यात आली आहे. पर्यावरण शास्त्रात काम करणा-यांसाठी तसं काही नाहीये. कोणत्याही क्षेत्रात काम करणारा माणूस हा पर्यावरणामध्ये अगदी सहज काम करू शकतो. जर तुम्हाला पर्यावरण क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर कोणीही या क्षेत्रात येऊ शकतो. जर्नलिझममध्ये जर्नलिझमची डिग्री घेतलेली माणसं येत नाहीत... तर त्याविषयात आवड असणारी माणसं जर्नलिझममध्ये अगदी सहजच येतात. तसंच पर्यावरणाचं आहे. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचं फॉर्मल ट्रेनिंग घेत नाही तेव्हा आपण शिस्तीनं त्याविषयाचा अभ्यास करतो. उत्सुकतेपोटी आपल्या हातून तो केलाही जातो. पर्यावरणात करिअर करायचं असेल तर सायन्सचा (विज्ञान) अभ्यास करणं गरजेचं आहे का ?प्रा. संजय जोशी : अजिबात नाही. पूनम सिंघवी सारख्या सी.ए. ठाण्यात हरियालीचं काम व्यापक प्रमाणावर करत आहेत. सायन्स बॅगराऊण्ड असली तर अ‍ॅडेड अ‍ॅडव्हान्टेज असतो. म्हणजे पर्यावरणातल्या काही संज्ञा असतात ते समजायला सोपं जातं. 10 वी किंवा 12 नंतर करिअर म्हणून इको टुरिझम हे क्षेत्र कसं आहे ?पार्थ बापट : पर्यावरणशास्त्रात वाईट असं काहीचं नाहीये. इको टुरिझमसाठी सर्वात पहिलं त्या परिसराची माहिती असणं गरजेचं आहे. पर्यावरण क्षेत्रात पैसा मिळेल या इर्षेनं न येता पर्यावरणावर निष्ठा म्हणून पर्यावरण शास्त्रात करिअर करण्यासाठी या. कारण याही क्षेत्रात भ्रष्टाचार आहे. तो आपल्याला दूर करता येईल. पर्यावरणशास्त्रात पैसा हे बायप्रॉडक्ट आहे. पर्यावरण शास्त्रातले ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस-पुणे विद्यापीठ एन्वायरन्मेंटल सायन्ससाईट-www.unipune.ernet.inफोन-020-25691195एसएनडीटी विद्यापीठ, मुंबईएन्वायरन्मेंटल अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट (पोस्ट ग्रॅज्यएशन)पात्रता-पदवीकालावधी-1 वर्ष फक्त मुलींसाठीwww.sndt.ac.inमुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई फोर्ट कॅम्पस-2265 2819 / 2265 2825 कलिना कॅम्पस-2652 6091 / 2652 6388साईट-www.mu.ac.in सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबईफोन-022-22620662साईट-www.xaviers.eduइंडियन इन्स्टिट्युट ऑफ एन्वायरन्मेंट मॅनेजमेंट (एसआयईएस)जगद्गुरू आद्य शंकरा मार्ग नेरळ नवी मुंबई फोन-022-27708376साईट-www.siescoms.eduसेंटरइंडिय् ऑफ एन्वायरन्मेंट स्टडिज आयआयटी पवई मुंबईफोन-022-25723480 साईट-www.iitb.ac.inमराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद साईट-www.bamu.netनॅशनल एन्वायरन्मेंट इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट नेहरू मार्ग नागपूर फोन-0712-2249885 साईट-www.neeri.res.in शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर फोन-0231-2690571साईट-www.unishivaji.ac.inजामियाय् मिलिया जामिया नगर नवी दिल्लीसाईट-www.jmi.nic.inदिल्ली विद्यापीठनवी दिल्लीफोन-011-26717676साईट-www.jnu.ac.inशॉर्टय् टर्म कोर्सेस -सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्वायरन्मेंटतुघलकाबाद इन्स्टिट्युशनल एरियानवी दिल्लीफोन-011-691110साईट-www.cseindia.org वाईल्ड लाईफ इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचंद्रबानी, डेहराडूनफोन-0135-640111साईट-www.wii.gov.inसेंटर फॉर एन्वायरन्मेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट यशदाबाणेर रोड पुणे फोन-020-साईट-www.yashada.org

