आठवणीतले ग.दि.मा (भाग - 2)

आठवणीतले ग.दि.मा (भाग - 2)

14 डिसेंबर हा गदिमांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये गदिमांचे सुपुत्र श्रीधर माडगूळकर आणि सुप्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे आले होते. त्यांनी ग.दि.मांच्या विविध आठवणी सांगितल्या. ते दोघंही ग.दि.मांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंवरही बोलले. श्रीधर माडगूळकर अर्थशास्त्र विषय घेऊन त्यांनी एम.ए. झाले आहेत. ' जिप्सी ' हे तरुणांसाठीचं अतिशय गाजलेलं मासिक त्यांनी सुरू केलं आहे. इंटरनेटवरती ' साप्ताहिक जाळं ' नावाचं पहिलं साप्ताहिक सुरू केलं. त्याला खूप प्रतिसाद मिळाला. ' आठी आठी चौसष्ट ' ही पहिली राजकीय कादंबरी. प्रत्यक्ष अनुभवातून लिहिलेली पहिली कादंबरी असं या कादंबरीचं वर्णन केलं आहे. माडगूळ या गावी ग.दि.मांच्या नावानी त्यांनी शाळा सुरू केलेली आहे.अनेक शासकीय बिगर शासकीय समित्यांवर त्यांनी काम केलंय.अनेक कथा कविता आणि लेख प्रसिद्ध झाले आहेत. ग.दि.मांनी अनेक कथा, कविता आणि रचना लिहिल्या आहेत. त्यांची प्रत्येक साहित्यकृती ही खासच अशी आहे. ग.दि.मांच्या प्रत्येक साहित्यकृतीच्या खास आठवणी आहेत. ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये श्रीधर माडगूळकरांनी ग.दि.मांच्या पहिल्या कवितेची आठवण सांगितली. खांदेश हा माळरानाचा परिसर आहे. अतिशय कडक उन्हाळा ही खांदेशाची खासियत. इथे दुष्काळही पडायचा. त्यात माडगूळकरांच्या घरची बिकट परिस्थिती. या सा-यानं अण्णांच्या मनात खळबळ माजवलेली होती. अण्णांच्या मनातल्या या खळबळीची कोंडी फुटली ते सातवी-आठवीत असताना. त्यावेळी ते आठपाटीच्या शाळेत शिकत होते. एक मुलगा आंघोळ न करता शाळेत आला होता. त्या मुलाचे कपडे मळलेले होते. त्यात तो वर्गात उशीरा आला होता. त्याचे मळके कपडे पाहून गुरुजींनी त्याला आंघोळ केलीस का, असं विचारलं. त्या मुलानं ' नाही ' उत्तर दिलं. त्यावेळी गुरुजींनी पुढचा मागचा विचार न करता रागाने त्याच्या कानशिलात मारली. गुरुजींनी कारण विचारताच तो मुलगा म्हणाला, " मी जातीने महार आहे. आमच्या घरी दोन दिवस प्यायला पाणी नाहीये... तर आंघोळीला कुठं मिळणार." मुलाच्या या उत्तरनं गुरुजींसकट संपूर्ण वर्ग स्तब्ध झाला. पण ही गोष्ट पहिल्या बाकावर बसणा-या कुलकणीर्ंच्या गजाननाच्या मनावर विलक्षण परिणाम करून गेली. आईने केलेले अपार कष्ट, वडिलांचे झालेले अपमान आणि दारिद्र्याचे बसलेले असंख्य चटके, तुकारामांचे - ज्ञानेश्वरांचे मनावर झालेले संस्कार या सा-यांतून एक बीज तरारून वर आलं. समोरच्या कादावर भावी कवीच्या लेखणीतून शब्द उमटले.... दगडाच्या देवा, दयाच्या घागरी । अस्पृशाच्या घरी , पाणी नाही ।। पाळीव पोपट , गोड फळ त्याला । आणि गरिबाला, कदा न का ।। ... त्यानंतर ग.दि.मांची मंतरलेली लेखणी कधीच थांबली नाही. " ग.दि.मांच्या अशा असंख्य हृदयस्पर्शी त्यांचे पुत्र श्रीधर माडगूळकर यांनी ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये सांगितल्या.ग.दि.मांच्या अशाच अविस्मरणीय आठवणी सुप्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे यांच्याकडेही आहेत. भाऊ मराठेंनी गदिमांच्या आठवणींच सांगितल्या नाहीत. तर ते त्यांनी ग.दि.मांच्या विविध पैलूंविषयीही सांगितलं. " ग.दि.मांची खासियत म्हणजे त्यांचं लिखाण सर्वसामान्य माणसालाही कळायचं, असं असायचं. विशेष म्हणजे त्यांनी ते लिहिताना भान राखलं आहे. ते फार कठीण असतं. सोपं लिहिणं ही या जगातली सर्वात कठीण गोष्ट आहे. सोपं कसं लिहायचं हे मराठी सुशिक्षित मराठी माणसाला बहिणाबाईंनी शिकवलं. हाच बहिणबाईंचा आदर्श ग.दि.मांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवून लिखाण केलं आहे. त्यांना सुचायचं तेही अगदी सहज. ते शीघ्र कवी होते. एका मुलाखतीत ग.दि.मांनी सांगितलं आहे की, सिनेमासाठी गाणी ही झटाट लिहिता आली पाहिजेत. कारण त्यात दिग्दर्शकांचे पैसे गुंतलेले असतात. अशा ग.दि.मांनी संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषेतूनही बरीच गाणी मराठीत आणली. त्या गाण्यांचं त्यांनी फक्त भाषांतरच केलं नाही तर त्या गाण्यांना त्यांनी एक प्रकारे वेगळी ओळख मिळवून दिली आहे." श्रीधर माडगूळकर आणि भाऊ मराठे यांनी ग.दि.मांच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्या ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करावं लागेल.

  • Share this:

First published: December 15, 2008, 7:49 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading