रिक्षा-फेरीवाल्यांनी पुकारला 19 फेब्रुवारीला संप

19 जानेवारीफेरीवाल्यांचा प्रश्न पेटलेला असताना आता कामगार संघटनेचे नेते शरद राव यांनी उडी घेतली आहे. मुंबईत 19 फेब्रुवारीला रिक्षा आणि फेरीवाल्यांनी संप पुकारला आहे. कामगार नेते शरद राव यांच्या संघटनेनं हा संप पुकारलाय. तसंच ज्याप्रमाणे वसंतराव नाईकांनी कम्युनिस्टांच्या विरोधासाठी शिवसेना पोसली, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनसेला पोसत आहेत असा गंभीर आरोपही शरद राव यांनी केला आहे. मुंबईतले सगळे फेरीवाले हे अधिकृत आहे. अनधिकृत हे नाटक आहे. मी नगरसेवक असताना 1984 मध्ये 14 फेरीवाल्यांना परवाने वाटप केले होते तेच आजही आहे. पण मुंबईत तीन लाख फेरीवाले अनधिकृत असल्याचा बनाव केला जात आहे. सगळे फेरीवाले अधिकृत आहे. फेरीवाले जिथे बसले आहे त्यांना तिथेच परवाना देण्यात यावा. फेरीवाल्यांसाठी नॅशनल पॉलिसी ठरली आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी नॅशनल पॉलिसी अंमलात आणण्यासाठी पंतप्रधानांशी पत्रव्यवहार केला होता. पण गरीब फेरीवाल्यांना मारायले राजकीय पक्ष उतरले आहे. त्यांना आम्ही जशाचा तसे उत्तर देऊ असा इशारा राव यांनी दिला. दादर,विलेपार्लेत राज ठाकरे यांनी दाखवून द्यावा की मराठी फेरीवाला कोणता आहे. या फेरीवाल्यांना हटवून वाहनं पार्क करण्यासाठी जागा केली जात आहे. त्यामुळे हा गरीबांना मुंबईतून हाकलून देण्याचा कट आहे. श्रीमंतांची हुजरेगिरी करण्याचा हा प्रकार आहे आम्ही याला कडाडून विरोध करणारच असंही राव यांनी ठणकावून सांगितलं. तसंच मनसेनं आयोजित केलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रायोजित केला होता ज्याप्रमाणे वसंतराव नाईकांनी कम्युनिस्टांच्या विरोधासाठी शिवसेना पोसली, त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण मनसेला पोसतायत, असा गंभीर आरोप शरद राव यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2013 09:59 AM IST

रिक्षा-फेरीवाल्यांनी पुकारला 19 फेब्रुवारीला संप

19 जानेवारी

फेरीवाल्यांचा प्रश्न पेटलेला असताना आता कामगार संघटनेचे नेते शरद राव यांनी उडी घेतली आहे. मुंबईत 19 फेब्रुवारीला रिक्षा आणि फेरीवाल्यांनी संप पुकारला आहे. कामगार नेते शरद राव यांच्या संघटनेनं हा संप पुकारलाय. तसंच ज्याप्रमाणे वसंतराव नाईकांनी कम्युनिस्टांच्या विरोधासाठी शिवसेना पोसली, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनसेला पोसत आहेत असा गंभीर आरोपही शरद राव यांनी केला आहे.

मुंबईतले सगळे फेरीवाले हे अधिकृत आहे. अनधिकृत हे नाटक आहे. मी नगरसेवक असताना 1984 मध्ये 14 फेरीवाल्यांना परवाने वाटप केले होते तेच आजही आहे. पण मुंबईत तीन लाख फेरीवाले अनधिकृत असल्याचा बनाव केला जात आहे. सगळे फेरीवाले अधिकृत आहे. फेरीवाले जिथे बसले आहे त्यांना तिथेच परवाना देण्यात यावा. फेरीवाल्यांसाठी नॅशनल पॉलिसी ठरली आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी नॅशनल पॉलिसी अंमलात आणण्यासाठी पंतप्रधानांशी पत्रव्यवहार केला होता. पण गरीब फेरीवाल्यांना मारायले राजकीय पक्ष उतरले आहे. त्यांना आम्ही जशाचा तसे उत्तर देऊ असा इशारा राव यांनी दिला. दादर,विलेपार्लेत राज ठाकरे यांनी दाखवून द्यावा की मराठी फेरीवाला कोणता आहे. या फेरीवाल्यांना हटवून वाहनं पार्क करण्यासाठी जागा केली जात आहे. त्यामुळे हा गरीबांना मुंबईतून हाकलून देण्याचा कट आहे. श्रीमंतांची हुजरेगिरी करण्याचा हा प्रकार आहे आम्ही याला कडाडून विरोध करणारच असंही राव यांनी ठणकावून सांगितलं. तसंच मनसेनं आयोजित केलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रायोजित केला होता ज्याप्रमाणे वसंतराव नाईकांनी कम्युनिस्टांच्या विरोधासाठी शिवसेना पोसली, त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण मनसेला पोसतायत, असा गंभीर आरोप शरद राव यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2013 09:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...