  • Share this:

नवीन वर्षातल्या पहिल्या टेक ऑफ ' मध्ये ' पर्यावरणातलं करिअर ' या विषयावर चर्चा करण्यात आली. पर्यावरण हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सध्या ज्या पद्धतीनं पर्यावरणाचा नाश होताना आपण आजुबाजुला बघतो, त्यामुळे अनेकांना विशेषत: विद्यार्थ्यांना या क्षेत्राविषयी उत्सुकता असते. अनेक प्रकारच्या क्षेत्रातून पर्यावरण तज्ज्ञ बनता येतं. त्याला तशी मागणी आहे. पर्यावरण या विषयातल्या करिअरवर ठाण्याच्या बांदोडकर कॉलेजचे प्राध्यापक आणि ' एन्रोव्हिजिल ' या संस्थेचं काम करणारे प्रा. संजय जोशी, ' पलाश ' या संस्थेचे संचालक आणि पर्यारवरणवादी पार्थ बापट यांनी ' टेक ऑफ ' मध्ये मार्गदर्शन केलं. ' मला पर्यावरणात करिअर करायचंय.... किंवा मला पर्यावरणासाठी काहीतरी करायचंय 'अशी अनेक शाळेतल्या मुलांची इच्छा असते. पर्यावरणात करिअर करू इच्छिणा-या मुलांनी शालेय जीवनापासून पर्यावरणाच्या दृष्टीनं त्यांच्या जणीवा वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे ? सर तुमच्याकडे पर्यावरणाच्या इच्छेनं काम करायला मुलं येतात. ती मुलं कोणत्या बॅराऊण्ड मधून येतात ?प्रा. संजय जोशी : अलीकडच्या काळात पर्यावरणविषयक जागृती फार मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. विशेषत: शाळेतल्या मुलांमध्ये हे पर्यावरणाचं प्रेम , उत्सुकता भयंकर वाढली आहे. याला कारण म्हणजे मीडिया, इंटरनेट. एकूणच पर्यावरणाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या या दोन्ही माध्यमांतून मुलांसमोर येत आहेत. त्यामुळे मुलांना, आजच्या या नव्या पिढीला पर्यावरण आणि पर्यावरणाच्या समस्या यांचं भ-यापैकी भान यायला लागलं आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. होमी भाभा, बालवैज्ञानिक सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या वैज्ञानिक परीक्षांसाठी मुलांना निरनिराळ्या प्रकारचे प्रोजेक्ट असतात. बहुतेक मुलं पर्यावरणाच्या संदर्भातले प्रकल्प करतात. मुलांना हे प्रकल्प करण्यासाठी आमची ' एन्रोव्हिजिन ' संस्था मदत करते. आमच्या मुलांना आम्ही निरनिराळ्या प्रकारे मार्गदर्शन करते. पर्यावरणाविषयी आस असणारी ही मुलं उत्सुकतेपोटी पर्यावरणाच अभ्यास करत आज यशस्वीपणं पर्यावरण क्षेत्रात यशस्वीपणं काम करत आहेत. तर असं पेरलेलं बीज जेव्हा घवघवून पुढं येतं तेव्हा पाहताना किती बरं वाटतं. तुम्ही पर्यावरणाच्या क्षेत्रात अनेक वर्षं काम करत आहा. पण तुम्ही काही लाईफ सायन्सेस किंवा ' बी ' ग्रुपमधले नाहीत. तर तुम्ही कसे या क्षेत्राकडे वळलात ? आमच्या वाचकांना तुमचा या क्षेत्रातला प्रवास जाणून घ्यायला आवडेल... पार्थ बापट : माझी जडणघडण कोल्हापूर जवळच्या छोट्याशा गावात झालेली आहे. कदाचित त्यामुळेच मला निसर्गाची गोडी लागली असावी. मी फिजिक्समधून (भौतिकशास्त्र) बी.एस्. सी. केलेलं आहे. त्यामुळे माझा पर्यावरणाशी काही अर्थाअर्थी संबंध नसावा. कॉलेजमध्ये नेचर क्लब चालवणं, बॅचमेट, तसंच क्लास मेटस्‌ना भटकायला घेऊन जाणं अशी गोष्टी मी कॉलेजमध्ये असताना केलेल्या आहेत. पर्यावरण या विषयाची मला आवड आहे हे माझ्या लक्षात येत होतं. पण निश्चित काय करायचं याची नस काही सापडत नव्हती. मला जे आवडतं तेच मी करणार हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे पैसे मिळतील का, नोकरी मिळेल का, माझ्याशी कोणी लग्न करेल का या ' क 'च्या प्रश्नांचा मी कधीच विचार केला नाही. त्यामुळेच मला जे काही करायचंय ते याच विषयात करायचंय हे इच्छेनंच मी या क्षेत्रात उतरलो होतो. मला पर्यावरणीय शिक्षण घेण्यात तसंच शिक्षण घेण्यातही भरपूर रस होता. माझ्या या दोन्ही आवडींचा विचार करता मी ' पलाश ' ही संस्था स्थापन केली. आपल्याला मोठं होऊन काय करिअर करायचं ते ठरवण्यासाठी कोणती दृष्टी असावी लागते ?