Elec-widget

सुनील केंद्रेकरांच्या बदलीचा घाट ?

सुनील केंद्रेकरांच्या बदलीचा घाट ?

20 फेब्रुवारीराज्यावर दुष्काळाचं संकट कोसळलं असताना राजकीय नेते मात्र राजकारण करण्यात दंग आहेत. बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर हे परदेशात प्रशिक्षणासाठी गेले असताना त्यांच्या बदलीचा घाट घालण्यात आला. त्यांच्या बदलीचा विचार सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यामुळे संभ्रम वाढलाय. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार केंद्रेकर यांच्या बदलीसाठी राजकीय दबाव आणला जातोय. पण, केंद्रेकर यांना पाठिंबा देण्यासाठी बीडमधली जनता रस्त्यावर उतरली आहे. सुनील केंद्रेकर...बीड जिल्ह्याचे प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जिल्हाधिकारी. पण जिल्ह्यावर दुष्काळाचं संकट कोसळलं असताना एकाएकी त्यांच्या बदलीचा घाट घालण्यात आला. केंद्रेकर दीड महिना परदेशात प्रशिक्षणसाठी गेले होते. आणि परत आल्यावर आता त्यांची कुठे बदली करायची याचा विचार सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्रेकर यांच्या बदलीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दबाव आणल्याची माहिती आयबीएन लोकमतला मिळाली. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंकी, आमदार सुरेश धस, आमदार अमरसिंह पंडित आणि आमदार धनंजय मुंडे यांनी केंद्रेकरांच्या बदलीसाठी दबाव आणला. सुनील केंद्रेकरांचा कामाचा धडाका- माजलगाव महामार्गावरील अतिक्रमणं हटवली- महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंकींच्या समर्थकांची अतिक्रमणं - चारा छावण्या शासकीय नियमानुसार चालवण्यावर भर - शासकीय टँकरनं पिण्याच्या पाणीपुरवठ्‌यावर भर दिला- संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या लाभाथीर्ंना थेट मदतीसाठी कार्यवाही केली. स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणांमध्ये उल्लेखनीय कारवाई केली- सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतलासुनील केंद्रेकरांनी बीड जिल्हा प्रशासनाचा चेहरामोहरा बदलला.आणि हेच कुठेतरी राजकीय नेत्यांना खुपलं.आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या बदलीसाठी दबाव आणला. पण आता बीडमधली जनता त्यांच्या पाठिशी उभी ठाकलीसरकारी अधिकार्‍यांचा प्रामाणिकपणा, राजकीय हितसंबंधांच्या आड आला की, त्यांचा बळी देणं हे काही नविन नाही. पण यावेळी बीडची जनता केंद्रेकरांच्या पाठिशी आहे. त्यामुळे जनता आणि नेते यांच्या संघर्षात कोणाचा विजय होतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

  • Share this:

20 फेब्रुवारी

राज्यावर दुष्काळाचं संकट कोसळलं असताना राजकीय नेते मात्र राजकारण करण्यात दंग आहेत. बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर हे परदेशात प्रशिक्षणासाठी गेले असताना त्यांच्या बदलीचा घाट घालण्यात आला. त्यांच्या बदलीचा विचार सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यामुळे संभ्रम वाढलाय. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार केंद्रेकर यांच्या बदलीसाठी राजकीय दबाव आणला जातोय. पण, केंद्रेकर यांना पाठिंबा देण्यासाठी बीडमधली जनता रस्त्यावर उतरली आहे. सुनील केंद्रेकर...बीड जिल्ह्याचे प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जिल्हाधिकारी. पण जिल्ह्यावर दुष्काळाचं संकट कोसळलं असताना एकाएकी त्यांच्या बदलीचा घाट घालण्यात आला. केंद्रेकर दीड महिना परदेशात प्रशिक्षणसाठी गेले होते. आणि परत आल्यावर आता त्यांची कुठे बदली करायची याचा विचार सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

केंद्रेकर यांच्या बदलीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दबाव आणल्याची माहिती आयबीएन लोकमतला मिळाली. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंकी, आमदार सुरेश धस, आमदार अमरसिंह पंडित आणि आमदार धनंजय मुंडे यांनी केंद्रेकरांच्या बदलीसाठी दबाव आणला.

सुनील केंद्रेकरांचा कामाचा धडाका

- माजलगाव महामार्गावरील अतिक्रमणं हटवली- महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंकींच्या समर्थकांची अतिक्रमणं - चारा छावण्या शासकीय नियमानुसार चालवण्यावर भर - शासकीय टँकरनं पिण्याच्या पाणीपुरवठ्‌यावर भर दिला- संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या लाभाथीर्ंना थेट मदतीसाठी कार्यवाही केली. स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणांमध्ये उल्लेखनीय कारवाई केली- सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला

सुनील केंद्रेकरांनी बीड जिल्हा प्रशासनाचा चेहरामोहरा बदलला.आणि हेच कुठेतरी राजकीय नेत्यांना खुपलं.आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या बदलीसाठी दबाव आणला. पण आता बीडमधली जनता त्यांच्या पाठिशी उभी ठाकली

सरकारी अधिकार्‍यांचा प्रामाणिकपणा, राजकीय हितसंबंधांच्या आड आला की, त्यांचा बळी देणं हे काही नविन नाही. पण यावेळी बीडची जनता केंद्रेकरांच्या पाठिशी आहे. त्यामुळे जनता आणि नेते यांच्या संघर्षात कोणाचा विजय होतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2013 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...