अस्वस्थ करणारा 'द अ‍ॅटॅक्स ऑफ 26/11'(समीक्षा)

अस्वस्थ करणारा 'द अ‍ॅटॅक्स ऑफ 26/11'(समीक्षा)

अमोल परचुरे, समिक्षक01 मार्च'डिपार्टमेंट', 'भूत रिटन्स' हे सिनेमे आपटल्यानंतर आता रामू 26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर सिनेमा करतोय अशी बातमी आली आणि आठवलं ते म्हणजे हल्ल्यांनंतर लगेचच गाजलेली रामगोपाल वर्माची ताज हॉटेलची भेट...मी एक फिल्ममेकर म्हणून नाही तर एक मुंबईकर म्हणून तिथे गेलो होतो असा दावा रामूने केला होता, या हल्ल्यांवर सिनेमा बनवण्याचा आपला कोणताही इरादा नाही असंही रामूने सांगितलं होतं. पण ती सगळी चर्चा मागे पडली आणि 26/11 हल्ल्याला सव्वाचार वर्ष पूर्ण होत असतानाच रामूचा सिनेमा आलाही...'ऍटॅक्स ऑफ 26/11'... 26 नोव्हेंबर, 2008 रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तितकाच वास्तववादी अनुभव देण्याचा रामूचा हा एक प्रयत्न. जे घडलं, जसं घडलं ते सगळं इथे दिसत नाही..रिसर्च कमी पडलाय म्हणा किंवा इतर काही कारणामुळे असेल पण एकूण घटनाक्रमात काही चुकाही आहेत. पण अशा त्रुटी सोडल्या तर अतिशय अस्वस्थ करुन सोडणारा हा सिनेमा नक्कीच झालेला आहे. केवळ हल्लच नाही तर हल्ला झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेची हतबलतासुध्दा सिनेमात ठळकपणे दाखवण्यात आली आहे. 26/11 रोजी मुंबईत जे काही घडलं त्याचं लाईव्ह कव्हरेज जगभरात बघितलं जात होतं. मीडियामध्ये बघून, वाचून सर्वांनाच या हल्ल्याचा घटनाक्रम माहित झालेला, सीसीटीव्ही फूटेज आणि छायाचित्रांमधून हा हल्ला किती क्रूरपणे झाला होता याची कल्पनाही जगाला आली होती. त्यामुळे प्रेक्षकांसमोर सिनेमा सादर करत असताना वास्तववादी चित्रणाचं सर्वात मोठं आव्हान रामगोपाल वर्मा आणि टीमसमोर असणार. त्यादृष्टीनं विचार केला तर या टीमने जबरदस्तच काम केलंय. समुद्रमार्गे दहशतवाद्यांची मुंबईत घुसखोरी, सीएसटी स्टेशन, लिओपोल्ड कॅफे आणि हॉटेल ताजचं रिसेप्शन याठिकाणी दहशतवाद्यांनी केलेला अंदाधुंद गोळीबार, तिथलं मृत्यूचं थैमान याचं चित्रण डॉक्युड्रामा पध्दतीनं झालेलं आहे. हे दहशतवादी म्हणजे वीस-बावीस वर्षांची तरूण होती आणि त्यांना ब्रेनवॉश करुन अतिरेकी संघटनांनी भारतात पाठवलं होतं. त्यामुळे त्या तरूणांच्या डोक्यावर संचारलेलं इस्लामला वाचवण्याचं भूत रामूने दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या हातून शेकडो निरपराध लोक मारले जातायत याचा कोणताही परिणाम या तरूणांवर होत नसतो, म्हणजे या दहशतवाद्यांमधलं क्रौर्य किती कल्पनेपलीकडचं असेल हे दाखवण्याचा प्रयत्न रामूने केलेला आहे. रक्तरंजित हल्ल्याचं चित्रण कदाचित काहीजणांना आवडणार नाही, एवढ्या सर्व गोष्टी सविस्तर दाखवायची गरज होती का ? असा विचारही मनात येऊ शकेल पण 26/11 चा हल्ला हा सर्वच अर्थाने आतापर्यंतचा भारतावरचा सर्वात अमानुष हल्ला होता. त्यामुळे त्याचा सिनेमा बनवताना मनातली आणि प्रत्यक्षातील हिंसा दाखवणं हे आवश्यकच वाटायला लागतं. काही ठिकाणी मग मशिनगनऐवजी रामूने परिणामकारक पार्श्वसंगीताचा वापरही केला. बरं, इथे नॅरेशन पध्दतीनं सिनेमा पुढे पुढे सरकतो. मुंबईचे तत्कालीन जॉईंट कमिशनर राकेश मारिया हे चौकशी समितीसमोर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं, पोलीस यंत्रणांनी कसा मुकाबला केला या गोष्टी सविस्तर सांगत असतात. कामा हॉस्पिटलमध्ये दहशतवादी आणि पोलीस यांच्यात झालेली धुमश्चक्री आणि त्यानंतर गिरगाव चौपाटीला कसाबला झालेली अटक इथपर्यंतचा घटनाक्रमच इथे दिसतो. त्यानंतर थोडी सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात आली आहे. माणुसकीचा धर्मच मोठा आहे हे सांगण्यासाठी काही फिल्मी सीन्सची रचना करण्यात आली आहे. पण हे सीन्स फिल्मी वाटत नाहीत याचं पूर्ण श्रेय जातं ते नाना पाटेकर यांच्या अप्रतिम अभिनयाला..नाना पाटेकर यांनी आत्तापर्यंत अनेक अविस्मरणीय भूमिका केलेल्या आहेत. पण या सिनेमात राकेश मारिया यांच्या भूमिकेत नाना पाटेकर यांनी असे काही रंग भरलेत की ते जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातलंच बोलतायत असं वाटत राहतं. चौकशी समितीसमोर निवेदन असो, हल्ला झाल्यानंतर पोलीस कंट्रोल रुममधील सैरभैर अवस्था असो, कसाबची उलटतपासणी करत असताना कसाबची बकवास ऐकणं असो, प्रत्येक सीन बघताना वाटतं की, भूमिका जगणं असं जे म्हणतात ते हेच... दिग्दर्शकाला जे सांगायचंय ते प्रेक्षकापर्यंत अचूक पोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम नाना पाटेकर यांच्या अभिनयानं केलेलं आहे. अतुल कुलकर्णीनं साकारलेली भूमिका अगदीच लहान तरी महत्वाची आहे. जितेंद्र जोशीने छोट्याशा भूमिकेतही चांगलीच छाप पाडलीये. सीएसटी स्टेशनवर प्रेतांचा खच बघून जितेंद्रने केलेला आक्रोश प्रत्येक भारतीयाच्या मनातलाच आहे. मुंबईकरांचं किंवा देशातील कोणत्याही मोठ्या शहरातील नागरिकाचं आयुष्य आजही सुरक्षित नाही, 26/11 नंतरही दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत. पण हे हल्ले करणारे दहशतवादी जरी गुन्हेगार ठरत असले तरी या हल्ल्यांचे मास्टरमाईंड हे खरे दोषी आहेत. त्यांचे हेतू सफल होणार नाहीत यासाठी प्रयत्न व्हायला हवेत हा संदेश देण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आलाय. प्रत्येक भारतीयासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या 26/11 हल्ल्यांवरचा हा परिपूर्ण सिनेमा नाही हे जरी खरं असलं तरी प्रत्येक भारतीयानं हा अनुभव घ्यायलाच हवा हे मात्र नक्की...ऍटॅक्स ऑफ 26/11 रेटिंग - 75

