रिवाईन्ड 2008 - आढावा लोकप्रिय गाण्यांचा

रिअ‍ॅलिटी शोजच्या मसाल्याने लोकांची संध्याकाळ करमणुकीत गेली, तरी शाम-ए-दिलकी गजल यादगार होण्यासाठी त्यांच्या मदतीला धावून यायचं ते एखादं सदाबहार गाणंच..आपला प्रेक्षक नुसता सिनेशौकीन नाही तर संगीतशौकीनही आहे. कुठली नवी गाणी यंदाच्या वर्षी आली आणि कुठली त्यांच्या ओठांवर रुळली हे आपण पाहणार आहोत.2008 साल हे बॉलिवुड साठी म्युझिकल इयर होतं असंच म्हणावं लागेल. यावर्षी अनेक हिट म्युझिकल सिनेमे आले आणि काही सिनेमे फ्लॉप ठरूनही त्यांची गाणी मात्र हिट ठरली. आम्हीही यावर्षीच्या टॉप टेन गाण्यांची लिस्ट करायला घेतली तेव्हा लक्षात आलं की ही लिस्ट टॉप टेनची न होता वाढतचं जात होती. कदाचित यावर्षी सिनेमाच्या दिग्दर्शकापेक्षा त्यातील संगीत दिग्दर्शकानेच जास्त मेहनत घेतली असावी. आता होती खरी सुरुवात, थोडा डोक्याला ताण दिला. परत परत गाणी ऐकली, संगीत तज्ञांचा विचार घेतला,इंटरनेटवर माहिती मिळवली, कॉलेज कट्‌ट्यापासून ते मायबाप जनतेची मतं विचारात घेतली आणि अखेरीस 2008 सालच्या टॉप टेन बॉलिवुड गाण्यांची लिस्ट तयार झाली. या लिस्टमध्ये बाजी मारलीय ती आपल्या ए.आर.रेहमानने... रेहमानचं म्युझिक संपलं असं म्हणणार्‍या टिकाकारांना हे चोख उत्तर होतं. या लिस्टमध्ये रेहमानची चार गाणी आहेत जी म्हणजे कभी कभी आदिती,जश्ने बहार, गुजारिश,आणि तु ही मेरी दोस्त है. यानंतर दोन युवा संगीतकारांची गाणी आहेत ज्यांची गाणी यावर्षी लै भाव खाउन गेलीयत बॉस. एक म्हणजे प्रितम आणि विशाल शेखर यांची जोडी. प्रितमचं तेरी और, पहली नजर,बाखुदाने अपुनके लिस्टमैं जगह बनवलीय. तर विशाल शेखरच्या छलिया,खुदा जाने आणि देसी गर्लने बाजी मारलीये. आश्चर्य म्हणजे या लिस्ट मध्ये यावर्षी शंकर,एहसान,लॉय या त्रिकुटाची गाणी नाहीयेत ना गाणी आहेत हिमेशभाईची.सिनेमा, नाटक, गाणं आपण पाहतो, ऐकतो, गुणगुणतो आणि नंतर विसरतो. नव्या वर्षी नवा सिनेमा येतो, नवं नाटक येतं, नवी गाणी येतात. मग त्यांची चर्चा होते. नंतर तीही विसरली जातात. पण इतकंच त्यांचं महत्त्व नाही. काही सिनेमे, काही गाणी ही काळाच्या पलीकडे जाऊन आपल्यावर राज्य करतात. आपण बॉर्डर सिनेमा पाहतो आणि देशप्रेमाचा अंगार जागृत होतो. लतादीदींचं ए मेरे वतन के लोगो आपल्याला कुठल्याही क्षणी हळवं करतं. दहशतवादी हल्ले होतात, जागतिक मंदी येते, माणसाची मनं भविष्याच्या भीतीने मुळासकट उन्मळून पडतात. अशावेळी त्यांचं चार घटका मनोरंजन कऱण्याचं काम तर ही रंगिली दुनिया करतेच. पण काही सिनेमे त्यापलीकडेही एक दृष्टी देतात, माणूसपणाची. माणूसपणाच्या भूमिकेतून प्रत्येकाकडे पाहण्याची. गेल्या वर्षात असा कुठला सिनेमा आला याचा जर आपण विचार केला तर सगळ्यांच्या तोंडी पहिलं नाव येईल, तारें जमींपर...डिस्लेक्शिया झालेल्यांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन या सिनेमाने दिला. सांगायचंय इतकंच की ही फक्त मनोरंजनाची दुनिया नाही. तर एक प्रभावी माध्यम आहे. हा सिनेमा आता ऑस्करवारीला गेलाय. तारे जमींपरला ऑस्कर मिळावा, आणि त्यानिमित्ताने खरंच आपल्या सर्व भारतीयांच्या आशांचे, अपेक्षांचे ऑस्करच्या आकाशातले ते तारे या जमींपर यावेत अशीच या नववर्षाच्या निमित्ताने आपण शुभेच्छा व्यक्त करुया.

  • Share this:

First published: December 31, 2008, 3:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या