पार्थ बापट : थोडा अवघड प्रश्न आहे. बरचदा करिअर हे पैशाची निगडीत अशा क्षेत्रातच केलं जातं. आपण करत असलेलो करिअर हे आपल्या व्यक्तिमत्त्वाशी जुळलं पाहिजे, असं ब-याच जणांना वाटतही नाही. मला असं वाटतंय की स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हिंग खूप महत्त्वाचं समजलं जातं. पण माझ्या दृष्टीनं म्हणाल तर क्चालिटी ऑफ लाइफ हे मी महत्त्वाचं समजतो. म्हणजे जगताना नुसता पैसा नाही तर त्यातून मिळणा-या मूल्यांना मी महत्त्वाचं समजतो. त्यातून पुढे जाऊन मी असं म्हणेन की करिअर करताना मला काय करायचं आहे, याचा विचार करूनच करिअर करायचं. म्हणजे मला लोकांशी मैत्री करायला आवडेल का, मला आयुष्यामध्ये भटकायला आवडेल का, याचा विचार पर्यावरणातलं करिअर करताना करायाला पाहिजे. म्हणजे मी साठीपर्यंत काय करेन याहीपेक्षा समग्र आयुष्याचा विचार करायचा. पर्यावरणाचं प्रेम समग्र आयुष्याचा विचार करायला लावतंच लावतं.एखाद्या इंजिनिअर झालेल्या व्यक्तीला पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करायचं असेल तर काही ऑप्शन्स आहेत का ?प्रा. संजय जोशी : हो निश्चितच. भरपूर ऑप्शन्स आहेत. हल्लीच्या काळात पर्यावरण हा विषय सगळीकडे सर्वमान्य झालेला आहे. या विषयाला एक प्रकारची राजमान्यता प्राप्त झाली आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. जी आधी नव्हती. पदवीधर किंवा ग्रॅज्युएट झालेली व्यक्ती कशीही पर्यावरणाशी जोडली जाऊ शकते. पण जर इंजिनिअरिंगच्या बाबतीत म्हणायचं झालं तर इंजिनिअरिंग मधल्या कोणत्याही ब्रॅन्चेसचा कुठेना कुठे संबंध पर्यावरणाशी येतोच येतो. काही मिड करिअर प्रोफशनलीस्टसाठीही तुमचा एक कोर्स आहे. त्या कोर्सविषयी तुम्ही काही सांगाल का ?पार्थ बापट : आम्ही ' पलाश ' तर्फे प्रोफशनलीस्टसाठी जो कोर्स चालवतो तो मुंबई आणि पुणे अशा दोन्ही घेतो. आम्ही सस्टेनेबल नॅचरल रिसोर्स मॅनेजमेन्ट हा वर्षभराचा पोस्ट ग्रॅज्यएट डिप्लोमा घेतो. हा कोर्स मुख्यत: एन्व्हारन्मेंटल इकॉनॉमीवर आधारित आहे. आमच्याकडे येणा-या व्यक्ती हा वेगवेगळ्या फिल्डमधून आलेल्या असतात. पण त्या पर्यावरण या विषयात बराच रस असतो. आणि कुठेतरी हे लोक आधीपासूनच वेगळे असतात. म्हणजे आपण इंजिनिअर आहोत म्हणून आपण पर्यावरणाकडे वळायचं नाही... अशी झापडं त्यांनी अजिबात लावलेली नसतात. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर काम करताना भरपूर मजा येते आणि त्यांना आमच्याकडून खूप काही शिकता येतं. या कोर्ससाठी आमच्याकडे फक्त विद्यार्थीच नाही तर काही वर्षं इंडस्ट्रिमध्ये काम केलेले व्यावसायिकही येतात. 19 ते 65 या वयोगटातले हे विद्यार्थी असतात. आमच्याकडे डॉक्टर, इंजिनिअर्स, सीए, लॉयर्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली ही माणसं असतात. आमच्याकडचे लॉयर्स आता एन्व्हायन्मेंटल लॉही करायला लागले आहेत. म्हणजे लॉमध्येसुद्धा एन्व्हारन्मेन्टचं करिअर आहे, हे या वकिलांच्या लक्षात यायला लागलं आहे. यंदाच्या अमेरिकन निवडणुकांतही पर्यावरण जागृतीचा मूलमंत्र देण्यात आला होता. जेव्हा अशा प्रभावातून मुलं बी - ग्रुप किंवा लाईफ सायन्सेसकडे वळतात. अशा मुलं खरोखरच पर्यावरणातल्या करिअरकडे वळतात का ? ज्या मुलांनी बी.एस्.सी बॉटनी, झुओलॉजी केलं असेल त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल ? प्रा. संजय जोशी : बारावीनंतर ब-याच जणांना प्रोफेशन कोर्सेस करण्याची इच्छा असते. पण कमी मार्कस् किंवा अन्य काही कारणांमुळे तसं होत नाही. मग ते बी.एस्.सीकडे वळतात. या मुलांना सुरुवातीला थोडीशी झुओलॉजी आणि बॉटनी या विषयाची नावड असते. पण बॉटनी , झुओलॉजी किंवा लाईफ सायन्सेसचा मन लावून अभ्यास केला तर सगळं काही अगदी सहज साध्य होतं. पुढे विद्यार्थ्यांना प्रचंड ऑप्शन्स मिळतील. अभ्यास आणि करिअरच्या बाबतीत आपल्याला कोणत्याही प्रकारचे शॉर्टकट नाहीयेत. तुम्ही कोणताही विषय घ्या. त्या विषयात टॉपला असणं महत्त्वाचं आहे.

