पुण्यात जागतिक मंदीमुळे तरुणांनी गमावल्या नोक-या

19 फेब्रुवारी, पुणे जेमिमा रोहेकर जागतिक मंदीमुळे देशातल्या आय.टी क्षेत्रातल्या अनेक कंपन्या तंगीत आल्या आहेत. पुरेसे पैसे आणि प्रोजेक्ट्स अभावी कंपन्यांनी झटपट कर्मचारी कपात सुरू केली. पुण्यातल्या काही तरुणांनीदेखील अशाच प्रकारे नोकरी गमावलीय. अविनाश बोधे हा मुंबईतून पुण्याला खास सॉफ्टवेअरमध्ये करिअर करायला आलेला प्रोफेशनल. पुण्याच्या बावधन परिसरातल्या सेनेट टेक्नॉलॉजीस् प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तो नोव्हेंबर 2008मध्ये जॉईन झाला. पण अवघ्या दोन महिन्यातच कंपनीनं त्याला आणि त्याच्या डिपार्टमेंटच्या सगळ्यांनाच नोटीस न देता नोकरीवरुन काढून टाकलं. अविनाशकडे नोकरी तर नाहीच पण त्याने केलेल्या कामाचे पैसे देखील कंपनीनं दिलेले नाहीत. जागतिक मंदीमुळे कंपनीकडे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स येत नाहीयेत आणि त्यामुळे सॉफ्टवेअर डिपार्टमेंट सुरू ठेवणं परवडणारच नाही असं सांगून कंपनीनं या सर्वांनाच काढून टाकलंय. पण कंपनीवर ही वेळ मंदीमुळे न येता गलथान कारभारामुळे आलीय असा दावा कामावरुन काढलेल्या कर्मचार्‍यांनी केलाय . कंपनीच्या लेखी आश्वासनावरदेखील आता अविनाश आणि त्याच्या मित्रांचा विश्वास उरलेला नाहीये.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Feb 19, 2009 05:20 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2009 05:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...