Elec-widget

आदर्श घ्यावा अशी सोलापुरातील बस सेवा

आदर्श घ्यावा अशी सोलापुरातील बस सेवा

7 डिसेंबर सोलापूर सिध्दार्थ गोदाममहाराष्ट्रात प्रत्येक महानगरपालिकेची बस सेवा या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरत असते. काही शहरातील बस सेवा आता खाजगी करण्यात आल्या आहेत. सोलापुरातील बस सेवा एक वर्षाआधी विक्रीस काढली होती. मात्र आता हीच बस सेवा फायद्यात चालत आहे. तसंच सोलापुरातील बस सेवेने महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कारही खेचून आणला आहे.सोलापुरातील बस सेवेबाबत प्रवासी सांगतात, आधी बस वेळेवर नव्हत्या. खूप बस मोडक्या होत्या. आधी बस यायला खूप वेळ लागायचा पण आता बस वेळेवर मिळते. आणि बसही चांगल्या आहेत. आता प्रवास करायला अडचण येत नाही.या परिवर्तनाबाबत माहिती अशी की, विकायला काढलेल्या बस सेवेला राज्य परिवहन अधिकारी राजेद्र मदने यांनी नवी दिशा दाखवली. भंगारात जमा केलेल्या बसेस त्यांनी रस्त्यावर चालवून दाखवल्या. नुसत्या चालविल्या नाहीत तर शासनाचा मानाचा पुरस्कारही पटकावला.मदनेंनी हा चमत्कार घडविला तो ही स्वेच्छेने, स्वत: जबाबदारी घेऊन.या बदलाबाबत स्वत: उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, राजेद्र मदने सांगतात, लोकप्रतिनीधी,जनता आणि कर्मचा-यांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं. स्वच्छ,सुरक्षित आणि वेळेवर सेवा दिली म्हणून लोकांनी ही योजना स्वीकारली. गेल्या वर्षी विक्रीस काढलेली बस सेवा आता फायद्यात आली. नुसती फायद्यात आली नाही तर उत्तम सेवेचा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कारही मिळवला आहे.राजेद्र मदने या अधिका-याच्या व्यवस्थापनाचे हे फळ आहे. मोडकळीस आलेली बससेवा आज पूर्णपणे समर्थ झाली आहे.बसचे टायर खरेदी करायला या खात्याकडे पैसा नव्हता आता त्यांनी 30 नवीन गाड्या खरेदी केल्या आहेत.आधी केवळ 30000 उत्पन्न होते आता रोज 5 लाखाचे उत्पन्न होत आहे. सोलापूर बस सेवेचा हा आदर्श इतर बससेवांनाही मार्गदर्शक ठरू शकतो.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2008 03:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...