लोकांमध्ये कच-याचं व्यवस्थापन करण्याबद्दल म्हणावी तेवढी जागृती दिसत नाहीये. त्याबद्दल काय सांगाल ?प्रा. संजय जोशी : कच-याच्या व्यवस्थापनाची समस्या ही फक्त काही एका ठराविक भागापुरती मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ती जाणवते. कारण लोकांमध्ये तेवढी जागृतीच नाहीये. ठाण्यामध्ये 10 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही पर्यावरण दक्षता मंचाची स्थापना केली तेव्हा सुरुवातीला आम्ही घन कचरा व्यवस्थापन हाच प्रकल्प हाती घेतला होता. कारण कच-यामुळे होणा-या प्रदुषणाची व्याप्ती मोठी आहे, हे आमच्या तेव्हाच लक्षात आलं होतं. आणि अजूनही सर्वसामान्य लोकांना त्या समस्येचं त्या प्रमाणात भान आलेलं नाहीये. पार्थ तुम्ही सॉलिड वेस्ट मॅनेजमेन्टचं काम मल्टीनॅशनल कंपनी आणि महानगरपालिकेबरोबरही केलेलं आहे. तुम्हाला या कामचा चांगला अनुभव आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेन्टची कामं कशा प्रकारची असतात ? आमच्या विद्यार्थ्यांना त्या आणि तुमच्या संस्थेच्या कामाविषयी काही सांगाल का ?पार्थ बापट : आमची संस्था पर्यावरण जागृतीचं काम शाळा, कॉलेज, कंपन्या अशा निरनिराळ्या ठिकाणी करते. काही मल्टी नॅशनल कंपन्यांना त्यांच्या प्रोसेसिंगमुळे पर्यावरणाची जी काही हानी होतेय याची कल्पना असते. पण याची कुठेतरी त्यांना नीट जाणीव करून देणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्याकरता तशाप्रकारचे प्रशिक्षण वर्ग आखतो. त्या व्यतिरिक्त आम्ही छोटी रिसर्च विंगही चालवतो. काही कंपन्यांना ठराविक ठिकाणी काही महत्त्वाचे प्रोजेक्ट सुरू करायचे असतात. अशावेळी त्यांना पर्यावरणाचं मार्गदर्शन आवश्यक असतं. तर आम्ही तेही काम थोड्याप्रमाणावर करतो. काही प्रमाणात आम्ही इको टुरिझमही करतो.सर काही लोकांना गिफ्ट आर्टिकल बनवण्याची आवड असते. तर त्यांना अशा पर्यावरणीय अभ्यासक्रमांचा उपयोग होईल का?प्रा. संजय जोशी : अशा लोकांनी टाकवूपासून टिकावू गोष्टींची निर्मिती करावी. रद्दीच्या पेपरांपासूनही उत्तमोत्तम गोष्टींची निर्मिती करता येईल. म्हणजे त्यांना बिझनेस म्हणूनही अशा गोष्टींचा उपयोग होईल. शिवाय पर्यावरणाविषयीची जागृतीही निर्माण होईल ती गोष्ट वेगळी.बाम्बू बेस इंडस्ट्री ही पर्यावरणीय उद्योगाच्या आंतर्गत येते का ? त्या संदर्भातली माहिती कुठे मिळेल ?प्रा. संजय जोशी : बाम्बूवर निरनिराळ्या प्रकारचं संशोधन चालू आहे. कारण बाम्बूबेस्ड इंडस्ट्री ही आपल्याकडे नव्यानं विकसित होत आहे. बाम्बूचे निरनिराळ्या प्रकारचे उपयोग आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीनं बाम्बू अतिशय चांगला आहे. बाम्बूपासून चांगल्या पद्धतीची गिफ्ट आर्टीकल बनवली जातात. या बाम्बूचा उपयोग घरबांधणीसाठी विशेषत: नॉर्थ - इस्ट भागात अरुणाचल प्रदेशसारख्या भागात जास्त होतो. भारतामध्ये 3 संस्थांमधून बाम्बू उत्पादनावचं प्रशिक्षण दिलं जातं.पार्थ तुम्ही पर्यावरण शास्त्रामधल्या फॉर्मल ट्रेनिंगबद्दल तुम्ही काय सांगाल ?पार्थ बापट : आपली जी शिक्षणपद्धती आहे ती बरीचशी जॉब ओरियेण्टेड अशीच आहे. म्हणजेच जॉबस्‌ना सुटेबल अशा शिक्षण पद्धतींचा ट्रेंड वाढत आहे. पर्यावरण शास्त्रामधल्या जी एम्.एस्.सीचा अभ्यासक्रम हा पोल्युशन कंट्रोलकडे झुकणारा आहे. म्हणजे प्रदूषणाल अध्यारुत धरून या कोर्सची आखणी करण्यात आली आहे. पर्यावरण शास्त्रात काम करणा-यांसाठी तसं काही नाहीये. कोणत्याही क्षेत्रात काम करणारा माणूस हा पर्यावरणामध्ये अगदी सहज काम करू शकतो. जर तुम्हाला पर्यावरण क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर कोणीही या क्षेत्रात येऊ शकतो. जर्नलिझममध्ये जर्नलिझमची डिग्री घेतलेली माणसं येत नाहीत... तर त्याविषयात आवड असणारी माणसं जर्नलिझममध्ये अगदी सहजच येतात. तसंच पर्यावरणाचं आहे. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचं फॉर्मल ट्रेनिंग घेत नाही तेव्हा आपण शिस्तीनं त्याविषयाचा अभ्यास करतो. उत्सुकतेपोटी आपल्या हातून तो केलाही जातो.

