'भारत बंद'ला दिल्लीत हिंसक वळण, मुंबईत हरताळ

20 फेब्रुवारीवेगवेगळ्या मागण्यांसाठी कामगारांनी आजपासून दोन दिवसांचा संप पुकारला आहे. पण देशाची राजधानी दिल्लीत संपाला हिंसक वळण मिळाले आहे. आज नॉएडामध्ये काही कारखाने सुरु होते. हे कारखाने बंद करावेत या मागणीसाठी काही कामगार संघटांनानी आंदोलन केलं. यावेळी संतप्त कामगारांनी कारखान्याच्या परिसरात जाळपोळ केली. त्याचबरोबर रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून गाड्या पेटवून दिल्या. तर मुंबईत या संपाचा कोणताही परिणाम जाणवलेला नाही. या संपात 34 कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. पण शिवसेनेची कामगार संघटना वगळता या संपात कोणतीही संघटना सहभागी न झाल्यानं मुंबईचं जनजीवन सुरळीत आहे.मुंबईत हरताळमुंबईसह राज्यात या बंदचा फारसा परिणाम जाणवत नाही. सरकारी बँका बंद आहेत. पण रिक्षा, टॅक्सी, बसेस सुरू असल्यानं जनजीवन सुरळीत आहे. मुंबईत संपाच्या पहिल्या दिवशी मुंबईत परिणाम जाणवला नाही. शिवसेनेची कामगार संघटना वगळता या संपात कोणतीही संघटना सहभागी नसल्यानं मुंबईचं जनजीवन सुरळीत होतं. बेस्ट, रिक्षा, टॅक्सी आणि लोकल धावत असल्यानं मुंबईकरांचा खोळंबा झाला नाही. पण, मुंबईतील माथाडी कामगार, गोदी कामगार आणि वाहतूकदारांनी संपात भाग घेतला. त्यामुळे क्रॉफर्ड मार्केटमधला दाणा मार्केट, लोखंड बाजार आणि इतर ठिकाणी संपाचा परिणाम जाणवत होता. गोदी कामगारांनी संप पुकारल्यानं गोदी ठप्प होती. पण कामगार संघटनेचे नेते शरद राव यांनी संपातून माघार घेतल्यामुळे संपाची धार बोथड झाली आहे.नाशिकमध्ये कामगारांचा मोर्चानाशिकमध्ये 10 हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. यामध्ये सरकारी कर्मचार्‍यांसोबतच बँक, विमा आणि उद्योग क्षेत्रातले कामगारही रस्त्यावर उतरले होते. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा शिवाजी स्टेडियमवर विसर्जित करण्यात आला. यामध्ये सीटू, आयटक, भारतीय कामगार सेना आणि मनसे कामगार सेना यांच्यासह अनेक क्षेत्रातले कामगार आणि कर्मचारी सहभागी झाले होते. राज्यात सर्व व्यवहार सुरळीतपुण्यात संपाचा परिणाम जाणवला नाही. फक्त बँका बंद आहेत.बाकी सर्व व्यवहार सुरळीत आहेत. नाशिकमध्ये जवळपास 12 कामगार संघटनाचे दहा हजार कर्मचारी रस्त्यावर उतरले.अनंत कान्हेरे मैदनापासून शिवाजी स्टेडियम पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. बँका आणि सरकारी ऑफिस बंद आहेत. मराठवाड्यात औरंगाबादमध्ये हॉस्पिटलचे तृतीय श्रेणी कर्मचारी आणि पोस्टाच्या कर्मचार्‍यांनी संपात भाग घेतला. स्कूल बस चालकांनी मात्र संपात भाग घेतलेला नाहीय. तर नागपूरच्या कस्तुरचंद पार्क इथं वेगवेगळ्या 45 कामगार संघटनांनी मोर्चा काढला. आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. राज्यभरात बँक कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्यानं सर्व सरकारी बँका बंद आहेत. पण सहकारी बँकांचं कामकाज सुरळीत आहे. गुरुवारपासून बारावीची परीक्षा सुरू होतेय. पण वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्यानं परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता नाही.देशाच्या इतर भागात संमिश्र प्रतिसाददेशाच्या इतर भागात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर थोडाफार परिणाम झाला. केरळमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय. तिथे बँका, दुकानं पूर्णपणे बंद आहेत. टॅक्सी, रिक्षा, बसची वाहतूकही ठप्प आहे. बंगालमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय. रेल्वे बंद असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. खाजगी शैक्षणिक संस्था बंद आहेत. पण काही भागात दुकानं मात्र सुरू आहेत. पंजाब, हरियाणा, बिहार, ओरिसा आणि त्रिपुरामध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. देशातल्या इतर भागात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मारूती, हिरो आणि सुझुकीच्या कामगारांनी उद्या संपात सहभागी होणार असल्याची घोषणा केलीय.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2013 10:14 AM IST