  • Share this:

अमोल परचुरे, समिक्षक

01 मार्च

'डिपार्टमेंट', 'भूत रिटन्स' हे सिनेमे आपटल्यानंतर आता रामू 26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर सिनेमा करतोय अशी बातमी आली आणि आठवलं ते म्हणजे हल्ल्यांनंतर लगेचच गाजलेली रामगोपाल वर्माची ताज हॉटेलची भेट...मी एक फिल्ममेकर म्हणून नाही तर एक मुंबईकर म्हणून तिथे गेलो होतो असा दावा रामूने केला होता, या हल्ल्यांवर सिनेमा बनवण्याचा आपला कोणताही इरादा नाही असंही रामूने सांगितलं होतं. पण ती सगळी चर्चा मागे पडली आणि 26/11 हल्ल्याला सव्वाचार वर्ष पूर्ण होत असतानाच रामूचा सिनेमा आलाही...'ऍटॅक्स ऑफ 26/11'... 26 नोव्हेंबर, 2008 रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तितकाच वास्तववादी अनुभव देण्याचा रामूचा हा एक प्रयत्न. जे घडलं, जसं घडलं ते सगळं इथे दिसत नाही..रिसर्च कमी पडलाय म्हणा किंवा इतर काही कारणामुळे असेल पण एकूण घटनाक्रमात काही चुकाही आहेत. पण अशा त्रुटी सोडल्या तर अतिशय अस्वस्थ करुन सोडणारा हा सिनेमा नक्कीच झालेला आहे. केवळ हल्लच नाही तर हल्ला झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेची हतबलतासुध्दा सिनेमात ठळकपणे दाखवण्यात आली आहे.

