राणेंना हवंय महसूल किंवा नगर विकास खातं : आदिक नाराज

20 फेब्रुवारी नारायण राणे सध्या महसूल आणि नगर विकास खात्यासाठी अडून बसलेत. निलंबनाची कारवाई मागे घेतल्यानंतर कालच काँग्रेसने राणे यांचं राजकीय पुनर्वसन केलं होतं. त्यांनी काल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महसूल खात सध्या पतंगराव कदम यांच्याकडं आहे. त्यामुळे त्यांना दुखवून राणे यांच्याकडं पुन्हा महसूल खातं देणं पक्षासाठी कठीण आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचं निलंबन रद्द करण्यात आलंय. 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बंडखोरी केली म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी बनवारीलील पुरोहित यांच्याबरोबर विदर्भ विकास आघाडी स्थापन केली होती. काल मंत्रिंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलंय. पक्षावर दाखवलेल्या निष्ठेमुळेच मंत्रिपद मिळाल्याची प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.काँग्रेसमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांची कदर केली जात नाही, अशी खंत गोविंदराव आदिक यांनी व्यक्त केलीय. काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आदिकांना डावलण्यात आलं. त्यामुळे नाराज झालेल्या आदिकांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केलीय. पक्ष दलबदलू लोकांना घेऊन चालतोय, असा आरोपही आदिक यांनी केलाय. मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांची वर्णी लागलीय त्यांच्यावरही आदिकांनी टीका केलीय.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2009 03:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...