पर्यावरणात करिअर करायचं असेल तर सायन्सचा (विज्ञान) अभ्यास करणं गरजेचं आहे का ?प्रा. संजय जोशी : अजिबात नाही. पूनम सिंघवी सारख्या सी.ए. ठाण्यात हरियालीचं काम व्यापक प्रमाणावर करत आहेत. सायन्स बॅगराऊण्ड असली तर अ‍ॅडेड अ‍ॅडव्हान्टेज असतो. म्हणजे पर्यावरणातल्या काही संज्ञा असतात ते समजायला सोपं जातं. 10 वी किंवा 12 नंतर करिअर म्हणून इको टुरिझम हे क्षेत्र कसं आहे ?पार्थ बापट : पर्यावरणशास्त्रात वाईट असं काहीचं नाहीये. इको टुरिझमसाठी सर्वात पहिलं त्या परिसराची माहिती असणं गरजेचं आहे. पर्यावरण क्षेत्रात पैसा मिळेल या इर्षेनं न येता पर्यावरणावर निष्ठा म्हणून पर्यावरण शास्त्रात करिअर करण्यासाठी या. कारण याही क्षेत्रात भ्रष्टाचार आहे. तो आपल्याला दूर करता येईल. पर्यावरणशास्त्रात पैसा हे बायप्रॉडक्ट आहे.