26/11 रोजी मुंबईत जे काही घडलं त्याचं लाईव्ह कव्हरेज जगभरात बघितलं जात होतं. मीडियामध्ये बघून, वाचून सर्वांनाच या हल्ल्याचा घटनाक्रम माहित झालेला, सीसीटीव्ही फूटेज आणि छायाचित्रांमधून हा हल्ला किती क्रूरपणे झाला होता याची कल्पनाही जगाला आली होती. त्यामुळे प्रेक्षकांसमोर सिनेमा सादर करत असताना वास्तववादी चित्रणाचं सर्वात मोठं आव्हान रामगोपाल वर्मा आणि टीमसमोर असणार. त्यादृष्टीनं विचार केला तर या टीमने जबरदस्तच काम केलंय. समुद्रमार्गे दहशतवाद्यांची मुंबईत घुसखोरी, सीएसटी स्टेशन, लिओपोल्ड कॅफे आणि हॉटेल ताजचं रिसेप्शन याठिकाणी दहशतवाद्यांनी केलेला अंदाधुंद गोळीबार, तिथलं मृत्यूचं थैमान याचं चित्रण डॉक्युड्रामा पध्दतीनं झालेलं आहे. हे दहशतवादी म्हणजे वीस-बावीस वर्षांची तरूण होती आणि त्यांना ब्रेनवॉश करुन अतिरेकी संघटनांनी भारतात पाठवलं होतं. त्यामुळे त्या तरूणांच्या डोक्यावर संचारलेलं इस्लामला वाचवण्याचं भूत रामूने दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या हातून शेकडो निरपराध लोक मारले जातायत याचा कोणताही परिणाम या तरूणांवर होत नसतो, म्हणजे या दहशतवाद्यांमधलं क्रौर्य किती कल्पनेपलीकडचं असेल हे दाखवण्याचा प्रयत्न रामूने केलेला आहे.

रक्तरंजित हल्ल्याचं चित्रण कदाचित काहीजणांना आवडणार नाही, एवढ्या सर्व गोष्टी सविस्तर दाखवायची गरज होती का ? असा विचारही मनात येऊ शकेल पण 26/11 चा हल्ला हा सर्वच अर्थाने आतापर्यंतचा भारतावरचा सर्वात अमानुष हल्ला होता. त्यामुळे त्याचा सिनेमा बनवताना मनातली आणि प्रत्यक्षातील हिंसा दाखवणं हे आवश्यकच वाटायला लागतं. काही ठिकाणी मग मशिनगनऐवजी रामूने परिणामकारक पार्श्वसंगीताचा वापरही केला. बरं, इथे नॅरेशन पध्दतीनं सिनेमा पुढे पुढे सरकतो. मुंबईचे तत्कालीन जॉईंट कमिशनर राकेश मारिया हे चौकशी समितीसमोर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं, पोलीस यंत्रणांनी कसा मुकाबला केला या गोष्टी सविस्तर सांगत असतात. कामा हॉस्पिटलमध्ये दहशतवादी आणि पोलीस यांच्यात झालेली धुमश्चक्री आणि त्यानंतर गिरगाव चौपाटीला कसाबला झालेली अटक इथपर्यंतचा घटनाक्रमच इथे दिसतो. त्यानंतर थोडी सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात आली आहे. माणुसकीचा धर्मच मोठा आहे हे सांगण्यासाठी काही फिल्मी सीन्सची रचना करण्यात आली आहे. पण हे सीन्स फिल्मी वाटत नाहीत याचं पूर्ण श्रेय जातं ते नाना पाटेकर यांच्या अप्रतिम अभिनयाला..

नाना पाटेकर यांनी आत्तापर्यंत अनेक अविस्मरणीय भूमिका केलेल्या आहेत. पण या सिनेमात राकेश मारिया यांच्या भूमिकेत नाना पाटेकर यांनी असे काही रंग भरलेत की ते जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातलंच बोलतायत असं वाटत राहतं. चौकशी समितीसमोर निवेदन असो, हल्ला झाल्यानंतर पोलीस कंट्रोल रुममधील सैरभैर अवस्था असो, कसाबची उलटतपासणी करत असताना कसाबची बकवास ऐकणं असो, प्रत्येक सीन बघताना वाटतं की, भूमिका जगणं असं जे म्हणतात ते हेच... दिग्दर्शकाला जे सांगायचंय ते प्रेक्षकापर्यंत अचूक पोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम नाना पाटेकर यांच्या अभिनयानं केलेलं आहे. अतुल कुलकर्णीनं साकारलेली भूमिका अगदीच लहान तरी महत्वाची आहे. जितेंद्र जोशीने छोट्याशा भूमिकेतही चांगलीच छाप पाडलीये. सीएसटी स्टेशनवर प्रेतांचा खच बघून जितेंद्रने केलेला आक्रोश प्रत्येक भारतीयाच्या मनातलाच आहे. मुंबईकरांचं किंवा देशातील कोणत्याही मोठ्या शहरातील नागरिकाचं आयुष्य आजही सुरक्षित नाही, 26/11 नंतरही दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत. पण हे हल्ले करणारे दहशतवादी जरी गुन्हेगार ठरत असले तरी या हल्ल्यांचे मास्टरमाईंड हे खरे दोषी आहेत. त्यांचे हेतू सफल होणार नाहीत यासाठी प्रयत्न व्हायला हवेत हा संदेश देण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आलाय. प्रत्येक भारतीयासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या 26/11 हल्ल्यांवरचा हा परिपूर्ण सिनेमा नाही हे जरी खरं असलं तरी प्रत्येक भारतीयानं हा अनुभव घ्यायलाच हवा हे मात्र नक्की...

ऍटॅक्स ऑफ 26/11 रेटिंग - 75

First published: March 1, 2013, 3:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading