डीएसपी खून प्रकरणी राजा भैय्यांचा राजीनामा

डीएसपी खून प्रकरणी राजा भैय्यांचा राजीनामा

04 मार्चडीएसपी झिया उल हक यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मंत्री रघुराज प्रताप सिंग उर्फ राजा भैय्या यांनी आज राजीनामा दिला. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना भेटून त्यांनी त्यांच्याकडे राजीनामा सोपवला. अखिलेश यादव यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी स्पष्ट केलंय. राजा भैय्या उत्तर प्रदेशचे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते. दरम्यान, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था तळाला गेल्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री मायावती यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. मात्र, मायावती यांना अशी मागणी करण्याचा अधिकार नाही अशी टीका मुलायम सिंग यादव यांनी केली.

  • Share this:

04 मार्च

डीएसपी झिया उल हक यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मंत्री रघुराज प्रताप सिंग उर्फ राजा भैय्या यांनी आज राजीनामा दिला. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना भेटून त्यांनी त्यांच्याकडे राजीनामा सोपवला. अखिलेश यादव यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी स्पष्ट केलंय. राजा भैय्या उत्तर प्रदेशचे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते. दरम्यान, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था तळाला गेल्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री मायावती यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. मात्र, मायावती यांना अशी मागणी करण्याचा अधिकार नाही अशी टीका मुलायम सिंग यादव यांनी केली.

First published: March 4, 2013, 4:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या