पर्यावरण शास्त्रातले ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस-पुणे विद्यापीठ एन्वायरन्मेंटल सायन्ससाईट-www.unipune.ernet.inफोन-020-25691195एसएनडीटी विद्यापीठ, मुंबईएन्वायरन्मेंटल अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट (पोस्ट ग्रॅज्यएशन)पात्रता-पदवीकालावधी-1 वर्ष फक्त मुलींसाठीwww.sndt.ac.inमुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई फोर्ट कॅम्पस-2265 2819 / 2265 2825 कलिना कॅम्पस-2652 6091 / 2652 6388साईट-www.mu.ac.in सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबईफोन-022-22620662साईट-www.xaviers.eduइंडियन इन्स्टिट्युट ऑफ एन्वायरन्मेंट मॅनेजमेंट (एसआयईएस)जगद्गुरू आद्य शंकरा मार्ग नेरळ नवी मुंबई फोन-022-27708376साईट-www.siescoms.eduसेंटरइंडिय् ऑफ एन्वायरन्मेंट स्टडिज आयआयटी पवई मुंबईफोन-022-25723480 साईट-www.iitb.ac.inमराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद साईट-www.bamu.netनॅशनल एन्वायरन्मेंट इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट नेहरू मार्ग नागपूर फोन-0712-2249885 साईट-www.neeri.res.in शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर फोन-0231-2690571साईट-www.unishivaji.ac.inजामियाय् मिलिया जामिया नगर नवी दिल्लीसाईट-www.jmi.nic.inदिल्ली विद्यापीठनवी दिल्लीफोन-011-26717676साईट-www.jnu.ac.inशॉर्टय् टर्म कोर्सेस -

सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्वायरन्मेंट

तुघलकाबाद इन्स्टिट्युशनल एरियानवी दिल्लीफोन-011-691110साईट-www.cseindia.org

वाईल्ड लाईफ इन्स्टिट्युट ऑफ इंडिया

चंद्रबानी, डेहराडूनफोन-0135-640111साईट-www.wii.gov.in

सेंटर फॉर एन्वायरन्मेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट

यशदाबाणेर रोड पुणे फोन-020-साईट-www.yashada.org

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2009 07:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...