'दाऊदच्या अटकेला शंकरराव चव्हाणांनी दिली नव्हती परवानगी'

'दाऊदच्या अटकेला शंकरराव चव्हाणांनी दिली नव्हती परवानगी'

13 मार्चमुंबई : 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांना 20 वर्षं झाली. आता याप्रकरणी एक नवा वाद सुरू झालाय. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दुबईला जाउन दाऊदला अटक करायला परवानगी दिली नव्हती, असा खळबळजनक दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम.एन सिंग यांनी केला आहे. नंतर दाऊदनं पाकिस्तानात आश्रय घेतला. त्यामुळे त्याला अटक होऊ शकली नाही. सीएनएन आयबीएन वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मुख्य संपादक राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना सिंग यांनी हा दावा केला. मात्र त्या काळात दुबईबरोबर भारताचा गुन्हेगार हस्तांतरण करार अस्तित्वात नव्हता त्यामुळे दाऊदला भारतात आणणं शक्यच नव्हतं असं स्पष्टीकरण 1993 च्या ब्लास्टचे तत्कालीन तपासप्रमुख वाय. सी. पवार यांनी सांगितलं.मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला बीबीसी खटला म्हणून ओळखला जातो. या खटल्यातल्या 12 जणांना फाशीची शिक्षा विशेष टाडा न्यायालयाने सुनावली. तर अभिनेता संजय दत्त याच्यासह या खटल्यात 100 जणांना शिक्षा सुनावण्यात आलीय. तर याच प्रकरणातील गँगस्टर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन यांच्यासह 27 आरोपी अजूनही फरार आहेत. या खटल्याच्या व्याप्तीमुळे आणि लागलेल्या काळामुळे हा देशातला सर्वात मोठा खटला म्हणून ओळखला जातो. 12 मार्च रोजी 12 ठिकाणी ब्लास्ट करण्याचा टायगर मेमन आणि त्याच्या साथिदारांचा इरादा होता. ठेवलेल्या 12 बॉम्बपैकी 9 बॉम्ब फुटले तर 3 बॉम्ब फुटले नाही. या प्रकणातील 12 जणांनी फाशीची शिक्षा सुनवण्यात आली त्यांची नावे अशी आहेत: फाशी जाहीर झालेले आरोपी- याकूब मेमन - मोहम्मद शोएब घनसार - असगर युसूफ मुकादम - अब्दुल गनी तुर्क - परवेझ नझीर शेख - मोहम्मद फारुख पावले - शहानवाज कुरेशी - झाकिर हुसेन नूर मोहम्मद शेख - अब्दुल अख्तर खान - फिरोझ अमीन मलिक - मुश्ताक तराणी - मोहम्मद इक्बाल या आरोपींपैकी मोहम्मद इक्बाल याचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. तर इतर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा महत्वाचा आणि मुख्य सूत्रधार आहे गँगस्टर दाऊद इब्राहिम, त्याचा भाऊ अनिस इब्राहिम आणि दाऊदने आखलेल्या कटाची अमंलबजावणी केली होती इब्राहिम अब्दुल रज्जाक मेमन उर्फ टायगर मेमन. यासोबतच अन्वर थेबा यांसारखे बॉम्ब प्लांट करणारे आरोपीही अद्याप फरार आहेत. या प्रकरणातील दाऊदची स्मगलिंगची कामं पाहणारा मुस्तफा डोसा आणि बॉम्बस्फोट करणार्‍यासाठी आलेल्या हत्यारांच वाटप करणारा गँगस्टर अबू सालेम यांना नंतर भारतात आणण्यात आलंय.पण त्यांच्यावर वेगळ्‌या प्रकरणांसंदर्भात खटले सुरु आहेत.हा खटला गेली वीस वर्ष सुरु आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाचा येत्या काही दिवसात निकाल येण्याची शक्यता आहे.यावेळी नेमका काय निकाल येतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • Share this:

13 मार्च

मुंबई : 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांना 20 वर्षं झाली. आता याप्रकरणी एक नवा वाद सुरू झालाय. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दुबईला जाउन दाऊदला अटक करायला परवानगी दिली नव्हती, असा खळबळजनक दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम.एन सिंग यांनी केला आहे. नंतर दाऊदनं पाकिस्तानात आश्रय घेतला. त्यामुळे त्याला अटक होऊ शकली नाही. सीएनएन आयबीएन वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मुख्य संपादक राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना सिंग यांनी हा दावा केला. मात्र त्या काळात दुबईबरोबर भारताचा गुन्हेगार हस्तांतरण करार अस्तित्वात नव्हता त्यामुळे दाऊदला भारतात आणणं शक्यच नव्हतं असं स्पष्टीकरण 1993 च्या ब्लास्टचे तत्कालीन तपासप्रमुख वाय. सी. पवार यांनी सांगितलं.

मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला बीबीसी खटला म्हणून ओळखला जातो. या खटल्यातल्या 12 जणांना फाशीची शिक्षा विशेष टाडा न्यायालयाने सुनावली. तर अभिनेता संजय दत्त याच्यासह या खटल्यात 100 जणांना शिक्षा सुनावण्यात आलीय. तर याच प्रकरणातील गँगस्टर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन यांच्यासह 27 आरोपी अजूनही फरार आहेत. या खटल्याच्या व्याप्तीमुळे आणि लागलेल्या काळामुळे हा देशातला सर्वात मोठा खटला म्हणून ओळखला जातो.

12 मार्च रोजी 12 ठिकाणी ब्लास्ट करण्याचा टायगर मेमन आणि त्याच्या साथिदारांचा इरादा होता. ठेवलेल्या 12 बॉम्बपैकी 9 बॉम्ब फुटले तर 3 बॉम्ब फुटले नाही. या प्रकणातील 12 जणांनी फाशीची शिक्षा सुनवण्यात आली त्यांची नावे अशी आहेत:

फाशी जाहीर झालेले आरोपी- याकूब मेमन - मोहम्मद शोएब घनसार - असगर युसूफ मुकादम - अब्दुल गनी तुर्क - परवेझ नझीर शेख - मोहम्मद फारुख पावले - शहानवाज कुरेशी - झाकिर हुसेन नूर मोहम्मद शेख - अब्दुल अख्तर खान - फिरोझ अमीन मलिक - मुश्ताक तराणी - मोहम्मद इक्बाल

या आरोपींपैकी मोहम्मद इक्बाल याचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. तर इतर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा महत्वाचा आणि मुख्य सूत्रधार आहे गँगस्टर दाऊद इब्राहिम, त्याचा भाऊ अनिस इब्राहिम आणि दाऊदने आखलेल्या कटाची अमंलबजावणी केली होती इब्राहिम अब्दुल रज्जाक मेमन उर्फ टायगर मेमन. यासोबतच अन्वर थेबा यांसारखे बॉम्ब प्लांट करणारे आरोपीही अद्याप फरार आहेत. या प्रकरणातील दाऊदची स्मगलिंगची कामं पाहणारा मुस्तफा डोसा आणि बॉम्बस्फोट करणार्‍यासाठी आलेल्या हत्यारांच वाटप करणारा गँगस्टर अबू सालेम यांना नंतर भारतात आणण्यात आलंय.पण त्यांच्यावर वेगळ्‌या प्रकरणांसंदर्भात खटले सुरु आहेत.

हा खटला गेली वीस वर्ष सुरु आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाचा येत्या काही दिवसात निकाल येण्याची शक्यता आहे.यावेळी नेमका काय निकाल येतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First published: March 13, 2013, 5:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या