'भारत बंद'ला दिल्लीत हिंसक वळण, मुंबईत हरताळ

20 फेब्रुवारी

वेगवेगळ्या मागण्यांसाठी कामगारांनी आजपासून दोन दिवसांचा संप पुकारला आहे. पण देशाची राजधानी दिल्लीत संपाला हिंसक वळण मिळाले आहे. आज नॉएडामध्ये काही कारखाने सुरु होते. हे कारखाने बंद करावेत या मागणीसाठी काही कामगार संघटांनानी आंदोलन केलं. यावेळी संतप्त कामगारांनी कारखान्याच्या परिसरात जाळपोळ केली. त्याचबरोबर रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून गाड्या पेटवून दिल्या. तर मुंबईत या संपाचा कोणताही परिणाम जाणवलेला नाही. या संपात 34 कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. पण शिवसेनेची कामगार संघटना वगळता या संपात कोणतीही संघटना सहभागी न झाल्यानं मुंबईचं जनजीवन सुरळीत आहे.

मुंबईत हरताळ

मुंबईसह राज्यात या बंदचा फारसा परिणाम जाणवत नाही. सरकारी बँका बंद आहेत. पण रिक्षा, टॅक्सी, बसेस सुरू असल्यानं जनजीवन सुरळीत आहे. मुंबईत संपाच्या पहिल्या दिवशी मुंबईत परिणाम जाणवला नाही. शिवसेनेची कामगार संघटना वगळता या संपात कोणतीही संघटना सहभागी नसल्यानं मुंबईचं जनजीवन सुरळीत होतं. बेस्ट, रिक्षा, टॅक्सी आणि लोकल धावत असल्यानं मुंबईकरांचा खोळंबा झाला नाही. पण, मुंबईतील माथाडी कामगार, गोदी कामगार आणि वाहतूकदारांनी संपात भाग घेतला. त्यामुळे क्रॉफर्ड मार्केटमधला दाणा मार्केट, लोखंड बाजार आणि इतर ठिकाणी संपाचा परिणाम जाणवत होता. गोदी कामगारांनी संप पुकारल्यानं गोदी ठप्प होती. पण कामगार संघटनेचे नेते शरद राव यांनी संपातून माघार घेतल्यामुळे संपाची धार बोथड झाली आहे.

नाशिकमध्ये कामगारांचा मोर्चा

नाशिकमध्ये 10 हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. यामध्ये सरकारी कर्मचार्‍यांसोबतच बँक, विमा आणि उद्योग क्षेत्रातले कामगारही रस्त्यावर उतरले होते. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा शिवाजी स्टेडियमवर विसर्जित करण्यात आला. यामध्ये सीटू, आयटक, भारतीय कामगार सेना आणि मनसे कामगार सेना यांच्यासह अनेक क्षेत्रातले कामगार आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

राज्यात सर्व व्यवहार सुरळीत

पुण्यात संपाचा परिणाम जाणवला नाही. फक्त बँका बंद आहेत.बाकी सर्व व्यवहार सुरळीत आहेत. नाशिकमध्ये जवळपास 12 कामगार संघटनाचे दहा हजार कर्मचारी रस्त्यावर उतरले.अनंत कान्हेरे मैदनापासून शिवाजी स्टेडियम पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. बँका आणि सरकारी ऑफिस बंद आहेत. मराठवाड्यात औरंगाबादमध्ये हॉस्पिटलचे तृतीय श्रेणी कर्मचारी आणि पोस्टाच्या कर्मचार्‍यांनी संपात भाग घेतला. स्कूल बस चालकांनी मात्र संपात भाग घेतलेला नाहीय. तर नागपूरच्या कस्तुरचंद पार्क इथं वेगवेगळ्या 45 कामगार संघटनांनी मोर्चा काढला. आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. राज्यभरात बँक कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्यानं सर्व सरकारी बँका बंद आहेत. पण सहकारी बँकांचं कामकाज सुरळीत आहे. गुरुवारपासून बारावीची परीक्षा सुरू होतेय. पण वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्यानं परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता नाही.

देशाच्या इतर भागात संमिश्र प्रतिसाद

देशाच्या इतर भागात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर थोडाफार परिणाम झाला. केरळमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय. तिथे बँका, दुकानं पूर्णपणे बंद आहेत. टॅक्सी, रिक्षा, बसची वाहतूकही ठप्प आहे. बंगालमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय. रेल्वे बंद असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. खाजगी शैक्षणिक संस्था बंद आहेत. पण काही भागात दुकानं मात्र सुरू आहेत. पंजाब, हरियाणा, बिहार, ओरिसा आणि त्रिपुरामध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. देशातल्या इतर भागात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मारूती, हिरो आणि सुझुकीच्या कामगारांनी उद्या संपात सहभागी होणार असल्याची घोषणा केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2013 10:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...