Elec-widget

राजकीय दबावामुळे प्रामाणिक जिल्हाधिकार्‍यांची बदली

राजकीय दबावामुळे प्रामाणिक जिल्हाधिकार्‍यांची बदली

20 फेब्रुवारीबीड जिल्ह्याचे प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जिल्हाधिकारी म्हणून लौकीक मिळवलेल्या सुनील केंद्रेकर यांना राजकीय दबावापोटी जिल्हाधिकारी पदावर रुजू होण्यास नकार देण्यात आला असून त्यांची अचानक बदलीही करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना पदावर रुजू होण्यास नकार दिला. पारदर्शकपणे काम करणारे अधिकारी म्हणून त्यांचा काही महिन्यांतच नावलौकिक झाला होता. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले असताना राष्ट्रवादीच्या काही आमदार आणि मंत्र्यांनी केंद्रेकर यांच्या बदलीची मागणी केली होती. दरम्यान, केंद्रेकर दीड महिना प्रशिक्षणासाठी परदेशात गेले होते. प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्यांना बीड येथे जिल्हाधिकारी पदावर रुजू होण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. केंद्रेकर यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील विविध संघटना आज मोर्चा काढणार आहेत. केंद्रेकर यांना जिल्हाधिकारी म्हणून पुन्हा रुजू करण्याची मागणी केली जाणार आहे. याबाबत जनतेमधूनही संताप व्यक्त केला जातोय. केंद्रेकरांवर नाराजी कशासाठी ?- माजलगाव महामार्गावरील अतिक्रमणं हटवली- महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंकींच्या समर्थकांची अतिक्रमणं - चारा छावण्या शासकीय नियमानुसार चालवण्यावर भर - त्यामुळे आष्टीचे आमदार सुरेश धस नाराज, अजित पवारांकडे बदलीची मागणी - शासकीय टँकरने पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर भर- संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या लाभाथीर्ंना थेट मदतीसाठी कार्यवाही- स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणांमध्ये उल्लेखनीय कारवाई - बीड जिल्हा प्रशासनाचा चेहरामोहरा बदलला- सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकारकेंद्रेकरांची बदली करण्यासाठी कोणत्या आमदारांनी दबाव टाकला ?- जयदत्त क्षीरसागरपालकमंत्री, बीड- प्रकाश सोळंकीमहसूल राज्यमंत्री- सुरेश धसआमदार- अमरसिंह पंडितआमदार- धनंजय मुंडे आमदार

  • Share this:

20 फेब्रुवारी

बीड जिल्ह्याचे प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जिल्हाधिकारी म्हणून लौकीक मिळवलेल्या सुनील केंद्रेकर यांना राजकीय दबावापोटी जिल्हाधिकारी पदावर रुजू होण्यास नकार देण्यात आला असून त्यांची अचानक बदलीही करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना पदावर रुजू होण्यास नकार दिला. पारदर्शकपणे काम करणारे अधिकारी म्हणून त्यांचा काही महिन्यांतच नावलौकिक झाला होता. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले असताना राष्ट्रवादीच्या काही आमदार आणि मंत्र्यांनी केंद्रेकर यांच्या बदलीची मागणी केली होती. दरम्यान, केंद्रेकर दीड महिना प्रशिक्षणासाठी परदेशात गेले होते. प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्यांना बीड येथे जिल्हाधिकारी पदावर रुजू होण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. केंद्रेकर यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील विविध संघटना आज मोर्चा काढणार आहेत. केंद्रेकर यांना जिल्हाधिकारी म्हणून पुन्हा रुजू करण्याची मागणी केली जाणार आहे. याबाबत जनतेमधूनही संताप व्यक्त केला जातोय.

केंद्रेकरांवर नाराजी कशासाठी ?

- माजलगाव महामार्गावरील अतिक्रमणं हटवली- महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंकींच्या समर्थकांची अतिक्रमणं - चारा छावण्या शासकीय नियमानुसार चालवण्यावर भर - त्यामुळे आष्टीचे आमदार सुरेश धस नाराज, अजित पवारांकडे बदलीची मागणी - शासकीय टँकरने पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर भर- संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या लाभाथीर्ंना थेट मदतीसाठी कार्यवाही- स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणांमध्ये उल्लेखनीय कारवाई - बीड जिल्हा प्रशासनाचा चेहरामोहरा बदलला- सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार

केंद्रेकरांची बदली करण्यासाठी कोणत्या आमदारांनी दबाव टाकला ?

- जयदत्त क्षीरसागरपालकमंत्री, बीड

- प्रकाश सोळंकीमहसूल राज्यमंत्री

- सुरेश धसआमदार

- अमरसिंह पंडितआमदार

- धनंजय मुंडे आमदार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2013 10:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...